✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
*🙏जिल्हा कार्यकारिणी तथा संपूर्ण कार्यकारिणी सभा अहवाल🙏*
दिनांक 11 ऑगस्ट 2019 ला जनता शाळा चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन जिल्हा चंद्रपूर यांची जिल्हा तथा संपूर्ण तालुका कार्यकारिणी ची सभा मा. श्री. दुशांत भाऊ निमकर जिल्हाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री.सुनील भाऊ दुधे राज्यसल्लागार यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली
सदर सभेत खालील विषयावर चर्चा करून ठराव कायम करण्यात आले
*🙏मागील सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे👉*
मागील सभेतील सर्व इतिवृत्त वाचून मागील सर्व ठराव सर्वानुमते कायम करण्यात आले.ठराव सर्वानुमते मंजूर..
*🙏20 ऑगस्ट 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या संपविषयी चर्चा व नियोजन बाबत👉*
➡ 20 ऑगस्ट संपात राज्यमध्यवर्ती कर्मचारी संगठना समन्वय समिती, सर्व शिक्षक समन्वय संगठना, शासकीय व निमशासकीय सर्व संगठना सहभागी होणार असून अभूतपूर्व संप होणार असून 100% संप यशस्व्ही करण्याचे नियोजन करण्यात आव्हान करण्यात आले
➡ 20 ऑगस्टच्या संपात सर्व तालुक्यानी जिल्हास्तरावर सहभागी होणे आवश्यक आहे.
➡ तालुका स्तरावर नियोजन करण्यात येऊ नये
➡ आपल्या DDO यांना संपविषयी अर्ज लवकरात लवकर सादर करावा व अर्जात स्पष्ट संपात सहभागी होत असल्याची नोंद करावी
➡20 ऑगस्ट ला किरकोळ रजा घेऊ नये घेतल्यास आपला संपात सहभाग नाही असे निदर्शनास येईल
➡महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन सर्व पेंशन शिलेदार यांनी 20 ऑगस्ट ला जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ठीक सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.
➡ महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन मधील केंद्रसंगठक यांची महत्वाची भूमिका असून प्रत्येक केंद्रातील प्रचार व प्रसार आपण रोज करावा
➡20 ऑगस्ट च्या संपात मोर्चा दरम्यान छत्री सोबत आणावी पाऊस लागल्यास मोर्चा तुन कोणीही बाहेर जाऊ नये
➡महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन सर पेंशन वीर यांनी आपल्या पोशाख मध्ये उपस्थित राहावे .टोपी सोबत आणावी
➡ सर्व तालुकाध्यक्ष यांनी वरील सर्व सूचना लक्षात घेऊन तालुका स्तरावरील संगठन शी संपर्क साधून सर्व तालुका सभा आयोजित करावी तसेच सर्वांच्या मदतीने प्रचार व प्रसार करावा
वरील मुद्दे लक्षात घेऊन ठराव सर्वानुमते कायम करण्यात आले
🙏6 ऑगस्ट राज्य मध्यवर्ती कर्मचारी संगठना समन्वय समिती मधील नियोजन ची रूपरेषा मांडण्यात आले
सदर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यलय चंद्रपूर येथून निघणार असून सर्व समन्वय समिती सभा यांचे सूचनेनुसार आपणास जिल्हा परिषद चंद्रपूर येथून सहभागी व्हायचे आहे. सदर मोर्चा मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे घरासमोरून गांधी चौक ते जिल्हा परिषद असा येणार आहे तशा सूचना तालुक्यात देण्यात याव्या
🙏संगठना मध्ये जमा असणारी काही रक्कम fixed करण्याचे आज सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला🙏
✊20 ऑगस्ट च्या संपविषयी सर्व शिक्षक संगठना समन्वय समिती यांची सभा सुद्धा 11 ऑगस्ट ला पार पडली असून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन यांचे कडे संपूर्ण तालुक्यात प्रचार व प्रसार करण्याचे खूप मोठे नियोजन आपल्याकडे देण्यात आले असून सर्वानी आपली जबाबदारी पार पाडावी🙏
*✊संघर्ष अटळ आहे✊*
*✊संप संप संप संप संप संप संप संप✊*
🙏अध्यक्ष/सचिव🙏
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन*
*जिल्हा चंद्रपूर*
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