DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Wednesday, April 11, 2018

*!..महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन..!*

सहकाऱ्यांनो नमस्कार..🙏🏻
(पोस्ट टाकायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ज्यावर नंदकुमार साहेबांनी सुधारणेबाबत  लेखी दिले त्या पत्राची प्रत काल मिळणार होती , परंतु ती काही कारणास्तव मिळू शकली नाही.. ती पुन्हा मंत्रालयात गेल्यावर मिळेल..)

                 *परवा दि. ०९ रोजी घंटानाद आंदोलनानंतर तातडीने आपली टीम* मंत्रालयीन पाठपुरावा करण्याकरिता मंत्रालयात पोहचली...

• *वितेशभाऊ खांडेकर*, कणखर राज्याध्यक्ष
• *गोविंदभाऊ उगले*, झंझावाती राज्य सचिव
• *प्रवीण बडे*, अभ्यासू राज्य कोषाध्यक्ष
• *शैलेश पाटील*, दिलदार राज्य उपाध्यक्ष
• *राजेंद्र फुलावरे*, तडफदार रायगड जिल्हाध्यक्ष 
• *मी (प्राजक्त झावरे-पाटील)* उपस्थित होतो..

                 *शिक्षणमंत्री - मा. विनोद तावडे साहेब व शिक्षण सचिव - मा. नंदकुमार साहेब*
या दोन महत्त्वाच्या भेटी त्या दिवशी आम्ही घेतल्या , वित्तमंत्री उपस्थित नसल्याने ती भेट होऊ शकली नाही...
___________________________________
● *शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब :-*
                   २३/१० च्या GR मध्ये सुधारणा करण्यास आम्ही अनुकूल असून लवकरात लवकर शाळासिद्धी मधील भौतिक सुविधा हा मुद्दा वगळून सुधारित  GR  येणार आहे.. गुणवत्तेशी कोणतेही तडजोड न करता इतर बाबी त्यातून लवकरच वगळल्या जातील..
*एकंदरीत शाळा प्रगत असणे हाच निकष त्यात शिल्लक असेल* असे आपल्याशी झालेल्या चर्चेतून समोर आले..
त्यांनी संबंधित PA ना लेखी देऊन तात्काळ सुधारीत GR काढण्याचे आदेश दिले आहेत..

● *शिक्षण सचिव नंदकुमार साहेब :-*
                मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या भेटीनंतर आपली टीम शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेबांना भेटली..
२३/१० चा शासन निर्णय व त्याचे सर्व पैलू व आपले आक्षेप आम्ही नंदकुमार साहेबांसमोर मांडले.
*"गुणवत्ता देणे हे RTE कायद्यातील तरतुदीनुसार बंधनकारक असल्याने गुणवत्ता सोडता इतर सर्व बाबी आपण त्यातून वगळू असे आश्वासन त्यांनी दिले..* व ताबडतोब सदरचा GR बदलण्याचे आदेश देखील त्यांनी *आपल्या निवेदनावरती लिहून लेखी स्वरूपात "संबंधित GR काढणाऱ्या उपसचिवांकडे" दिले..*
लवकरच सुधारित GR अपेक्षित आहे..
                 मित्रांनो आपण दिलेल्या खरमरीत निवेदनाच्या शेवटचा उतारा पुन्हा वाचताना साहेबांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया बदलत गेली होती, त्यातूनच सुधारणेला वेग येईल असे अपेक्षित आहे..

*बंधू-भगिनींनो,*
_आपल्या घंटानादचा आवाज नक्कीच जोरदार होता, असे चित्रच यावरून दिसत आहे.._
_जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत प्रत्येक आठवडयात आपण मंत्रालयात भेट देणार असून सुधारित GR घेऊनच आपण आता शांत बसणार आहोत..!_
_____________________________________
*शिवनेरी ते चैत्यभूमी लॉंग मार्च व आमरण उपोषण:-*
                       मंत्रालयीन पाठपुराव्यानंतर शिवनेरी ते चैत्यभूमी लॉंग मार्च बाबत चर्चा देखील झाली असून त्याचा *कच्चा आराखडा तयार करण्यात आला.*
त्याबाबत लवकरच राज्याध्यक्ष आपल्याला पुढील सूचना देतीलच..!
तसेच
_मा. मुख्यमंत्री साहेबांना  *लॉंग मार्च बाबत दिलेले निवेदन कायदेशीर* पूर्ततेसाठी  आपणास देखील  *जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यायचे असल्याने* त्याबाबतही अधिकची माहिती लवकरच आपल्या उपलब्ध करून दिली जाईल...!_

मित्रांनो...!
*जुन्या पेन्शनच्या लढ्यातील निर्णायक लढाईला आता आपण सर्वांनी मानसिक व शारीरिक दृष्टीने तयार होणे  अतिशय महत्वाचे आहे..*
लॉंग मार्च व आमरण उपोषण या करिता आवश्यक शारीरिक क्षमता व संबंधित असणारी सर्व शास्त्रीय माहिती आम्ही मिळवत असून लवकरच आपणापर्यंत पोहचवू...

*चला तर मग आजपासूनच दररोज चालण्याचा व्यायाम / सराव सुरू करू..*
          _सशक्त तर होउच आणि पेन्शनच्या लढाईत अजिंक्य सुद्धा...!_

*कायम आपलाच*
प्राजक्त झावरे-पाटील
८८९८८८०२२२/९८३३७८१८१७
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*

No comments:

Post a Comment