DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Tuesday, August 28, 2018

*!!महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन!!*

    🚩 *पेन्शनदिंडी व मंत्रालय घेराव* 🚩

     👇 *सर्वसाधारण नियोजन* 👇

👏
        जुनी पेंशन हा आपल्या सर्व नवीन कर्मचारी यांच्या साठी फार महत्वाचा विषय आहे व येणाऱ्या निवडनुका लक्षात घेता महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटने मार्फत शिवनेरी ते मंत्रालय अशी पायी पेन्शनदिंडी व मागणी पूर्ण होई पर्यत सामूहिक उपोषण कले जाणार आहे.*...

◼ *रन फार पेन्शन* ◼

★ सुरुवात- *महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थळ शिवनेरी येथून*

★ दिनांक-  *२९ सप्टेंबर २०१८ ला ते १ ऑक्टोबर २०१८*

★ सहभाग-  *राज्य कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त यांच्या सह जुन्या पेंशन चे आयॅकान प्रदिप सोनटक्के व यांच्या सह अनेक शिलेदार सहभागी होतील.*( ज्या शिलेदारांना शिवनेरी ते ठाणे धावत जायचे आहे त्यानी आपले नावे जिल्हाध्यक्ष मार्फत राज्यकार्यकारणीला 10 सप्टेंबर पर्यत दयावी.) *हे सर्व २ आॅक्टोबर ला ठाणे येथे पोहचतील.*

   ◼ *पेन्शन दिंडी* ◼
👇 *दिवस पहिला* 👇
★ सुरुवात-  *ठाणे येथून*
★ दिनांक-  *०२/१०/२०१८*
                *वार- मंगळवार*
                *वेळ - सकाळी १० वा*
★स्थळ - *तीन हात नाका, ठाणे*
★ मार्ग - *ठाणे ते  मंत्रालय आझाद मैदान... अंतर 35 किमी*(पूर्व द्रुतगती मार्ग)

★ सहभाग- *महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यतून कमीत कमी 2000 प्रमाणे 70 हजार पेक्षा अधिक कर्मचारी*

★ रात्री मुक्काम - *शिवाजी पार्क, मुबंई*

👇 *दिवस दुसरा* 👇
★ सुरुवात- *शिवाजी पार्क ते  आझाद मैदान कडे*
★ दिनांक-  *०३/१०/१८*
                 *वार- बुधवार*
      
       *दिनांक 3 ऑक्टोबर 2018 ला अंदाजे दुपारी 3.00 वाजता दिंडी आझाद मैदान येथे पोहचेल.*

      👇 *सामूहिक उपोषण व मंत्रालय घेराव* 👇
         
            *पेन्शनदिंडी काढूनही शासनाणे आपली मागणी पूर्ण न केल्यास.....  मंत्रालया समोर तिथेच पेन्शनदिंडीतील सर्व कर्मचारी घेराव करून सामूहिक उपोषणाला बसतील.*
 ★ स्थळ-  *आझाद मैदान*
 ★ दिनांक- *3 ऑक्टोबर 2018 ला दुपारी 3.00 वा.ते मागणी पूर्ण होईपर्यत....*
     ( या उपोषणासाठी प्रतिजिल्हा 1000 कर्मचारी किमान 2 ऑक्टोबर पासून एक आठवडा रजा घेऊन सहभागी होण्याची पूर्ण तयारी जिल्हा कार्यकारिणीने करावी.)

   👇  *आमरण उपोषण* 👇
       *सामूहिक उपोषण करूनही शासनाने आपली मागणी पूर्ण करण्याबाबत दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी राज्यकार्यकारणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेईल...*
  
 ★ सहभागी- *संस्थापक सदस्य राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष.....* आमरण उपोषणासाठी प्रति तालुका किमान एक शिलेदार तयार करून त्याचे नाव व सहमती पत्र राज्यकार्यकारणीला जिल्हाध्यक्ष मार्फत  10 सप्टेंबर पर्यत द्यावे.

      *(टीप :-  पोलिसांच्या परवानगी नुसार मुक्कामाच्या ठिकाणी व इतर नियोजनात थोडा फार बदल होऊ शकतो...)*

      👇 *विशेष सूचना* 👇

      सर्व जिल्हाकर्यकारणीला सूचित करण्यात येते कि, प्रत्येक जिह्यातून कमीतकमी 2000 शिलेदार पेन्शनदिंडी साठी तयार करावेत त्यातील 1000 शिलेदार सामूहिक उपोषणासाठी तयार करावे जे राज्यकार्यकार्यकारणीच्या सुचने शिवाय उपोषणावरून उठणार नाहीत.. तसेच प्रति तालुका एक शिलेदार आमरण उपोषणासाठी तयार करावे. *तसेच सर्व शिलेदारांना सूचना द्यावी कि जो पर्यत राज्यकार्यकारणी सूचना देणार नाही तोपर्यत कोणीही आंदोलन स्थळ सोडणार नाही.या तयारीने सर्वानी यावे.* 

          *इस बार*...
                      *आर या पार*....

(इतर नियोजन लवकरच दिले जाईल) 

👏
*विश्वस्त सदस्य तथा राज्य कार्यकारिणी*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.. ।

No comments:

Post a Comment