DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Friday, August 7, 2020

NPS भारत छोडो अभियान

 प्रति,

सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य

तालुका अध्यक्ष/पदाधिकारी व सदस्य


विषय:दिनांक 8 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित होणाऱ्या पेंशन अभियानाबाबत


चंद्रपुर जिल्ह्यातील जूनी पेंशन हक्क संघटनेतील सर्व शिलेदाराना सूचित करण्यात येत आहे की,सध्या कोरोनाचे सावट असल्याने आंदोलन,मोर्चे करू शकत नाही परंतू आपली न्याय हक्क व रास्त मागणी सरकार पर्यत पोहचविन्यासाठी सोशल मिडियावर सक्रिय राहणे अत्यंत आवश्यक आहे.ऑगस्ट महीना हा क्रांती साठी प्रसिद्ध आहेच हे तुम्ही जाणता आहेतच.भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक क्रांतिकारी युवकांनी प्राणाची आहूती दिली आहे.सततच्या संघर्षातून यशाची फळे निश्चित चाखायला मिळतील यासाठी सर्व अंशदायी पेंशनधारकांनी लढ़यात सक्रिय राहून विरोध करावा यात मागील महिन्यातील 10 जुलै 2020 ची अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम 1977 आणि नियमावली 1981 मधील नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेच्या व्याख्यावरच शासनाने घाला घातलेला आहे त्यामुळे    1 नोव्हेबर 2005 रोजी संस्था 100 टक्के अनुदानधारक नाही या सबबी खाली जूनी पेंशन पासून वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव हाणुन पाडन्यासाठी 8 ऑगस्ट रोजी E-MAIL द्वारे (asc.schedu@maharashtra. gov.in) आक्षेप नोंदवून अधिसूचनेला तीव्र विरोध दर्श्ववावा.


       तसेच त्याच दिवशी देशपातळीवर मा. पंतप्रधान यांना व राज्य पातळीवर मा. मुख्यमंत्री यांना *31 ऑक्टोबर 2005* ची अधिसूचना रद्द करून जूनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी ईमेल द्वारे करायची आहे व ईमेल केल्याची प्रसिद्धि वाट्सएप्प,फेसबुक यासारख्या माध्यमातून करावी.


   9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य सम्पूर्ण भारतात *NPS भारत छोड़ो* अभियान ट्विटर वर राबविले जात आहे तरी चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व DCPS/NPS कर्मचार्यांनी *NPS निजीकरण भारत छोड़ो* हा हैशटैग वापर ट्वीट व रीट्वीट करावे असे आवाहन चंद्रपुर जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटना करीत आहे.


आपलीच जिल्हाकार्यकरिणी

चंद्रपुर जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटन

Tuesday, December 17, 2019

*शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवन्यास आनंद वाटेल*
*शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात*

*जुनी पेन्शन शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची पेन्शन हक्क  संघटन कडून आग्रही  मागणी*
🔛🔛🔛🔛🔛🔛🔛
*बुधवारी नागपुरात होणार संघटन विश्वस्त मंडळाची बैठक*
🔛🔛🔛🔛🔛🔛🔛

*आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून मा.ना.एकनाथजी शिंदे,मा.ना. बाळासाहेबजी थोरात यांची भेट घेवून जुनी पेन्शन व शिक्षण विषयक प्रश्नाबाबत निवेदन देवून चर्चा करण्यात आली.यावेळी मा.आमदार रोहित दादा पवार,मा.आमदार विश्वजीत कदम साहेब,मा.आमदार मानसिंग भाऊ नाईक,मा.आमदार विक्रमदादा सावंत,मा.शिक्षक आमदार विक्रम काळे,मा.आमदार भारत नाना भालके,खा.हेमंत गोडसे यांची ही भेट घेवून चर्चा केली.*

यावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या  प्रलंबित प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी प्रामुख्याने जुनी पेन्शन व शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची आग्रही मागणी केली. शिक्षण मंत्री महोदयांनी सर्व मुद्द्यांची माहिती घेवून सकारात्मक कार्यवाही केली जाईल.शिक्षण सेवक मानधन वाढीसाठी वित्त विभागासोबत चर्चा केली जाईल असे सांगितले.खरेतर सरकार स्थापन होऊन खूप कमी दिवस झाले आहेत.आजची भेट ही प्राथमिक होती.पुन्हा एकदा पेन्शन लढा निर्णायक करण्यासाठी पूर्वतयारी करण्याचा आजचा दिवस.उद्याही पाठपुरावा सुरू राहील...

शिक्षण मंत्री महोदयांना दिलेले निवेदनातील मुद्दे

*1. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.*

*2. शिक्षण सेवक पद्धती बंद करण्यात यावी व सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवकाना मानधन प्रतिमाह एकवीस हजार रुपये करण्यात यावे.*

*3.सातव्या वेतन आयोगातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत त्रुटी दूर करण्यात याव्यात.*

4. नवीन आश्वासित प्रगती योजना 10,20,30 शिक्षकांना लागू करण्यात यावी.

