👏👏👏
मा.श्री.गंगाधर म्हमाणे, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी 31 जानेवारी,2018 रोजी सर्व विभागीय शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधिक्षक यांना dcps योजनेच्या अंशदानाच्या रकमा पर त करण्याबाबतची कार्यपद्धती विषयाच्या पत्राबाबत* खुलासा....
या पत्रात शालेय शिक्षण विभागाच्या 20 डिसेंबर 2017 च्या शासनादेशाचा उल्लेख करुन तात्काळ कार्यवाही करण्याबाबत लिहिले आहे.
_"नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपद्धती"_ या शिर्षकाखाली शालेय शिक्षण विभागाने आज २० डिसेंबर २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. शालेय शिक्षण विभाग या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळे आदेश मागील 7 वर्षांपासून काढत आहे त्यातीलच हा एक आदेश आहे.
आत्तापर्यंत मागील 12 वर्षात या नवीन dcps योजनेची अंमलबजावणी करण्यात शासन पुरते फसले आहे. ही योजना लागू करताना त्याची अंमलबजावणी बाबतीत सर्वप्रकारची तयारी करणे आवश्यक होते पण तसे करण्यात न येता ही योजना लागू करण्यात आली. *या योजनेत येणारे हजारो कर्मचारी मृत झाले आहेत तर काही सेवानिवृत्त, त्यात सगळ्यात जास्त शिक्षण विभागातील आहेत. त्यांच्या कुटूंबियांना अद्याप शासनाकडून कोणताही परतावा मिळाला नाही. त्यांचे कुटूंबीय आपापल्या आस्थापणात या बाबतीत पाठपुरावा करत आहेत. स्थानिक कार्यालयाला यांच्या परताव्याबाबत कोणती कार्यवाही करावयाची याची माहिती नसल्याने ते वरिष्ठ कार्यालयास मार्गदर्शन मागवत होते. असे अनेक मार्गदर्शन मागविण्यात आल्याने हा शासन आदेश निर्गमित झाला आहे एवढेच. त्यात दुसरे काही नसून कार्यवाहीबाबी आहेत.
_खरे पाहता या आदेशात शासनवाटा देऊन परतावा देण्याची कार्यवाही करावी असे म्हटले आहे. आता हे नवलच आहे कारण अद्याप शिक्षण विभागातील कोणत्या विभागात व जिल्ह्यात शासनवाटा जमा झाला आहे❓❗यासह अनेक प्रश्न आहेत पण असो तो शासनाचा विषय.._🤔
एक सांगू इच्छितो आपण संघटीत लढा देत आहोत ते मृत कर्मचारी कुटूंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रज्युटी पूर्ववत चालू व्हावे व सर्व कर्मचार्यांना जुनी पेंशन लागू व्हावी. आपणास मागील मुंडन आक्रोश आंदोलनात मा.मुख्यमंत्री यांनी कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रज्युटी बाबत अश्वासित केले आहे. आपण याचा पाठपुरावा करत आहोत. पाहुयात ते त्यांचा शब्द किती पाळतात ते, नाहीतरी आपला लढा "जुनी पेंशन" मिळेपर्यंत चालूच राहणार आहे. तो कायम चालूच राहणार. शासन व शिक्षण विभाग आपले काम करत आहे आपण आपले "संघटित लढ्याचे" काम करत राहुयात..।।
आपला लढा
फॅमिली पेन्शन व जुन्या पेन्शन साठी आहे..।।👏🤝🌹
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या दबावामुळे शालेय शिक्षण विभागाने कुठलीही पर्याप्त माहिती किंवा आकडेवारी नसताना 20 डिसेंबर, 2017 चे परिपत्रक काढले आहे..।। तर त्याच्या कार्यवाहीसाठी शिक्षण संचालकांनी आपल्या अखत्यारीतील विभागांना "ते" 31 जानेवारी, 2018 च्या या पत्रानुसार पुढे पोहचविले आहे एवढेच..।।
(अनेकांचे फोन व message येऊ लागल्याने हे स्पष्टीकरण)
👆या विषयी, माझ्याशी संपर्कासाठी व आपल्या लढ्याबाबत जाणून घेण्यासाठी माझ्या facebook page ला like करा... link👇
जय हो..।।👏💐🌹
कायम आपलाच
~शिवाजी खुडे
राज्यप्रवक्ते
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना
=_=_=_==_★★★★★=_=_=_
No comments:
Post a Comment