DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Saturday, April 14, 2018

*!! महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन !!*

🚩  *लाँगमार्च आंदोलन व आमरण उपोषण प्रस्ताव* 🚩

👏
     मा. सर्व विश्वस्त, सर्व राज्यकार्यकारिणी व सर्व जिल्हाध्यक्ष 7 तारखेच्या घंटानाद आंदोलनानंतरही शासनाने जुनी पेंन्शन ची मागणी पूर्ण न केल्यास  त्यानंतर आरपारची लढाई म्हणून लाँगमार्च व आमरण उपोषण आंदोलनाचा सर्वसाधारण प्रस्ताव व पुर्व नियोजन आपल्यासमोर मंजुरी साठी ठेवत आहोत. सर्वानी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा. ही विनंती.

🚩 *आंदोलनाचे स्वरूप-*
           शिवभूमी(शिवनेरी किल्ला) ते मुंबई लाँगमार्च करणे तरीही शासनाने जुन्या पेन्शनचा gr न काढल्यास मंत्रालयासमोर आमरण  उपोषणास बसणे व जो पर्यंत शासन जुन्या पेन्शनचा gr काढत नाही तो पर्यत उपोषण न सोडणे.

🚩 *प्रस्तावित कालावधी व दिनांक* 🚩
         -  दिनांक 1 जून ते 6 जून 2018 लाँगमार्च व पुढे 7 जून पासून मागणी पूर्ण होईपर्यत आमरण उपोषण.

    🔹 *लाँगमार्च प्रस्ताव*   🔹
 
▪ *प्रस्तावित ठिकाण व अंतर-* शिवनेरी किल्ला ते चैत्यभुमी मुंबई व नंतर मंत्रालय घेराव अस सरासरी 175 किमी. अंतर 
▪ *प्रस्तावित कालावधी-*
      दि.1 जून ते 6 जून 2018 एकूण 6 दिवस.
▪ *लाँगमार्च स्वरूप*
1) *पेंन्शन यात्रा व बाईक रॅली-*  शिवनेरी वंदन करून राज्यकार्यकारिणी शिवनेरी पासून 100किमी अंतर  बाईक रॅली काढेल.
2) *पायी लाँगमार्च-* पुढील 75 किमी मंत्रालयापर्यंतचे अंतर महाराष्ट्रातील सर्व शिलेदारासह दररोज 15 कमी प्रमाणे 5 दिवस पायी लाँगमार्च केल्या जाईल.

▪ *सहभागी शिलेदार-*
  प्रत्येक जिल्हयातून 500 कर्मचारी सहभागी होणे अनिवार्य
36 जिल्हयाचे मिळून 18 हजार व स्थानिक कोकणातील 2 हजार अधिकचे असे 20 हजार कर्मचारी सहभागी होतील.(ही संख्या कमीत कमी आहे एवढे येणे आवश्यक आहे.) 

▪ *प्रस्तावित खर्च-* - 

1) *जेवण व नास्ता- 25 लाख  रुपये*-    
2) *मंडप, बिछायात व साउंड सिस्टीम- 10 लाख रुपय*
3) *वाहन खर्च- 1 लाख रुपये-*
4) *इतर झेंडे, बॅनर, नियोजन टीम प्रवास, जेवण इत्यादी किरकोळ खर्च- 2 लाख रुपये*

👉 *सर्व एकूण खर्च अंदाजे- 38 लाख रुपये*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

   🔹 *आमरण उपोषण प्रस्ताव* 🔹

▪ *आमरण उपोषण म्हणजे-* पाणी वगळता इतर कोणताही द्रव्य की खाण्याचा पदार्थ न खाता सतत उपोषण.
▪ *प्रस्तावित ठिकाण-*
 मंत्रालय, आझाद  मैदान
▪ *प्रस्तावित कालावधी-*
दि.7 जून 2018 पासून मागणी पूर्ण होई पर्यंत 
▪ *सहभागी शिलेदार-* प्रत्येक तालुक्यातून एक प्रमाणे 350 व राज्य व जिल्हा पदाधिकारी इच्छुक मिळून 500 कर्मचारी उपोषणाला बसतील.
▪ *प्रस्तावित खर्च-*
1) *मंडप व डेकोरेशन व  इतर किरकोळ - 6 लाख रुपये*   
2) *मीडिया खर्च - 6 लाख रुपये*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🚩 *सर्व एकूण खर्च-* 🚩
*लाँगमार्च 38 लाख +उपोषण 6 लाख + मीडिया 6 लाख = एकूण 50 लाख रुपये अंदाजे.*

👏👏👏👏
        सर्व जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांना विनंती खालील बाबी सर्वाना पूर्ण करणे शक्य झाल्यासच हे आंदोलन करता येईल.
👇 *प्रत्येक जिल्हयातून खालिल बाबीची संमती व तयारी असावी* 👇
1) *प्रत्येक जिल्हा 500 कर्मचारी पूर्ण 5 दिवस हजर असणे.*
2) *प्रत्येक जिल्हयाने प्रत्येक  तालुक्यातील एक कर्मचारी आमरण उपोषणाला तयार करणे.( हा कर्मचारी लाँगमार्च मध्ये चालणार नाही.)*
3) *50 लाख खर्च बघता- प्रत्येक जिल्हा सरासरी 1 ते दीड लाख रुपये निधी संकलित करून देणे. किंवा जिल्ह्यातील तालुक्याची कमी अधिक संख्या लक्षात घेऊन 350 तालुक्यातून 15 तव 20 हजार रूपये प्रमाणे निधी गोळा करणे*

     👏 करिता वरील सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून  चर्चा व मंजुरीसाठी प्रस्ताव प्रस्तावित.

               🚩 आपली 🚩
*सर्व विश्वस्थ व राज्यपदाधिकारी टीम*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन


    ✍         
        *सुनिल दुधे*
        राज्यसल्लागार
(8275397373, 9673033887)
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*

No comments:

Post a Comment