DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Wednesday, January 31, 2018

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!!

नमस्कार सहकाऱ्यांनो,🙏🏻
काल पुन्हा मंत्रालयीन पाठपुरावा करण्याकरिता धडाकेबाज राज्याध्यक्ष वितेशभाऊ खांडेकर, तडफदार राज्य सरचिटणीस गोविंदराव उगले, दणकेबाज नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद करकिले, प्रयत्नवादी लातूर जिहाध्यक्ष अमोल शेळके, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत माने व मी (प्राजक्त) उपस्थित होतो...

आज सर्व सचिवस्तरीय भेटी-गाठी घेऊन आपल्या मिशन प्राप्तीला बळ देण्याचा प्रयत्न केला...

भेट दिलेले सचिव स्तरीय अधिकारी:-

१. मा. प्रवीण परदेशी
(प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय)
हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या भव्य मुंडण मोर्चाला मा. मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेल्या ठोस आश्वासनाबाबत स्मरण पत्र मा. परदेशी साहेबांना दिले.. 
आपण मृत कर्मचारी कुटुंबाला न्याय द्यायचे आश्वासन दिले होते. त्याची जणू
आठवण करून देऊन सकारात्मक निर्णय घेण्याविषयी आपण लवकरात लवकर भूमिका घ्यावी, ही विनंती केली..

२. मा. दिनेश कुमार जैन
( अपर मुख्य सचिव, वित्त विभाग)
आपल्या प्रश्नाबाबत सर्वात महत्वाचं केंद्र असणारा हा विभाग म्हणजे "वित्त विभाग".. या विभागाचे सचिव साहेब यांना "मृत कर्मचारी प्रश्नाबाबत" केंद्रासाहित विविध राज्यसरकारच्या निर्णयाच्या माहिती दिली.. तसेच मा. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती दिली.. मा.जैन साहेब हे समितीने दिलेल्या अहवालावर चिटकून असल्यासारखे दिसून आले.. केंद्र सरकार प्रमाणे आपण द्यावेच असे काही नसते ,असे ते बोलले.. आम्हीही त्याला ठामपणे प्रतिउत्तर दिलेच.. "साहेब योजना लागू करताना केंद्राच्या धर्तीवर आणि सुधारणा करताना आपण म्हणून तश्याच, हे योग्य नाही.." 
त्यांनीही सर्व presentation आपल्या टीम कडून समजून घेतले..

३. वी. के. गौतम 
(प्रधान सचिव - लेखा व कोषागार)
आपली DCPS/NPS , पेन्शन संबंधित विभागाचे मुख्य सचिव गौतम साहेब यांना भेटून कोर्टाने संघटनेला दिलेल्या स्टे बाबत माहिती दिली.. परंतु बऱ्याच ठिकाणी स्टे लागू न करता आपल्याकडे मार्गदर्शन मागवले जात असून त्यामुळे स्टे मिळण्यास उशीर होत आहे..
त्यांनी तात्काळ ह्या विषयाची माहिती घेऊन मा. उपसचिव यांना याविषयीचा अहवाल सादर करायला सांगितला आहे..

४. मा.अनुदिप दिघे
(उपसचिव, वित्त विभाग- लेखा व कोषागार)
आपल्या DCPS/NPS योजनेबाबत व हिशोबाबत प्रमुख माहिती यांच्याकडे असते..
त्यांच्याशी हिशोब व कपात याबाबत चर्चा केली.. परंतु हे तितकेशे सकारात्मक दिसून आले नाहीत..

५. मा. पाठक 
(कार्यासन अधिकारी, आदिवासी विभाग)
आदिवासी विभागातील आपल्या बांधव श्री. कासार सर व इतर टीम ने टाकलेल्या केस व स्टे बाबत त्यांना भेटून अजूनही स्टे लागू होत नसल्याचे सांगितले.. त्यांनी तात्काळ वित्त विभागातील कार्यासन अधिकारी यांची भेट घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सदरची फाईल वित्तकडे वर्ग केली.. लवकरच त्याबाबत प्रकल्प अधिकारी यांना कळवले जाईल..


सहकाऱ्यांनो....
आपला पाठपुरावा सुरूच आहे.. आणि सुरूच राहील...आणि हो चळवळीशिवाय यश अशक्यच आहे..

