DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, April 23, 2018

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

      आज मुंबई हायकोर्टात 23 एप्रिल 2018 रोजी ...मा न्यायमूर्ति गवई साहेब, व न्यायमूर्ति डांगरे मॅडम यांच्या कोर्टसमोर जुनी पेंशनसाठी  व dcps कपातीं स्थगिति विषयक सुनावनी झाली...

आज सुरूवातीसच *dcps कपातींवरील स्टे उठवावा* म्हणून सरकारी वक़िलानी बाजू लावून धरली...यावर आपले वकील सन्मा.अम्बेतकर साहेब व सन्मा.कातनेश्वरकर साहेबांनी आक्षेप घेत स्टे उठवू नये म्हणून बाजू लावून धरली *"3692/2017 या याचिकेत "by way of ad interim order, we grant stay to the impugned recovery"10 jully 2017 अस स्पष्ठ उल्लेख असताना स्टे उठवने म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरेल ,शिवाय असे आदेश असताना शासनाने कर्मचारी वर्गाकडून काही लेखी लिहून घेणे म्हणजेही न्यायालयीन अवमानच आहे असेही सांगितले!"*....या दोन्ही बाजू ऐकून घेवून न्यायालयाने dcps कपात विषयी कोणतीही ऑर्डर पास करण्यास नकार दिला...💐💐💐स्टे कायम ठेवण्यात आपल्याला यश आले!!


    मित्रहो!  जुनी पेंशनविषयी कोर्टसमोर लढत असताना एक गोष्ठ मात्र आत्ता स्पष्ठ लक्षात येत आहे की, शासन dcps स्टे उठवन्यासाठी पार आटापीटा करत आहे... *"dcps स्टे मुळे शासनाची चांगलीच कोंडी झालेली आहे,...आपल्या साठी जुनी पेंशनची वाटचाल सुकर झालेली आहे".* स्टे उठवन्यासाठी शासनाचे आता afidavite ने भागले नाही म्हणून शासनाने  पुनर्विचार याचिकाही दाखल केली आहे...लवकरच त्याची  कॉपी/नोटिस आपल्याला मिळेल, एवढेच नाहीतर 3692 /2017 या याचिकेसाठी  विशेष सरकारी वकीलांची नेमनुक़ केल्याचीही चर्चा आज ऐकायला मिळाली...प्रतिस्पर्धी मैदानात आपली बाजू जोरदार लावून धरत आहे, त्यासाठी सर्व प्रयत्नांची शिकस्त करत आहेत ...यामुळे  एवढे नक्की समजत आहे की, आपली लढाई योग्य दिशेने सुरु आहे!


आपल्या वकीलांच्या  सर्व याचिका club विषयी माहिती घेतल्यानंतर 19 जुनला सर्व मॅटर ठेवण्यात येणार आहेत, व जुनी पेंशनची पुढील सुनावनी 11 जुनला ठेवण्यात आली आहे!!
       आपल्या सर्वांच्या माहितीसाठी कोर्टसमोरील हे वरील वास्तव चित्रण.🙏🏻🙏🏻



      आपलाच
*राजेंद्र फुलावरे*
*रायगड जिल्हाध्यक्ष*
*म रा जु पे हक्क संघटन*

No comments:

Post a Comment