5.मृत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान शासन निर्णयातील दहा वर्षाची अट रद्द करण्यात यावी.

6.बी. एल.ओ.सारख्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी....

7.शालेय पोषण आहार योजनेत सुधारणा करून केंद्रीय स्वयंपाकगृह द्वारा पोषण आहार वितरित करण्यात यावा.

8.शिक्षण विभागांतर्गत रिक्त विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक पदे तात्काळ भरण्यात यावीत.

*यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,सरचिटणीस गोविंद उगले,राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार,नागपूर विभागीय अध्यक्ष अशुतोष चौधरी,विश्वस्त अमोल  शिंदे,नवनाथ धांडोरे,नदीम पटेल,शैलेश राऊत,कुणाल पवार,अनिल वाकडे,गुरुदेव नवघडे,बापू मुनघाटे,पुरषोत्तम हटवार हे उपस्थित होते.*

शब्दांकन....

*🖋अमोल शिंदे 🖋*
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली..
✊✊✊✊✊✊✊✊✊
👇👇👇👇👇👇👇👇

Sunday, December 1, 2019

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*महाविकस आघाडी सरकार शिक्षकांसाठी पहिल्याच दोन महिन्यांत घेणार पुढील महत्वाचे 10 निर्णय - सूत्र*

*1) DCPS बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणार.*
*2) अश्वासित प्रगत योजना 10, 20 व 30 वर्षे नोकरीत कालबद्ध पदोन्नती विना आट लागू करणार.*
*3) 2004 व 2005 ला नोकरीला लागल्याल्या शिक्षकांच्या 7 वा वेतन आयोगातील त्रृटी दुर करणार.*
*4) मुख्यालय राहण्याबाबत ग्राम सभेचा ठराव चा शासन निर्णय रद्द करणार.*
*5) कॅशलेश मेडिक्लेम सेवा सुरू होणार.*
*6) वय वर्षे 55/60 किंवा सेवा 33 वर्षे सेवानिवृत्त शासन निर्णय रद्द करणार.*
*7) केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी पदे प्रमोशनने लवकरच शिक्षकांमधुन भरणार.*
*8) पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करुन विद्यार्थ्यांना मध्यवर्ती किचनगृहातुन मिळणार दर्जेदार आहार व शिक्षकांवरील जबाबदारी काढणार.*
 *9)क्लस्टर (केंद्र) स्तरावर पगार, ऑनलाईन कामे व डेटा एंट्री इत्यादीसाठी एक क्लर्कचे पदे निर्माण करणार.*
*10) खाजगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी CET व TET परिक्षा पास शिक्षकांची नियुक्ती करणार.*
🤝🏻🤝🏻🙏🏻🙏🏻🤝🏻🤝🏻🙏🏻🙏🏻🤝🏻🤝🏻
*सरकार एवढे चांगले निर्णय घेणार आहे तर ही पोस्ट सर्व शिक्षकांपर्यंत पोहचलीच पाहिजे.*

Monday, September 9, 2019

✊✊✊✊✊✊✊✊✊
     *मनापासून हार्दिक आभार*
✊✊✊✊✊✊✊✊✊
   *महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
        *शाखा चंद्रपूर*
🏵🏵🏵✊✊🏵🏵🏵🏵



*काल पुकारलेल्या राज्यस्तरीय संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले ,समन्वय समिती पदाधिकारी, खाजगी अनुदानित , विनाअनुदानित व जि‌.प.शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,कें. प्र., वि.अ., लिपिक वर्ग, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा कर्मचारी संघटना चे सदस्य, सर्व dcps शिलेदार, सर्व  शासकीय शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी , सर्व जेष्ठ बांधव ( जे आपले गुरुजन व मार्गदर्शक ), सर्व DCPS / NPS बांधव.....*
💐💐💐💐💐💐💐💐💐
       *विशेष आभार  म्हणजे आपल्या लहान बांधवांचे हित जोपासण्यासाठी राज्य नेत्यांचा रोश पत्करून सहभागी झालेल्या काही संघटनांचे पदाधिकारी तथा शिलेदार तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व  महिला भगिनी व आमच्या कट्टर dcps महिला शिलेदार  यांची भव्य दिव्य उपस्थिती यांचे ही खूप खूप आभार*
💐💐💐💐💐💐💐💐
     *सर्व पत्रकार मंडळी,मिडिया रिपोर्टर व या संपासाठी अहोरात्र कष्ट घेणारी माझी dcps जिल्हा व "तालुका कार्यकारिणी" यांचे ही आभार*
✊✊✊✊✊✊✊✊👍
       *अशीच एकजूट जर आपली राहिली तर आपल्याला सर्वांचे हित जोपासता येईल...चला तर अशीच एकजूट दाखवून भविष्यातही आपल्यावरील अन्यायाचा सर्वांनी मिळून सामना करुयात....चंद्रपूर जिल्हातील एकजूट पाहून खरोखर मन भरून गेले...*
.... *शेवटी सर्वांचे शतशः आभार....* *आभार...‌.आभार*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


   म.रा.जु.पेन्शन हक्क संघटन कोरपना
 *समस्त DCPS/NPS धारक बांधव चंद्रपूर जिल्हा*.
*👏👏जाहीर आभार👏👏*

     तिसऱ्यांदा जुनी पेन्शनचा नारा घुमला चंद्रपुरात...

