DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Sunday, April 29, 2018

📢

*चलो दिल्ली*...

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची टिम व शेकडो शिलेदार दिल्ली येथे पोहचले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की *महाराष्ट्र चे सुपुत्र जुन्या पेंशन साठी जिवाचे रान करणारे प्रदिप सोनटक्के सर आज म्हणजे 29 एप्रिल ला संध्याकाळी 6.30 वाजता इंडिया गेट ला येणार आहेत व त्याच्या बरोबर आपली महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची पुर्ण टिम इंडिया गेट ते महाराष्ट्र सदन पर्यंत धावत आपल्या महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातुन आलेल्या तमाम शिलेदारांना विनंती आहे की आज म्हणजे 29 एप्रिल ला संध्याकाळी 6.30 इंडिया गेट ला एकत्रीत येऊन महाराष्ट्रातुन आलेल्या प्रदिप सोनटक्के सरांना आत्मबळ देऊया*...

उद्या परत इंडिया गेट पासुन रामलीला मैदान पर्यंत दौड लावुनच आपण रामलीला मैदान प्रदिप सोनटक्के सरांबरोबर गाठणार आहोत..


टिप :- दिल्ली मध्ये दाखल झालेल्या सर्व शिलेदारांनी आज संध्याकाळी 6.30 ला इंडिया गेट येथे एकत्रित येऊन सहकार्य कराल यात शंका नाहीच


राज्याध्यक्ष
वितेश खांडेकर
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.

Monday, April 23, 2018

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

      आज मुंबई हायकोर्टात 23 एप्रिल 2018 रोजी ...मा न्यायमूर्ति गवई साहेब, व न्यायमूर्ति डांगरे मॅडम यांच्या कोर्टसमोर जुनी पेंशनसाठी  व dcps कपातीं स्थगिति विषयक सुनावनी झाली...

आज सुरूवातीसच *dcps कपातींवरील स्टे उठवावा* म्हणून सरकारी वक़िलानी बाजू लावून धरली...यावर आपले वकील सन्मा.अम्बेतकर साहेब व सन्मा.कातनेश्वरकर साहेबांनी आक्षेप घेत स्टे उठवू नये म्हणून बाजू लावून धरली *"3692/2017 या याचिकेत "by way of ad interim order, we grant stay to the impugned recovery"10 jully 2017 अस स्पष्ठ उल्लेख असताना स्टे उठवने म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरेल ,शिवाय असे आदेश असताना शासनाने कर्मचारी वर्गाकडून काही लेखी लिहून घेणे म्हणजेही न्यायालयीन अवमानच आहे असेही सांगितले!"*....या दोन्ही बाजू ऐकून घेवून न्यायालयाने dcps कपात विषयी कोणतीही ऑर्डर पास करण्यास नकार दिला...💐💐💐स्टे कायम ठेवण्यात आपल्याला यश आले!!


    मित्रहो!  जुनी पेंशनविषयी कोर्टसमोर लढत असताना एक गोष्ठ मात्र आत्ता स्पष्ठ लक्षात येत आहे की, शासन dcps स्टे उठवन्यासाठी पार आटापीटा करत आहे... *"dcps स्टे मुळे शासनाची चांगलीच कोंडी झालेली आहे,...आपल्या साठी जुनी पेंशनची वाटचाल सुकर झालेली आहे".* स्टे उठवन्यासाठी शासनाचे आता afidavite ने भागले नाही म्हणून शासनाने  पुनर्विचार याचिकाही दाखल केली आहे...लवकरच त्याची  कॉपी/नोटिस आपल्याला मिळेल, एवढेच नाहीतर 3692 /2017 या याचिकेसाठी  विशेष सरकारी वकीलांची नेमनुक़ केल्याचीही चर्चा आज ऐकायला मिळाली...प्रतिस्पर्धी मैदानात आपली बाजू जोरदार लावून धरत आहे, त्यासाठी सर्व प्रयत्नांची शिकस्त करत आहेत ...यामुळे  एवढे नक्की समजत आहे की, आपली लढाई योग्य दिशेने सुरु आहे!


आपल्या वकीलांच्या  सर्व याचिका club विषयी माहिती घेतल्यानंतर 19 जुनला सर्व मॅटर ठेवण्यात येणार आहेत, व जुनी पेंशनची पुढील सुनावनी 11 जुनला ठेवण्यात आली आहे!!
       आपल्या सर्वांच्या माहितीसाठी कोर्टसमोरील हे वरील वास्तव चित्रण.🙏🏻🙏🏻



      आपलाच
*राजेंद्र फुलावरे*
*रायगड जिल्हाध्यक्ष*
*म रा जु पे हक्क संघटन*

Saturday, April 14, 2018

*!! महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन !!*

🚩  *लाँगमार्च आंदोलन व आमरण उपोषण प्रस्ताव* 🚩

👏
     मा. सर्व विश्वस्त, सर्व राज्यकार्यकारिणी व सर्व जिल्हाध्यक्ष 7 तारखेच्या घंटानाद आंदोलनानंतरही शासनाने जुनी पेंन्शन ची मागणी पूर्ण न केल्यास  त्यानंतर आरपारची लढाई म्हणून लाँगमार्च व आमरण उपोषण आंदोलनाचा सर्वसाधारण प्रस्ताव व पुर्व नियोजन आपल्यासमोर मंजुरी साठी ठेवत आहोत. सर्वानी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा. ही विनंती.

🚩 *आंदोलनाचे स्वरूप-*
           शिवभूमी(शिवनेरी किल्ला) ते मुंबई लाँगमार्च करणे तरीही शासनाने जुन्या पेन्शनचा gr न काढल्यास मंत्रालयासमोर आमरण  उपोषणास बसणे व जो पर्यंत शासन जुन्या पेन्शनचा gr काढत नाही तो पर्यत उपोषण न सोडणे.

🚩 *प्रस्तावित कालावधी व दिनांक* 🚩
         -  दिनांक 1 जून ते 6 जून 2018 लाँगमार्च व पुढे 7 जून पासून मागणी पूर्ण होईपर्यत आमरण उपोषण.

    🔹 *लाँगमार्च प्रस्ताव*   🔹
 
▪ *प्रस्तावित ठिकाण व अंतर-* शिवनेरी किल्ला ते चैत्यभुमी मुंबई व नंतर मंत्रालय घेराव अस सरासरी 175 किमी. अंतर 
▪ *प्रस्तावित कालावधी-*
      दि.1 जून ते 6 जून 2018 एकूण 6 दिवस.
▪ *लाँगमार्च स्वरूप*
1) *पेंन्शन यात्रा व बाईक रॅली-*  शिवनेरी वंदन करून राज्यकार्यकारिणी शिवनेरी पासून 100किमी अंतर  बाईक रॅली काढेल.
2) *पायी लाँगमार्च-* पुढील 75 किमी मंत्रालयापर्यंतचे अंतर महाराष्ट्रातील सर्व शिलेदारासह दररोज 15 कमी प्रमाणे 5 दिवस पायी लाँगमार्च केल्या जाईल.

▪ *सहभागी शिलेदार-*
  प्रत्येक जिल्हयातून 500 कर्मचारी सहभागी होणे अनिवार्य
36 जिल्हयाचे मिळून 18 हजार व स्थानिक कोकणातील 2 हजार अधिकचे असे 20 हजार कर्मचारी सहभागी होतील.(ही संख्या कमीत कमी आहे एवढे येणे आवश्यक आहे.) 

▪ *प्रस्तावित खर्च-* - 

1) *जेवण व नास्ता- 25 लाख  रुपये*-    
2) *मंडप, बिछायात व साउंड सिस्टीम- 10 लाख रुपय*
3) *वाहन खर्च- 1 लाख रुपये-*
4) *इतर झेंडे, बॅनर, नियोजन टीम प्रवास, जेवण इत्यादी किरकोळ खर्च- 2 लाख रुपये*

👉 *सर्व एकूण खर्च अंदाजे- 38 लाख रुपये*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

   🔹 *आमरण उपोषण प्रस्ताव* 🔹

▪ *आमरण उपोषण म्हणजे-* पाणी वगळता इतर कोणताही द्रव्य की खाण्याचा पदार्थ न खाता सतत उपोषण.
▪ *प्रस्तावित ठिकाण-*
 मंत्रालय, आझाद  मैदान
▪ *प्रस्तावित कालावधी-*
दि.7 जून 2018 पासून मागणी पूर्ण होई पर्यंत 
▪ *सहभागी शिलेदार-* प्रत्येक तालुक्यातून एक प्रमाणे 350 व राज्य व जिल्हा पदाधिकारी इच्छुक मिळून 500 कर्मचारी उपोषणाला बसतील.
▪ *प्रस्तावित खर्च-*
1) *मंडप व डेकोरेशन व  इतर किरकोळ - 6 लाख रुपये*   
2) *मीडिया खर्च - 6 लाख रुपये*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🚩 *सर्व एकूण खर्च-* 🚩
*लाँगमार्च 38 लाख +उपोषण 6 लाख + मीडिया 6 लाख = एकूण 50 लाख रुपये अंदाजे.*

👏👏👏👏
        सर्व जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांना विनंती खालील बाबी सर्वाना पूर्ण करणे शक्य झाल्यासच हे आंदोलन करता येईल.
👇 *प्रत्येक जिल्हयातून खालिल बाबीची संमती व तयारी असावी* 👇
1) *प्रत्येक जिल्हा 500 कर्मचारी पूर्ण 5 दिवस हजर असणे.*
2) *प्रत्येक जिल्हयाने प्रत्येक  तालुक्यातील एक कर्मचारी आमरण उपोषणाला तयार करणे.( हा कर्मचारी लाँगमार्च मध्ये चालणार नाही.)*
3) *50 लाख खर्च बघता- प्रत्येक जिल्हा सरासरी 1 ते दीड लाख रुपये निधी संकलित करून देणे. किंवा जिल्ह्यातील तालुक्याची कमी अधिक संख्या लक्षात घेऊन 350 तालुक्यातून 15 तव 20 हजार रूपये प्रमाणे निधी गोळा करणे*

     👏 करिता वरील सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून  चर्चा व मंजुरीसाठी प्रस्ताव प्रस्तावित.

               🚩 आपली 🚩
*सर्व विश्वस्थ व राज्यपदाधिकारी टीम*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन


    ✍         
        *सुनिल दुधे*
        राज्यसल्लागार
(8275397373, 9673033887)
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*

Wednesday, April 11, 2018

*!..महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन..!*

सहकाऱ्यांनो नमस्कार..🙏🏻
(पोस्ट टाकायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ज्यावर नंदकुमार साहेबांनी सुधारणेबाबत  लेखी दिले त्या पत्राची प्रत काल मिळणार होती , परंतु ती काही कारणास्तव मिळू शकली नाही.. ती पुन्हा मंत्रालयात गेल्यावर मिळेल..)

                 *परवा दि. ०९ रोजी घंटानाद आंदोलनानंतर तातडीने आपली टीम* मंत्रालयीन पाठपुरावा करण्याकरिता मंत्रालयात पोहचली...

• *वितेशभाऊ खांडेकर*, कणखर राज्याध्यक्ष
• *गोविंदभाऊ उगले*, झंझावाती राज्य सचिव
• *प्रवीण बडे*, अभ्यासू राज्य कोषाध्यक्ष
• *शैलेश पाटील*, दिलदार राज्य उपाध्यक्ष
• *राजेंद्र फुलावरे*, तडफदार रायगड जिल्हाध्यक्ष 
• *मी (प्राजक्त झावरे-पाटील)* उपस्थित होतो..

                 *शिक्षणमंत्री - मा. विनोद तावडे साहेब व शिक्षण सचिव - मा. नंदकुमार साहेब*
या दोन महत्त्वाच्या भेटी त्या दिवशी आम्ही घेतल्या , वित्तमंत्री उपस्थित नसल्याने ती भेट होऊ शकली नाही...
___________________________________
● *शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब :-*
                   २३/१० च्या GR मध्ये सुधारणा करण्यास आम्ही अनुकूल असून लवकरात लवकर शाळासिद्धी मधील भौतिक सुविधा हा मुद्दा वगळून सुधारित  GR  येणार आहे.. गुणवत्तेशी कोणतेही तडजोड न करता इतर बाबी त्यातून लवकरच वगळल्या जातील..
*एकंदरीत शाळा प्रगत असणे हाच निकष त्यात शिल्लक असेल* असे आपल्याशी झालेल्या चर्चेतून समोर आले..
त्यांनी संबंधित PA ना लेखी देऊन तात्काळ सुधारीत GR काढण्याचे आदेश दिले आहेत..

● *शिक्षण सचिव नंदकुमार साहेब :-*
                मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या भेटीनंतर आपली टीम शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेबांना भेटली..
२३/१० चा शासन निर्णय व त्याचे सर्व पैलू व आपले आक्षेप आम्ही नंदकुमार साहेबांसमोर मांडले.
*"गुणवत्ता देणे हे RTE कायद्यातील तरतुदीनुसार बंधनकारक असल्याने गुणवत्ता सोडता इतर सर्व बाबी आपण त्यातून वगळू असे आश्वासन त्यांनी दिले..* व ताबडतोब सदरचा GR बदलण्याचे आदेश देखील त्यांनी *आपल्या निवेदनावरती लिहून लेखी स्वरूपात "संबंधित GR काढणाऱ्या उपसचिवांकडे" दिले..*
लवकरच सुधारित GR अपेक्षित आहे..
                 मित्रांनो आपण दिलेल्या खरमरीत निवेदनाच्या शेवटचा उतारा पुन्हा वाचताना साहेबांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया बदलत गेली होती, त्यातूनच सुधारणेला वेग येईल असे अपेक्षित आहे..

*बंधू-भगिनींनो,*
_आपल्या घंटानादचा आवाज नक्कीच जोरदार होता, असे चित्रच यावरून दिसत आहे.._
_जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत प्रत्येक आठवडयात आपण मंत्रालयात भेट देणार असून सुधारित GR घेऊनच आपण आता शांत बसणार आहोत..!_
_____________________________________
*शिवनेरी ते चैत्यभूमी लॉंग मार्च व आमरण उपोषण:-*
                       मंत्रालयीन पाठपुराव्यानंतर शिवनेरी ते चैत्यभूमी लॉंग मार्च बाबत चर्चा देखील झाली असून त्याचा *कच्चा आराखडा तयार करण्यात आला.*
त्याबाबत लवकरच राज्याध्यक्ष आपल्याला पुढील सूचना देतीलच..!
तसेच
_मा. मुख्यमंत्री साहेबांना  *लॉंग मार्च बाबत दिलेले निवेदन कायदेशीर* पूर्ततेसाठी  आपणास देखील  *जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यायचे असल्याने* त्याबाबतही अधिकची माहिती लवकरच आपल्या उपलब्ध करून दिली जाईल...!_

मित्रांनो...!
*जुन्या पेन्शनच्या लढ्यातील निर्णायक लढाईला आता आपण सर्वांनी मानसिक व शारीरिक दृष्टीने तयार होणे  अतिशय महत्वाचे आहे..*
लॉंग मार्च व आमरण उपोषण या करिता आवश्यक शारीरिक क्षमता व संबंधित असणारी सर्व शास्त्रीय माहिती आम्ही मिळवत असून लवकरच आपणापर्यंत पोहचवू...

*चला तर मग आजपासूनच दररोज चालण्याचा व्यायाम / सराव सुरू करू..*
          _सशक्त तर होउच आणि पेन्शनच्या लढाईत अजिंक्य सुद्धा...!_

*कायम आपलाच*
प्राजक्त झावरे-पाटील
८८९८८८०२२२/९८३३७८१८१७
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*

Saturday, April 7, 2018

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

                     जाहीर आभार

म. राज्य जुनी पेंशन हक्क संघटन चंद्रपूर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

                आज दिनांक 7 एप्रिल 2018 ला महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे भव्य एकदिवसीय घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते..
             सदर घंटानाद आंदोलन हजारो कर्मचाऱ्यांच्या साक्षीने व आक्रमकतेने संपन्न झाले.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

👉 ज्यांच्या उपस्थितीमुळे आजचा घंटानाद आंदोलन यशस्वी झाला असे उपस्थित झालेले सर्व डी.सी.पी.एस व सर्व एन.पी. एस. धारक सर्व राज्य कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार व सलाम🙏
👉 संपूर्ण म.रा. जू. पे. हक्क. संघटन तालूका अध्यक्ष तथा संपूर्ण तालूका कार्यकारिणी व तालूक्यातील सर्व सदस्य यांचे मनपूर्वक आभार तथा सलाम🙏
👉 अहोरात्र परिश्रम करुन घंटानाद आंदोलन यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या माझ्या तमाम झुंजार डिसीपीएस पेशंन फायटरस यांचे मनपूर्वक आभार तथा सलाम🙏
👉आजच्या घंटानाद आंदोलनात आपल्या नेतृत्वाची छाप पाडलेले माझे सर्व जिल्हा पदाधिकारी यांचे जाहीर आभार तथा सलाम🙏
👉 तसेच आजच्या आंदोलनाला सक्रीय पाठींबा व सक्रीय उपस्थिती दर्शविणाऱ्या सर्व कर्मचारी संघटना व सर्व शिक्षक संघटना यांचे मनपूर्वक आभार तथा सलाम🙏
👉आपले काम बाजुला सारून,  रखरखत्या उन्हात दुपारी दोन ते पाच वाजेपर्यत पाणी पिण्यास सुध्दा न उठणाऱ्या माझ्या भगिनींना त्रिवार सलाम🙏

तुम्ही केलेला संघर्ष वाया जाणार नाही, बांधवानो...

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

       आज विशेष उपस्थिती दर्शविणारे आमच्या संघटनेचे राज्य सल्लागार मा. श्री. सुनिल दुधे सर व महिला राज्य उपाध्यक्षा मा. कु. मनिषा मडावी मॅडम यांचे विशेष आभार

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

             सर्वांचे मनपूर्वक आभार
          
          जिल्हाध्यक्ष/जिल्हासचिव,
            सर्व जिल्हापदाधिकारी
    म.रा. जुनी पेंशन हक्क संघटन चंद्रपूर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Friday, April 6, 2018

*!! महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन !!*

     🛎 *घंटानाद आंदोलन* 🛎

🔹 *सर्व जिल्ह्याचा आढावा* 🔹

👏
     दि.7 एप्रिल 2018 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या घंटानाद आंदोलन संदर्भात आंदोलन, परवानगी, प्रसिद्धी बाबत विभागनिहाय आढावा जाहीर करीत आहोत.

▪ *नागपूर विभाग* ▪
1) नागपूर - (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
2) चंद्रपूर- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
3) भंडारा -((घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
4) वर्धा - (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
5) गोंदिया- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
6) गडचिरोली - (रक्तदान व धरणे) (प्रसिध्दी झाली)

   ▪ *अमरावती विभाग* ▪
7) अमरावती- (धरणे) (प्रसिद्धी झाली)
8) यवतमाळ -(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
9) अकोला- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
10) वाशिम- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
11) बुलढाणा-(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)

▪ *औरंगाबाद विभाग* ▪
12) औरंगाबाद -(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
13) बीड- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
14) लातूर - (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
15) उस्मानाबाद-(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
16) हिंगोली- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
18) परभणी- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
19) जालना- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
20) नांदेड- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)

▪ *कोकण विभाग* ▪
21) मुंबई- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
22) नवी मुंबई-(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
23) रायगड-(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
23) रत्नागिरी- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
24) सिंधुदुर्ग- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
25) पालघर-(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
26) ठाणे-(घंटानाद) (प्रसिद्धी झाली)

▪ *नाशिक विभाग* ▪
27) नाशिक- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
28) अहमदनगर- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
29) नंदुरबार- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
30) जळगाव- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
31) धुळे- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)

▪ *पुणे विभाग* ▪
32) सोलापूर- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
33) कोल्हापूर - (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
34) पुणे- (घंटानाद) (प्रसिद्धी झाली)
35) सांगली-(घंटानाद)(आज प्रसिद्ध)
36) सातारा- (निवेदन देणार)

👏👏
      महाराष्ट्रातील सर्व जिल्हात घंटानाद आंदोलनाची जोरदार तयारी सुरु आहे. 
    माहिती देणारे-
1) आशुतोष चौधरी(नागपूर विभाग)
2) मिलिंद सोलंकी (अमरावती विभाग) 
3) सिकंदर पाचमासे (औरंगाबाद विभाग)
4) कुणाल पवार (नाशिक)
5) अमोल माने ( कोकण विभाग) 
6) पुणे विभाग (संदीप पाडलकर

     यांना खूप खूप धन्यवाद !

              🚩 आपली 🚩
*विश्वस्थ व राज्यकार्यकानी पदाधिकारी व टीम*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन.
              
          ✍ संकलन 
           *सुनिल दुधे*
           राज्यसल्लागार
(8275397373,9673033887)
महराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन👍👍👍👍👍👍💪💪💪💪💪👊👊👊👊👊

Wednesday, April 4, 2018

🔔👋🔔👋🔔👋🔔👋🔔
*विचार नको कृती हवीय*

*मी घंटानाद आंदोलनात नाही गेलो तर काय फरक पडणार?मला इतर कामे आहेत? अशी नकारात्मक मनाने  कारणे सांगून स्वतःच्या पायावर दगड मारू नका मित्रहो*

*मी चंद्रपूर घंटा नाद आंदोलनात गेल्याने शासनावर काय फरक पडणार*👇
🎯 *2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांचा खदखदणारा असंतोष शासनापर्यंत पोहोचेल*
🎯 *सर्वसामान्य जनतेलाही आपल्या अन्यायकारक जुलमी शासन निर्णयाची जाणीव होईल*
🎯 *स्थानिक पदाधिकारी ग्राम पंचायतपासून खासदारपर्यंत सर्व याना आपल्या समस्या कळतील त्या शासनदरबारी पोचवण्याचा ते त्यांच्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करतील*
 🎯 *सर्व प्रसार माध्यमातून आपला*प्रबळ विरोध शासनाला कळेल*
🎯 *असे अन्यायकारक निर्णय काढताना शासनाला दहावेळा विचार करावा लागेल* 
🎯 *आता रडायचे नाही लढायचे मित्रांनो*
आता या  *निगरगट्ट शासनाला घाम फुटला पाहिजे असा घंटा वाजवायचा*
*ही लोकशाही आहे इथे प्रत्येक व्यक्तीला न्याय मागण्याचा हक्क आहे*

💪 *भीक नको हक्क हवा* 💪

           *एक दिवस जुनी पेंशन मिळणारच*
🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
त्यासाठी *चलो चंद्रपूर*

*Wel begin is half done*
🔔👋🔔👋🔔👋🔔👋🔔
*कामाच्या चांगल्या सुरुवातीतच अर्धे यश आहे*
✊✊✊✊✊✊✊✊✊
स्थळ *जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर*    *दिनांक   :-शनिवार 7 एप्रिल 2018*
🕰 *वेळ 2 ते 5*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*आपल्या हक्काचे व्यासपीठ* 
    
     *जिल्हाध्यक्ष /सचिव सर्व पदाधिकारी*

*म रा जु पें  हक्क संघटन चंद्रपूर*
🔔👋🔔👋🔔👋🔔👋🔔
🙏✊🙏✊🙏✊🙏✊🙏