🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
*जुनी पेंशनचे राष्ट्रीय आयकॉन प्रदिप सोनटक्के सर आता पुन्हा एकदा स्वराज्याची राजधानी रायगड सर करणार* !!!
अन्यायकारक नवीन पेंशन योजना रद्द करून हक्काची १९८२-८४ ची जुनी पेंशन योजना लागु करावी यामागणीसाठी तीन वर्षापासुन महाराष्ट्रात जुनी पेंशन हक्क संघटन कार्य करीत आहे. आजवर या संघटनने राज्यव्यापी आंदोलने करून जुनी पेंशनची मागणी केलेली आहे, ती आज ना उद्या शासनाला द्यावीच लागेल. हा राज्यव्यापी लढा देशपातळीवरही पोहचवला,त्याचाच एक भाग म्हणून नुकताच ३०/०४/२०१८ ला देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे रामलीला मैदानावर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी महाराष्ट्रातुन असंख्य शिलेदार संघटनचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात या देशव्यापी आंदोलनात सहभागी झाले होते.प्रदिप सरांनी संपुर्ण देशवासीयांचे मने जिंकली होती.!!!!!🚩🚩🚩
महाराष्ट्रातही येणाऱ्या काळात जुनी पेंशनसाठी मंत्रालयावर लाँगमाँर्च काढण्यात येणार आहे. जुन्या पेंशनसाठी ते आग्रा ते दिल्ली अशी २३० किमी ची दौड मारून साऱ्या देशाचं ते लक्ष वेधून घेतल होते.दररोज अंदाजे ६० किमी दौड मारून ३० एप्रिलच्या रामलीला मैदानावरील आंदोलनात पोहचले.या प्रवासादरम्यान त्यांना संपुर्ण देशातुन मिळणारा प्रतिसाद आणि लोकांचे मिळालेले प्रेम अतुलनीय होते.प्रदिप सरांच्या या जिद्दीला ,चिकाटीला सलामच. प्रदिप सरांची दौड म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. प्रतिनीधीक स्वरूपात ते एकट्यांनीच दौड मारली असली तरी संपुर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता .!!!!🚩🚩🚩
देशभरातील लाखो कर्माचारी रामलीला मैदानावर एकत्र येऊन एनपीएस विरोधात उभारलेला लढयाची मिडीया तसेच लोकप्रतिनीधींनी घेतलेली दखल पाहता येणाऱ्या काळात जुनी पेंशनचा लढा नक्की यशस्वी होणारच.पण एवढ्यावरच कशे थांबतील? *एकदा देशाची राजधानी जिंकली ,आता पुन्हा एकदा छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाला जुनी पेंशनचं साकडं घालण्यासाठी प्रदिप सोनटक्के सर पुन्हा एकदा पुण्याच्या लाल महालापासुन ते स्वराज्याची राजधानी रायगडावर दौड मारून ६ जुनला छत्रपतींच्या राज्याभिषेक दिनी, जुनी पेंशनचं साकडं रायगडाच्या जगदीश्वराला घालणार आहेत ज्या छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन राजकिय पक्ष सत्तेत येतात ,त्यांना कर्मचाऱ्यांची बंद केलेली पेंशन सुरु करण्याची सुबुध्दी देवो आणि जुनी पेंशनरूपी आशिर्वाद मिळवण्यासाठी आता असंख्य कर्मचारी थेट छत्रपतींच्या रायगडावरच पोहचणार आहेत*. !!!!🚩🚩🚩
प्रदिप सरांचा उत्साह वाढवण्यासाठी वाटेत त्यांना असंख्य शिलेदार भेटतीलच.पण त्यांची ही धडपड पाहुन प्रत्येकाने आपण या लढ्यात कुठे आहोत याचा विचार करावा. ज्यांना जसं शक्य असेल तसं या लढ्यात सहभागी होणं ,ही येणाऱ्या काळाची गरज आहे.कारण आपल्याला जुनी पेंशनची लढाई महाराष्ट्रात आणखी तीव्र करावी लागणार आणि प्रदिप सरांची दौड अशी वाया जाऊ द्यायची नसेल आणि शासनाला याची दखल घ्यावी असे वाटत असेल तर आपली सर्वांची एकजुट शासनाला पुन्हा एकदा दाखवुन देण्याची गरज आहे.!!🚩
*महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील तमाम पेंशन वंचित शिवप्रेमी या राज्याभिषेक दिनी रायगडावर उपस्थित राहुन प्रदिप सोनटक्के सरा जुनी पेंशनचा जागर करणार असल्याचे सांगितले*.!🚩🚩🚩
*आपलाच*
*जितेंद्र औताने*
*जिल्हा उपाध्यक्ष*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन बीड*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
No comments:
Post a Comment