*तुम्हा सर्वांची साथ,त्यामुळेच घडत आहे जुनी पेन्शनची बात*

चंद्रपुरात भव्यदिव्य संपात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार...

जुनी पेंशनचा आवाज बुलंद करणाऱ्या मातृतुल्य,पितृतुल्य सर्व संघटनेच्या पदाधिकारी व शिलेदारांनी अभूतपूर्व संप घडवून आणला त्याचे सर्वस्वी श्रेय तुम्हच्यामुळेच....

जवळपास 45 संघटना सहभागी झाल्या होत्या.व सर्वांनी संपात सहभागी होऊन जुनी पेंशन ह्या मूळ मागणीसह एकूण 13 मागण्या होत्या.आपल्या समन्वय समिती ला बुधवार ला बोलविले आहे.त्यात चर्चा सकारात्मक न झाल्यास 13 सप्टेंबर पासून बेमुदत संपाची हाक देण्यास आपण तयार असावे.

*अब की बार,पेंशन देनेवालो की सरकार*

आपल्या चंद्रपुर जिल्ह्यात काही पदाधिकाऱ्यांचे मन दुखले असल्यास माफी मागतो व पुढील लढ्यात सक्रिय होऊन चुका दुरुस्त करू या....

इतर विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती व राहीलच 
ही अपेक्षा

आपलाच
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी,शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपुर

Wednesday, September 4, 2019

👏🏻
मित्रांनो नमस्कार,

   *९ तारखेचा संप यशस्वी होण्यासाठी आपण सारेजण अगदी मनपूर्वक प्रयत्न करीत आहात, त्याबद्दल सर्व शिलेदारांच्या कार्याला सलाम!!*
     मित्रांनो,
चंद्रपुर जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षक संघटना आणि इतर संघटना च्या जिल्हाध्यक्ष यांना माझे बोलणे झाले आहे. सर्व जण संपात सक्रिय सहभाग घेण्यास तयार आहे. मग आपण मागे लपायचे का? वरिष्ठ बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करणार आहेत. 

*सक्रिय सहभाग घेणाऱ्या संघटना* : 

१) महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती
२) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
३) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
४) कास्त्राईब शिक्षक संघटना (सर्व)
५) बहुजन शिक्षक संघटना
६) आखिल भारतीय शिक्षक संघटना
७) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना
८) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
९) महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन
१०) आरोग्य कर्मचारी संघटना
११) ग्रामसेवक संघटना
१२) आय टी आय संघटना
१३) लिपिक  वर्गीय संघटना
१४) केंद्रप्रमुख संघटना
१५) मुख्याध्यापक संघटना
१६) विस्तार अधिकारी संघटना
१७) प्रहार शिक्षक संघटना
१८) शिक्षक सहकार संघटना
१९)अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ
२०)डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
२१)उर्दू शिक्षक संघटना
२२)एकल शिक्षक संघटना
२३)महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
२४)राष्ट्रवादी शिक्षक संघटना
२५)मनसे शिक्षक सेना
२६)शिक्षक भारती
२७)इबटा शिक्षक संघटना
२८)परिचारिका संघटना
२९) मुप्टा संघटना
३०) वसंतराव नाईक कर्मचारी संघटना
३१) धनगर कर्मचारी संघटना
३२) रा.स.प. कर्मचारी संघटना
  सर्व तालुका अध्यक्ष यांनी तालुक्यातील सर्व संघटना अध्यक्ष यांच्याशी संपर्क करावा. आणि संपात सहभागी होण्यासाठी विनंती करावी.
पुढील नियोजन :
१) ५ सप्टेंबर शिक्षक दिनी सर्वांनी काळया फिती लावून निषेध व्यक्त करावा.
२) ६,७, आणि ८ ला सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.
३) ९ तारखेला सर्व शिलेदार जिल्ह्याला जमा होतील, आणि तेथून मोर्चा निघणार आहे.
४) *दुपारी ३ वाजता सर्व तालुका आणि जिल्हा पदाधिकारी आणि सर्व शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष, राज्याध्यक्ष, व राज्य पदाधिकारी यांची सभा होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
------------------------------------------
आपले विनीत
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी,शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपुर

*_दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष_*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन चंद्रपुर

Sunday, August 25, 2019

28 तारीख पेंशन लक्षवेधी दीन सर्व जिल्ह्यात तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर

5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर पासून काळी फित लावून काम करणे

9 तारीख एक दिवसीय संप
मागणी मान्य न झाल्यास

11 तारीख पासून बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे

समन्वय समिती चा निर्णय घोषित करण्यात आला आहे.

मिलिंद सोळंके अमरावती विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन