🌻🌻🌻🌹🌹🌻🌻🌻
महाआक्रोश मुंडन मोर्चा गीत..
झोपेतून आता तरी तू उठ रे लेका
भविष्याचा आहे तुझा प्रसंग बाका
चल पेंशन आंदोलनाचा साथीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
अन्यायाविरुद्ध लढू, आता आपण बंड करू
चुकीच्या शासन निर्णयांना कायमचे बंद करू
सोड ते मौन चल लढ्याचा शिलेदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
शिक्षणसेवक,dcps, २३/१० आता खूप झाले
अन्यायाचा पहिला बळी ठरून सारं सहन केले
पुरे ही नाटकं चल लढ्याचा तू भागीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
नक्की मिळेल जे हवं धार लढ्याची तेज करू
सगळ्यांच्या एकीने सरकारला ही पुरून उरू
उठ मित्रा तुझ्या न्यायाचा हकदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
दिनांक 18/12/2017 च्या नागपूर विधानभवनावरील महाआक्रोश मुंडन मोर्चात सगळ्यांनी सामील व्हा...
समान काम समान वेतन समान पेंशन....
एकच मिशन....
जुनी पेंशन....
____________________________________
No comments:
Post a Comment