आमची ताकद आपण आहात... आपला पाठिंबा नि प्रेम हेच बळ...

कायम आपलाच
प्राजक्त झावरे-पाटील
8898880222/9833781817

Saturday, January 27, 2018



🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆

चलो दिल्ली---30 एप्रिल 2018
    मित्रहो ,
           जुनी पेंशन वारे आता राष्ट्रीय पातळीवर सुदधा वाहु लागले आहे. ही आपल्या अस्तित्वची लढाई आहे,म्हातारपणाची काठी आहे,  जुनी पेन्शन हा आपल्या सर्वांच्या सम्मान व स्वाभिमानाचा विषय आहे.मित्रहो ,उठो व जागे व्हा आणि आपल्या संविधानिक अधिकाराचा लढा स्वतः लढा. सर्व लढवय्ये तरुण आहे, सर्वामध्ये जोश आहे. जर आज आपण लढा दिला नाही तर येणारे भविष्य आपल्यावर हसेल. जर आता आपण आपल्या हक्का साठी नाही लढणार तर केव्हा लढणार?


    म्हणून आताच दिल्ली साठी आपली सिट बुक करा . आणि या पेन्शन आंदोलनाचे तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा.


 चलो दिल्ली , चलो दिल्ली
🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆
30 एप्रिल 2017
🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆


अध्यक्ष/ सचिव
चंद्रपूर
दिल्ली चलो ---30 अप्रैल 2018
    साथियो ,
           पुरानी पेंशन के लिए विगुल बज गया है ।यह हमारे अस्तित्व की लडाई है पेंशन बुढापे की लाठी है यह हम सबके सम्मान व स्वाभिमान का विषय हैं ।दोस्तो ,उठो और जागो अपने  संवैधानिक अधिकार की लडाई खुद ही लडनी पडेगी ।दूसरे के भरोसे सोने का समय नही बचा है ।युवा है ,जोश है  अगर अभी अपने हक के लिए नही खडे हो पायेगे तो कब लडेगे ?? 
    इसीलए दिल्ली के लिए कूच करे अभी से ट्रेन का रिजर्वेशन खुद कराये लोगो का करवाये। बाद में चाह कर भी नही जा पायेगे क्योकि कई ट्रेनो में अभी से सीटे फुल वता २ही है देर न करे ट्रेन में अपना स्थान सुरक्षित कराये ।क्योकि पेंशन बहाली आन्दोलन के आप खुद गवाह बने।कल पेंशन बहाल हो तो अपने बुढापे को सुरक्षित करते हुए आप कह सके कि उस लडाई का में भी हिस्सा था।
     ट्रेन का रिजर्वेंशन कराये आज कराये अभी कराये । 30 अप्रेल को दिल्ली पहुचे ।अपने लिए ,अपनो के लिए ।
     आपका ----
          विजय कुमार बन्धु
              राष्ट्रीय अध्यक्ष
                NMOPS
           प्रदेश  अध्यक्ष
              ATEWA -UP 
         09415361543

Friday, December 15, 2017

🌻🌻🌻🌹🌹🌻🌻🌻

महाआक्रोश मुंडन मोर्चा गीत..

झोपेतून आता तरी तू उठ रे लेका
भविष्याचा आहे तुझा प्रसंग बाका
चल पेंशन आंदोलनाचा साथीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो

अन्यायाविरुद्ध लढू, आता आपण बंड करू
चुकीच्या शासन निर्णयांना कायमचे बंद करू
सोड ते मौन चल लढ्याचा शिलेदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो

शिक्षणसेवक,dcps, २३/१० आता खूप झाले
अन्यायाचा पहिला बळी ठरून सारं सहन केले
पुरे ही नाटकं चल लढ्याचा तू भागीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो

नक्की मिळेल जे हवं धार लढ्याची तेज करू
सगळ्यांच्या एकीने सरकारला ही पुरून उरू
उठ मित्रा तुझ्या न्यायाचा हकदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो


दिनांक 18/12/2017 च्या नागपूर विधानभवनावरील महाआक्रोश मुंडन मोर्चात सगळ्यांनी सामील व्हा...

समान काम समान वेतन समान पेंशन....

एकच मिशन....
       
                     जुनी पेंशन....
____________________________________

Saturday, December 9, 2017

👏महा आक्रोश मुण्डन मोर्चा नियोजन👏

   🌹जिल्हा कार्यकारिणी सभा🌹

चन्द्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटना

प्रिय,
     मित्र आणि मैत्रीनीनो,
     
     दी 9 डिसम्बर 2017 ला भावनजी भाई हायस्कूल येथे 2 वाजता नियोजन सभा पार पडली.
     त्याठिकानी खालील विषय व ठराव पार करण्यात आले.


   1) महा आक्रोश मुंडन मोर्चा ची प्रसिध्दि करण्यकरिता वर्तमान पत्रात बातमी देणे

   2) मोठे पाम्पलेट प्रत्येकी प्रति तालुका 25 ज्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी लावन्यसाठी मिळेल.

  3)छोटे पाम्पलेट मोठ्या पाम्पलेट वरील नमूना घेऊन आपल्या तालुक्यातील व्यक्ति व पदे लिहून शाळा,विभाग,कार्यालय भेटी देणे.

  4)टोपी *एकच मिशन,जुनी पेंशन* है जिल्हा कार्यकारिणी कडून प्राप्त होईल त्याकारिता जिल्हा कार्यकारिणी मधील सदस्य जे निरीक्षक म्हणून कार्य करणार आहेत त्यांच्याकडे देण्यात यावे.

5) जिल्हा कार्यकारिणी मोर्चा समोर घेण्यासाठी एक व चन्द्रपुर जिल्ह्यात प्रमुख ठिकाणी दोन असे बैनर बनवायचे आहेत.तालुका व विभाग यांनी बैनर स्वतंत्र तयार करावे.

  6)गाडी ला लवायचे बैनर तालुका कार्यकारिणी ने करावे.

7)प्रत्येक तालुक्याने किमान 15 घोषवाक्ये तयार करावी व नागपुर ला आणवी.

8) तालुक्यातील महा आक्रोश मुंडन मोर्चाचे सहभागी होणाऱ्या कर्मचार्यांनी यादी तालुका अध्यक्ष यांनी करावी.ति प्रिंट काढून घ्यावी.

9)प्रत्येक तालुका मधून जास्तीत जास्त संखेने उपश्टित होण्यकरित प्रसिद्धि करावी.

10) चन्द्रपुर जिल्ह्यसाठी जो ब्लॉग तयार झाला आहे त्याठिकानी सर्व dcps /nps धरकांनी फॉर्म भरावे.

       चन्द्रपुर जिल्ह्यातील 15 तालुके या साठी जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांची मुंडन मोर्चा करीता मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून खालील व्यक्तिची नेमनुक करण्यात आली.

1)राजुरा,जीवती, कोरपन ह्या तालुक्यासाठी मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून श्री दुशान्त निमकर यांनी त्या तालुक्यात जाहून तालुका कार्यकारिणी सोबत कार्य करावे.

2)भद्रावती,वरोरा श्री प्रशांत खुसपुरे सर वचंद्रपुर बल्लारपुर श्री योगराज भिवगड़े सर यांनी मार्गदर्शक व निरीक्षक यांची भूमिका राहील.

3)श्री अविनाश चवले यांनी खासगी शाळा यांची मार्गदर्शनात व निरीक्षक म्हणून काम पार पडणे.

4)चिमूर,नागभीड़, यकारिता जितेश मेश्राम सर व सिंदेवाहि ब्रम्हपुरी यकारिता श्री जितेंद्र बल्कि सर यांनी काम बघावे.

5)मूल,सावली साठि कु नूतन मेश्राम व पोम्भूर्ण,गोंड़पिपरि श्री नीलेश कुमरे सर यांनी भूमिका पार पाड़ने.

6)पटबंधरे व जलसंपदा विभाग श्री विनोद पेन्डोर सर है मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

7)कृषि विभाग श्री चंद्रकांत कोटपल्लीवार सर मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

8)वनविभाग कु अर्चना नौकरकर मैडम मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

9) महसूल विभाग श्री अमोल आखाड़े मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून कार्य पार पडतील.


10)आश्रमशाला विभाग श्री देव कुईटे सर मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

11)आरोग्य विभाग श्री रामकृष्ण गीते सर कार्य पार पडतील.


   काही समस्या असल्यास (9765548949)ह्या मो न वर कॉल करावे.


आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत

अध्यक्ष/सचिव

चन्द्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटना

Thursday, December 7, 2017

विसरु नका....👉🏻१८/१२/२०१७

!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!
       
🚩 चलो नागपूर   🚩 🚩 चलो नागपूर  🚩
                       
जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी  सर्व कर्मचार्यांचे नागपूर येथे
           👇 सोमवार ,दि. १८ डिसेंबर २०१७ ला विधिमंडळावर👇

    💥 महाआक्रोश मुंडण मोर्चा 💥


     प्रमुख मागण्या :-

👉 1) दि.1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचार्यांना जुनीच १९८२ व १९८४ ची निवृत्तीवेतन योजना लागू करावी.
👉 2) दि.1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त मृत्त कर्मचार्यांच्या परिवाराला केंद्रसरकारच्या धर्तीवर जुन्याच कुटुंब निवृत्तीवेतन योजना (१९८२ व १९८४) चा लाभ तात्काळ देण्यात यावा.
👉 3) दि.1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व  कर्मचार्यांना केंद्रसरकारच्या धर्तीवर मृत्यु आणि सेवानिवृत्ती सेवाउपदानाचा (ग्रज्युटीचा) लाभ तात्काळ देण्यात यावा.
👉 4) 1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक होनाऱ्या  कर्मचाऱ्यावर  ( वेतन, वेतनवाढ व सेवाविषयक) अन्याय होईल असे कोणतेही निर्णय शासनाने लादू नये.

           महाराष्ट्र सरकारने 1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचार्यांना जुनी १९८२ व १९८४ ची पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक DCPS/NPS योजना सुरु केली आहे. यात भरीस भर कि काय आता  वेळोवेळी विविध अन्यायकारक शासन निर्णय काढून त्यांच्यावर अन्याय करीत आहे. केंद्र सरकारने आपल्या  DCPS/NPS  धारक मृत कर्मचार्यांना सदर योजना लाभाची नसल्याने जुनीच कुटुंब निवृत्ती वेतन योजना २००९ ला लागू केली त्याला अनुसरून उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड यासारख्या अनेक राज्यांनीही आपल्या NPS धारक राज्य कर्मचारी यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. मात्र महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या  DCPS/NPS  धारक मृत कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे अश्रू त्यांच्यावर  आलेली उपासमारीची पाळी याची साधी दखल घेन्यासही प्रयत्न करीत नाही उलट आर्थिक दुरवस्थेचे नकली चेहरे समोर करते मात्र आपल्या आमदार व मंत्र्यांचा  पगारवाढ  आणि पेन्शनवाढ 2 मिनिटात पास करून शासनाची आर्थिक स्थिती देशात पहिल्या क्रमांकावर सांगते.
             केंद्र सरकारने २०१६ ला व त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश व उत्तराखंड राज्याने आपल्या NPS धारक कर्मचार्यांना सेवानिवृत्त्ती व मृत्यू नंतर सेवा उपदान (ग्रज्युटी ) देण्याचा निर्णय घेताला मात्र महाराष्ट्र शासनाणे सेवा उपदान देण्याचे सोडून 10 वर्ष पूर्वी मृत्यू झाल्यास पेन्शन म्हणून 10 लाख देण्याचा गाजर दाखविते व नियमित निवृत्तीवेतन देण्यास ताळाटाळ करते.
        शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचारी यांना बळीचा बकरा केला आहे. त्यांच्या वेतन, वेतनवाढ व  सेवेवर परिणाम व आर्थिक कुचंबना होईल असे भाराभर शासन निर्णय काढून  कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा घाट शासनाने घातला आहे.
        या सर्व अन्यायकारक बाबीचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी मिळून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर  दि. १८ डिसेंबर २०१७ ला मुंडण व महाआक्रोश मोर्चा करणार आहेत.

         
👏👏👏
                   दि. 18 डिसेंबर 2017 ला नागपूर मध्ये  सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे ही विनंती.

         
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏             
         राज्याध्यक्ष /राज्यसचिव /सर्व संस्थापक सदस्य/सर्व राज्यकार्यकारिणी पदाधिकारी/सर्व जिल्हाध्यक्ष/सर्व तालुकाध्यक्ष व सर्व पेंन्शन शिलेदार
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन