प्रति,
सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य
तालुका अध्यक्ष/पदाधिकारी व सदस्य
विषय:दिनांक 8 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित होणाऱ्या पेंशन अभियानाबाबत
चंद्रपुर जिल्ह्यातील जूनी पेंशन हक्क संघटनेतील सर्व शिलेदाराना सूचित करण्यात येत आहे की,सध्या कोरोनाचे सावट असल्याने आंदोलन,मोर्चे करू शकत नाही परंतू आपली न्याय हक्क व रास्त मागणी सरकार पर्यत पोहचविन्यासाठी सोशल मिडियावर सक्रिय राहणे अत्यंत आवश्यक आहे.ऑगस्ट महीना हा क्रांती साठी प्रसिद्ध आहेच हे तुम्ही जाणता आहेतच.भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक क्रांतिकारी युवकांनी प्राणाची आहूती दिली आहे.सततच्या संघर्षातून यशाची फळे निश्चित चाखायला मिळतील यासाठी सर्व अंशदायी पेंशनधारकांनी लढ़यात सक्रिय राहून विरोध करावा यात मागील महिन्यातील 10 जुलै 2020 ची अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम 1977 आणि नियमावली 1981 मधील नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेच्या व्याख्यावरच शासनाने घाला घातलेला आहे त्यामुळे 1 नोव्हेबर 2005 रोजी संस्था 100 टक्के अनुदानधारक नाही या सबबी खाली जूनी पेंशन पासून वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव हाणुन पाडन्यासाठी 8 ऑगस्ट रोजी E-MAIL द्वारे (asc.schedu@maharashtra. gov.in) आक्षेप नोंदवून अधिसूचनेला तीव्र विरोध दर्श्ववावा.
तसेच त्याच दिवशी देशपातळीवर मा. पंतप्रधान यांना व राज्य पातळीवर मा. मुख्यमंत्री यांना *31 ऑक्टोबर 2005* ची अधिसूचना रद्द करून जूनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी ईमेल द्वारे करायची आहे व ईमेल केल्याची प्रसिद्धि वाट्सएप्प,फेसबुक यासारख्या माध्यमातून करावी.
9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य सम्पूर्ण भारतात *NPS भारत छोड़ो* अभियान ट्विटर वर राबविले जात आहे तरी चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व DCPS/NPS कर्मचार्यांनी *NPS निजीकरण भारत छोड़ो* हा हैशटैग वापर ट्वीट व रीट्वीट करावे असे आवाहन चंद्रपुर जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटना करीत आहे.
आपलीच जिल्हाकार्यकरिणी
चंद्रपुर जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटन
No comments:
Post a Comment