🤝
*जुन्या पेन्शनसाठी मुख्यमंत्री सोबत भेट घालून देणार* -
*आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया*
👇 *भेट एका युवा नेतृत्वाशी.....* 👇
👏
पेन्शनक्रांती सप्ताहाच्या निमित्ताने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांच्याशी दि. 13 आगस्ट 2018 ला नागभीड व चिमूर तालुका कार्यकारणीच्या वतीने भेट घेण्याचा योग आला. 16 आगस्ट ला चिमुरक्रांती दिनाचा फार मोठा कार्यक्रम असल्याने बंटीभाऊ अतिशय व्यस्त होते , शेकडो कार्यकर्त्याचा गराडा त्यांचे भोवती होता. तरीही भाऊनी सविस्तर बसून सुमारे अर्धा तास आमच्याशी चर्चा केली.
भाऊंच्या नजरेत एक अनोखा आत्मविश्वस व आपुलेपणा होता, भाऊंनी एका नजरेत आम्हाला ओळखलं व चर्चेत पहिलं वाक्य बोलले ;
*"मला तुम्हच्या संघटनेची मागणी माहीत आहे मी 100% तुम्हच्या सोबत आहे. तुम्ही म्हणाल ते सर्व मी करायला तयार आहे."*
एवढं बोलून भाऊंनी आमच मन जिंकून घेतलं..
पुढे चर्चेत मी त्यांना संघटनेची राज्यव्याती व आतापर्यंतचा आंदोलन आलेख समोर ठेवला व येणाऱ्या 2 ऑक्टोबर पासून आम्ही मंत्रालयावर पेन्शनदिंडी व सामूहिक उपोषण करणार असल्याचे सांगितले.
*भाऊ म्हणाले- मी स्वतः तुम्हच्या आंदोलनात उपस्थित राहतो काही मदत भासली तर सांगा*
👉 *"तसेच दि. 16 आगस्ट ला चिमुरक्रांती दिना निमित्ताने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस येणार आहे. तुम्ही 4 ते 5 जनांचे शिष्टमंडळ घेऊन या, मुख्यमंत्री सोबत भेट घेऊ व चर्चा करू"* 👈
असे म्हणून आपल्या पी.ए. ला vip पास तयार करायला सांगितलं.
भाऊंशी आणखी चर्चा केल्यावर 👇
◼ *मुंबईला माझ्या आमदार निवासात गरजेनुरूप निवास व्यवस्था करून देईल.*
◼ *विधानभवनात पासेस ची व्यवस्था करून देणार.*
◼ *जुन्या पेन्शनच्या मागणीचे मुख्यमंत्री यांना यापूर्वीही पत्र लिहिले पुन्हा आता शिफारस पत्र लिहून तुम्हाला प्रतिलिपी तसेच पाठपुराव्याचे पत्र ही पाठविलं.*
मित्रांनो अश्या अनेक प्रकारे मदत करण्याचे आश्वासन बंटीभाऊंनी दिले.
युवा कर्मचाऱ्याच्या वेदना त्यांची धडपड युवा नेतृत्व म्हणून आमदार बंटीभाऊ भांगडीया सारखे तरुण तडफदार व्यक्तिमत्वच समजू शकते हे या निमित्ताने सिद्ध झालं.
या भेटीतून *'श्री. बंटीभाऊ भांगडीया म्हणजे माझा आमदा, माझे नेतृत्व'* म्हणण्याची एक वेगळी उर्मी व अभिमान आम्हच्यात निर्माण झाला.
*भाऊ आपले खूप खूप आभार...*
यावेळी कार्यतत्पर नागभीड तालुक्याचे तालुका अध्यक्ष सतिष मेश्राम व चिमूर तालुकाध्यक्ष संदीप उपरे, श्री. लखन साखरे,श्री. गुरुदेव पिसे,श्री. प्रवीणशेंडे, मंदे सर, जांभूळे सर, सरोज चौधरी सर आणि मी उपस्थित होतो.
👏
आपला
*सुनिल दुधे*
राज्यसल्लागार
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*
(8275397373/9673033887)
No comments:
Post a Comment