DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, August 5, 2019

*चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा*

          हा नारा  स्वातंत्रप्राप्तीसाठी भारतीयांना दादाभाई नौरोजी यांनी दिलेला आहे.आणि हा नारा जोपासत अहिंसक मार्गाने मागील 3 वर्षांपासून जुन्या पेंशनसाठी झटत आहोत.आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत चळवळ अखंड करीत राहून यश मिळविणारच ...

  ह्या मागणी करतांना जाणीवपूर्वक शासन डोळेझाक करीत आहे.एक ना एक दिवस सोन्याचा दिन उगवेलच म्हणून अन्याय सहन करून घरात बसायचे की संपात उतरायचे???

तुम्हीच ठरवा...

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना समवेत राज्यातील सर्व खाते व संवर्ग निहाय कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

मुख्य मागणी

*1 नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे ह्या मुख्य मागणीसह इतर मागण्या..*

एकीकडे शासन सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला वयोवृद्ध (80,85,90,95,100) ह्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त पेंशन देण्यासाठी शासन निर्णय काढतो.

मग

नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या व सेवेत आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याला वाऱ्यावर का?????सोडले???

त्याच्या पोरांचे शिक्षण कोण करणार???

नोव्हे 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यानेच कोणतं पाप केलंय हा जॉब विचारण्यासाठी शतप्रतिषद कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन आपला आक्रोश दाखवावा..आपला आक्रोश म्हणजेच सरकारला जाग

चला..उठा..सज्ज व्हा
20 ऑगस्ट चा सर्व कर्मचाऱ्याचा संप
शासनाला फुटायला हवा कंप

*शासन कलम 370 रद्द करू शकते मग dcps/nps ही अन्यायकारक योजना रद्द करू शकत नाही का ???नाही का??*

म्हणूनच जागे व्हा,जागे करा व संपात सहभागी व्हा


*मी जर तरुण असतो तर केव्हाच बंड करून उठलो असतो* 

अशी म्हणायची वेळ येऊ न देता आताच बंड करू या..

*एक ही बात, काम की बात,युवा आपके साथ*

*एकच मिशन,जुनी पेंशन*
*नो राजकारण,ओन्ली ऍक्शन*

आपलाच
श्री दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष
चंद्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

No comments:

Post a Comment