DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Saturday, June 29, 2019

📢
  
              *!..महत्त्वाचे..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

प्रति,
      सर्व जिल्हापदाधिकारी
      सर्व तालुकाध्यक्ष
     चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

*संदर्भ- दिनांक 28 जून 2019 चे राज्यकार्यकारिणीचे पत्र.*

            आपणांस सूचित करण्यात येते की, *राज्यकर्मचारी ,सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने* अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी, व इतर मागण्याकडे लक्षवेध करण्यासाठी *दिनांक ३ जुलै २०१९ रोजी सर्व कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शन करून,घोषणा देत 'लक्षवेधी दिन पाळण्याचे ठरविले आहे.*
       
            आपली संघटना अविरतपणे नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी यासाठी आंदोलने करीत आहे. होणाऱ्या *'लक्षवेधी दिन'* आंदोलनात अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी ही मागणी प्रामुख्याने असल्याने उपरोक्त आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन समन्वय समितीचा भाग असल्याने सक्रिय सहभागी होत आहे.
  
तरीपण *सर्व जिल्हाकार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी व सर्व शिलेदार  दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत घोषणा*  देत उपरोक्त  आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे. यानंतर ही शासनाने आपल्या मागण्याबाबत असेच उदासीन धोरण ठेवले तर *समन्वय समितीच्या वतीने मंगळवार दि.२० ऑगस्ट २०१९ रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप* जाहीर करण्यात येणार आहे. 

       *सोबतच लक्षवेधी दिनाचे फोटोज व विडिओज ला पोस्ट करून सोसिअल मिडियाच्या  माध्यमातून प्रसिद्धी द्यावी.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              आपलेच
    जिल्हाध्यक्ष/जिल्हासचिव 
      व समस्त कार्यकारिणी
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
            जिल्हा चंद्रपूर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