DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Friday, March 9, 2018

राज्य सरकारी मृत कर्मचाऱ्यांना फॅमिली पेंशन देणार - ना. सुधीर मुनगंटीवार
आमदार प्रणिती शिंदे यांची यशस्वी मध्यस्थी : पेंशन हक्क संघटनेच्या मागणीला यश
मुंबई(प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा अकाली मृत्यू झाल्यास परिवारास सरकार कडून कोणतीच  मदत अथवा पेंशन दिली जात नव्हती, ही गोष्ट खूप गंभीर व संवेदनशील आहे, म्हणून मृत कर्मचाऱ्यांच्या परिवारास कुटुंब वेतन द्यावे ही महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्या मुळे सरकारला मान्य करावी लागली, आज विधानभवनात या विषयावर आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ते जगदिश ओहोळ, राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे, राज्य संघटक शहाजी गोरवे, सोलापूर जिल्हाध्यक्ष नवनाथ धांडोरे, सोलापूर शहराध्यक्ष सुदर्शन वऱ्हाडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे झालेल्या सावित्रीची छाया पुरस्कार वितरण सोहळ्यात  'मृत कर्मचारी फॅमिली पेंशन' योजना लागू करण्यासाठी मी पाठपुरावा करणार व प्रसंगी तुमच्या सोबत रस्त्यावरील लढाईत उतरणार असे आश्वासन दिले होते , त्याची त्यांनी पूर्तता केली. त्याबद्दल जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment