DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Wednesday, August 29, 2018

*!!महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन!!*

   🚩 *पेन्शनदिंडी व सामूहिक उपोषण* 🚩

   🔹  *लढानिधी व आर्थिक नियोजन*  🔹

प्रति,
      *सर्व राज्यसमन्वयक, जिल्हाध्यक्ष व जिल्हाकार्यकारणी*
 
मार्फत- *सर्व विभागीय अध्यक्ष*
         
     
👏 
    मित्रांनो,
            आपनास माहित आहे की 2018 हे वर्ष आपल्या जुन्या पेंशन च्या संघर्षातील आंदोलन वर्ष आहे. व त्यामुळे आपण 2 आॅक्टोबर 2018 ला पेंशन मार्च व मंत्रालय घेराव करून आपल्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण ही करना आहोत.. तसेच समोर होणारी लोकसभा व विधानसभा निवडणुक लक्षात घेता संघटनेचे शक्ति प्रदर्शन करण्यासाठी संघटनेचे पहिले अधिवेशन ही घेणार आहोत.. त्या अनुषंगाने फार मोठा आर्थिक भार येणार आहे. त्यासाठी लढा निधी व आर्थिक नियोजन पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
        (टिप- लढा निधी हा विशेष निधी असून तो सभासद निधी नाही. सभासद होण्यासाठी राज्याने पुरविलेल्या पावती नुसार 300 रुपये घेऊन सभासदत्व द्यावे)

👇 *लढा निधी पावती* 👇

▪ *पावती नमुना-*
        लढा निधी पावतीचा नमुना राज्यकार्यकारणी मार्फत देण्यात येत आहे.
▪ *पावती छपाई-*
         लढा निधी पावती जिल्हाकार्यकारणीने आपल्या जिल्हयाच्या राज्यसमन्वयकाच्या निरीक्षणात जिल्हास्तरावर छापावी.
▪ *पावती संख्या-*
        प्रत्येक जिल्हाने कमीत कमी 1000 पावत्या छापाव्यात. मात्र आपल्या जिल्ह्या व तालुका तील निधी जमा करण्याच्या क्षमतेनुसार त्यापेक्षाही अधिक पावत्या छापता येतील मात्र त्याबाबत आपल्या जिल्हातील राज्य समन्वयक व राज्य पदाधिकारी यांची संमती घ्यावी व त्याबाबत विभागीय अध्यक्ष यांना सूचित करावे.

▪ *लढा निधी-*
        प्रत्येक पावती द्वारे लढा निधी म्हणून 200 रुपये गोळा करावे. मात्र जे शिलेदार स्वइच्छेने 200 पेक्षा जास्त निधी देत असतील तर तीही स्वीकारावी..
◼ *लढा निधी कोणाकडून घ्यावी?*
           1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांकडून अनिवार्यरित्या पावती देऊन निधी गोळा करावी. 
          तसेच जुने कर्मचारी, विविध पदाधिकारी तसेच सामान्य नागरिक स्वइच्छेने निधी देत असतील तर तो स्वीकारावा.
◼ *निधी हिस्सा वाटप*
           आंदोलनासाठी राज्याला लागणार व्यापक खर्च बघत जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्याला तालुक्यातील प्राप्त एकूण रक्कमेतून पुढील प्रमाणे हिस्से द्यावेत...
       *राज्य हिस्सा-   70 %*
       *जिल्हा हिस्सा-  15%*
       *तालुका हिस्सा-   15%*

◼ *निधी गोळा करण्याचा कालावधी*
     दिनांक -  1 सप्टेंबर 2018 ते 30 सप्टेंबर 2018 पर्यत.

◼ *निधी हिशोब व हिस्सा देने*
           जिल्हाकार्यकारणीने राज्यसमन्वयक याचे मार्फत विभागीय अध्यक्ष यांना खालील तारखेला रक्कम व पावती हिशोब द्यावा. व विभागीय अध्यक्ष यांनी राज्याला द्यावा. (निधी हिशोब बाबत कोणतीही हयगय करू नये.)
★  *प्रथम हिशोब व रक्कम जमा करणे.-*       
दि. 10 सप्टेंबर 2018
★ *द्वितीय हिशोब व रक्कम जमा करणे.-*
 दि. 20 सप्टेंबर 2018
★ *अंतिम हिशोब व रक्कम देणे-* 
दि.30 सप्टेंबर 2018
        
       हिशोब देतांना एकूण पावत्या, त्यातील फाडलेल्या पावत्याची दुय्यम प्रत व रक्कम द्यावी. तसेच 30 सप्टेंबर2018 ला सर्व फाडलेल्या व न फाडलेल्या पावत्या हिशोबासह विभागीय अध्यक्ष यांचेकडे जमा करावे. त्यानंतर पावत्या फाडू नये.

  👉   *हि सर्व कामे आपल्या जिल्हातील राज्य समनव्यक तसेच राज्य पदाधिकारी यांच्या निरीक्षणात करावी.*
      

👏    *विशेष सूचना*   👏
         
      महराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जाहीर आहवाहन करते की, *एखादया शिलेदारांला पेन्शन दिंडी आंदोलनासाठी विशेष आर्थिक साहाय्य (निधी) द्यायची असेल तर त्यांनी संघटनेच्या खालील अकाऊंट (खात्या वर)थेट रक्कम मदत जमा करू शकतात. अशी रक्कम जमा करण्याऱ्यानी तशी रक्कम जमा केल्यावर तशी माहिती राज्यकार्यकारणी पदाधिकारी यांना दयावी. सदर शिलेदाराचे नाव सन्मानपूर्वक जाहीर करण्यात येईल आणि येणाऱ्या राज्य अधिवेशनात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल...*

    -----राज्य बँक खाते---
*Syndicate Bank*
*Acc. No. 51341010001846*
*Branch- Aurangabad*
*IFC Code- SYNB0005134*
*Account name- MRZP Karmchari Juni Pension Hakk Sa.*

(👆 *याबाबत मोठया प्रमाणात प्रसिद्धी करावी*)
        
👏

विश्वस्त मंडळ तथा राज्य कार्यकारिणी
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*

Tuesday, August 28, 2018

*!!महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन!!*

    🚩 *पेन्शनदिंडी व मंत्रालय घेराव* 🚩

     👇 *सर्वसाधारण नियोजन* 👇

👏
        जुनी पेंशन हा आपल्या सर्व नवीन कर्मचारी यांच्या साठी फार महत्वाचा विषय आहे व येणाऱ्या निवडनुका लक्षात घेता महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटने मार्फत शिवनेरी ते मंत्रालय अशी पायी पेन्शनदिंडी व मागणी पूर्ण होई पर्यत सामूहिक उपोषण कले जाणार आहे.*...

◼ *रन फार पेन्शन* ◼

★ सुरुवात- *महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थळ शिवनेरी येथून*

★ दिनांक-  *२९ सप्टेंबर २०१८ ला ते १ ऑक्टोबर २०१८*

★ सहभाग-  *राज्य कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त यांच्या सह जुन्या पेंशन चे आयॅकान प्रदिप सोनटक्के व यांच्या सह अनेक शिलेदार सहभागी होतील.*( ज्या शिलेदारांना शिवनेरी ते ठाणे धावत जायचे आहे त्यानी आपले नावे जिल्हाध्यक्ष मार्फत राज्यकार्यकारणीला 10 सप्टेंबर पर्यत दयावी.) *हे सर्व २ आॅक्टोबर ला ठाणे येथे पोहचतील.*

   ◼ *पेन्शन दिंडी* ◼
👇 *दिवस पहिला* 👇
★ सुरुवात-  *ठाणे येथून*
★ दिनांक-  *०२/१०/२०१८*
                *वार- मंगळवार*
                *वेळ - सकाळी १० वा*
★स्थळ - *तीन हात नाका, ठाणे*
★ मार्ग - *ठाणे ते  मंत्रालय आझाद मैदान... अंतर 35 किमी*(पूर्व द्रुतगती मार्ग)

★ सहभाग- *महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यतून कमीत कमी 2000 प्रमाणे 70 हजार पेक्षा अधिक कर्मचारी*

★ रात्री मुक्काम - *शिवाजी पार्क, मुबंई*

👇 *दिवस दुसरा* 👇
★ सुरुवात- *शिवाजी पार्क ते  आझाद मैदान कडे*
★ दिनांक-  *०३/१०/१८*
                 *वार- बुधवार*
      
       *दिनांक 3 ऑक्टोबर 2018 ला अंदाजे दुपारी 3.00 वाजता दिंडी आझाद मैदान येथे पोहचेल.*

      👇 *सामूहिक उपोषण व मंत्रालय घेराव* 👇
         
            *पेन्शनदिंडी काढूनही शासनाणे आपली मागणी पूर्ण न केल्यास.....  मंत्रालया समोर तिथेच पेन्शनदिंडीतील सर्व कर्मचारी घेराव करून सामूहिक उपोषणाला बसतील.*
 ★ स्थळ-  *आझाद मैदान*
 ★ दिनांक- *3 ऑक्टोबर 2018 ला दुपारी 3.00 वा.ते मागणी पूर्ण होईपर्यत....*
     ( या उपोषणासाठी प्रतिजिल्हा 1000 कर्मचारी किमान 2 ऑक्टोबर पासून एक आठवडा रजा घेऊन सहभागी होण्याची पूर्ण तयारी जिल्हा कार्यकारिणीने करावी.)

   👇  *आमरण उपोषण* 👇
       *सामूहिक उपोषण करूनही शासनाने आपली मागणी पूर्ण करण्याबाबत दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी राज्यकार्यकारणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेईल...*
  
 ★ सहभागी- *संस्थापक सदस्य राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष.....* आमरण उपोषणासाठी प्रति तालुका किमान एक शिलेदार तयार करून त्याचे नाव व सहमती पत्र राज्यकार्यकारणीला जिल्हाध्यक्ष मार्फत  10 सप्टेंबर पर्यत द्यावे.

      *(टीप :-  पोलिसांच्या परवानगी नुसार मुक्कामाच्या ठिकाणी व इतर नियोजनात थोडा फार बदल होऊ शकतो...)*

      👇 *विशेष सूचना* 👇

      सर्व जिल्हाकर्यकारणीला सूचित करण्यात येते कि, प्रत्येक जिह्यातून कमीतकमी 2000 शिलेदार पेन्शनदिंडी साठी तयार करावेत त्यातील 1000 शिलेदार सामूहिक उपोषणासाठी तयार करावे जे राज्यकार्यकार्यकारणीच्या सुचने शिवाय उपोषणावरून उठणार नाहीत.. तसेच प्रति तालुका एक शिलेदार आमरण उपोषणासाठी तयार करावे. *तसेच सर्व शिलेदारांना सूचना द्यावी कि जो पर्यत राज्यकार्यकारणी सूचना देणार नाही तोपर्यत कोणीही आंदोलन स्थळ सोडणार नाही.या तयारीने सर्वानी यावे.* 

          *इस बार*...
                      *आर या पार*....

(इतर नियोजन लवकरच दिले जाईल) 

👏
*विश्वस्त सदस्य तथा राज्य कार्यकारिणी*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.. ।

Tuesday, August 14, 2018

🤝
    *जुन्या पेन्शनसाठी मुख्यमंत्री सोबत भेट घालून देणार* -
              *आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया*

         👇 *भेट एका युवा नेतृत्वाशी.....* 👇

👏
       पेन्शनक्रांती सप्ताहाच्या निमित्ताने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांच्याशी दि. 13 आगस्ट 2018 ला नागभीड व चिमूर तालुका कार्यकारणीच्या वतीने भेट घेण्याचा योग आला. 16 आगस्ट ला चिमुरक्रांती दिनाचा फार मोठा कार्यक्रम असल्याने बंटीभाऊ अतिशय व्यस्त होते , शेकडो कार्यकर्त्याचा गराडा त्यांचे भोवती होता. तरीही भाऊनी सविस्तर बसून सुमारे अर्धा तास आमच्याशी चर्चा केली. 
        भाऊंच्या नजरेत एक अनोखा आत्मविश्वस व आपुलेपणा होता, भाऊंनी एका नजरेत आम्हाला ओळखलं व चर्चेत पहिलं वाक्य बोलले ;
       *"मला तुम्हच्या संघटनेची  मागणी माहीत आहे मी 100% तुम्हच्या सोबत आहे. तुम्ही म्हणाल ते सर्व मी करायला तयार आहे."*
        एवढं बोलून भाऊंनी आमच मन जिंकून घेतलं..

     पुढे चर्चेत मी त्यांना संघटनेची राज्यव्याती व आतापर्यंतचा आंदोलन आलेख समोर ठेवला व येणाऱ्या 2 ऑक्टोबर पासून आम्ही मंत्रालयावर पेन्शनदिंडी व सामूहिक उपोषण करणार असल्याचे सांगितले.
   *भाऊ म्हणाले- मी स्वतः तुम्हच्या आंदोलनात उपस्थित राहतो काही मदत भासली तर सांगा*
     👉 *"तसेच दि. 16 आगस्ट ला  चिमुरक्रांती दिना निमित्ताने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस येणार आहे. तुम्ही 4 ते 5 जनांचे शिष्टमंडळ घेऊन या, मुख्यमंत्री सोबत भेट घेऊ व चर्चा करू"*  👈

        असे म्हणून आपल्या पी.ए. ला  vip पास तयार करायला सांगितलं.

     भाऊंशी आणखी चर्चा केल्यावर 👇
◼ *मुंबईला माझ्या आमदार निवासात गरजेनुरूप निवास व्यवस्था करून देईल.*
◼ *विधानभवनात पासेस ची व्यवस्था करून देणार.*
◼  *जुन्या पेन्शनच्या मागणीचे मुख्यमंत्री यांना यापूर्वीही पत्र लिहिले पुन्हा आता शिफारस पत्र लिहून तुम्हाला प्रतिलिपी तसेच पाठपुराव्याचे पत्र ही पाठविलं.*

    मित्रांनो अश्या अनेक प्रकारे मदत करण्याचे आश्वासन बंटीभाऊंनी दिले. 
  
   युवा कर्मचाऱ्याच्या वेदना त्यांची धडपड युवा नेतृत्व म्हणून आमदार बंटीभाऊ भांगडीया सारखे तरुण तडफदार व्यक्तिमत्वच समजू शकते हे या निमित्ताने सिद्ध झालं.

   या भेटीतून *'श्री. बंटीभाऊ भांगडीया म्हणजे माझा आमदा, माझे नेतृत्व'*  म्हणण्याची एक वेगळी उर्मी व अभिमान आम्हच्यात निर्माण झाला.

    *भाऊ आपले खूप खूप आभार...*


   यावेळी कार्यतत्पर नागभीड तालुक्याचे तालुका अध्यक्ष सतिष मेश्राम व चिमूर तालुकाध्यक्ष संदीप उपरे,  श्री. लखन साखरे,श्री. गुरुदेव पिसे,श्री. प्रवीणशेंडे, मंदे सर, जांभूळे सर, सरोज चौधरी सर आणि मी उपस्थित होतो.

👏
                  आपला
              *सुनिल दुधे*
              राज्यसल्लागार
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*
(8275397373/9673033887)

Monday, August 6, 2018

*संपाबाबत समज व गैरसमज*

   कर्मचाऱ्याच्या मानगुटीवर बसून शासनाचा मलिंदा खाणारे व शासनाचे मध्यस्ती म्हणून ओळखले जाणारे *राजपत्रित अधिकारी महासंघ* यांनी आजच्या आज 14 महिन्याची महागाई व नेहमीप्रमाणे जाने 2019 पासून सातवा वेतन आयोग देण्यात येत असल्याबाबत शासननिर्णय काढून संप  नेहमीप्रमाणे मागे घेतला.

आणि महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेला (सर्व विभागातील गट क व गट ड संघटना) समावेश असतात. त्यांनी मात्र संप मागे घेतला नाही.*संप जर होत असेल व जुनी पेंशन चा मुद्दा रेटून घेत असेल तर आम्ही सक्रिय सहभाग देऊ* ह्या अटीवर राज्याध्यक्ष म रा जुनी पेंशन हक्क संघटन यांनी राज्य मध्यवर्ती संघटना च्या राज्य अध्यक्ष यांच्याशी बोलणे झाले आहे.

*राज्य मध्यवर्ती संघटना संप बाबत ठाम आहे..संप होणारच आहे*

जिल्हा परिषद चंद्रपूर,जटपुरा गेट,गांधी चौक,कलेक्टर ऑफिस असा मोरच्यांचा मार्ग आहे.

*म रा जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर* मधील सर्व dcps/nps धारकांनी आपला ड्रेस कोड परिधान करून यावे

*पुनःश्च एखादा एकच मिशन,जुनी पेंशन चा नाद चंद्रपुरात गुंजयला हवा.*

हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही एकच मिशन,जुनी पेंशन ची टोपी व सफेद शर्ट व महिला कर्मचारी यांनी  केवळ टोपी लावली तरी चालेल.

*7 आगस्ट ला संप होणारच आहे 100 टक्के*

*आता बाकी एकच काम,अंशदान पेंशन योजनेला कर्मचाऱ्याचा रामराम*

*एकच मिशन,जुनी पेंशन*

*तवा गरम आहे,पोळी शेकून घेणे*

म्हणून माझी सर्वाना विनंती आहे की,सर्वांनी संपात सहभागी व्हावे

तुम्हच्यातला मी

श्री दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष
म रा जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपुर
*म रा जुनी पेंशन हक्क संघटनेचा संपाला जाहीर व सक्रिय सहभाग*

*सर्व तालुका अध्यक्ष/सरचिटणीस व तालुका dcps/nps शिलेदार आणि जिल्हा शाखा पदाधिकारी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर  व  तालुका शाखा सर्व*💐💐💐💐💐
*दिनांक ७,८व ९आगस्ट२०१८ या तीन दिवशीय राज्यव्यापी संपात सक्रिय सहभाग असल्याबाबत*🌹🌹🌹🌹
*महाराष्ट्र राज्य कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती च्या वतीने दिनांक ७,८ व ९ आगस्ट २०१८ या तीन दिवशीय  आयोजित संपात जिल्हा परिषद ,महानगरपालिका,नगरपालिका शिक्षक व तसेच सर्व विभागातील कर्मचारी सक्रिय सहभाग घेत असून सातवा वेतन आयोग लागू करणे व जुनी पेंशन योजना लागू करणे ह्या रास्त मागण्याकरिता घेत आहे.तरी सर्व तालुका शाखा जुनी पेंशन हक्क संघटन मध्ये सहभागी असलेले सर्व कर्मचारी यांनी शाळा बंद ठेवुन,ऑफिस बंद ठेऊन सक्रियपणे जिल्ह्याच्या आयोजित संपात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे*✊✊✊✊✊✊

     *सदर संपात सातवा वेतन प्रमुख मागणी असली तरी काल झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात  राज्य मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस व राज्य उपाध्यक्ष यांनी सातवा वेतन मंजूर झाल्यावर प्रत्येक संपात, मोरच्यात,आंदोलनात जुनी पेंशन हा प्रमुख मागणी एक नंबर वर राहील यांची आश्वासन दिले आहे.त्यामुळे सर्वांनी ह्या संपात सहभागी होऊन लढा अधिक तीव्र करण्यास मदत करावी.*


आपले विनीत

*अध्यक्ष/सचिव*
*दुशांत निमकर/निलेश कुमरे*
*चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन*