DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, November 27, 2017

एकच ध्यास- सर्वांना जुनी पेंशन

   एकच मिशन - जुनी पेंशन

         प्रिय बंधू- भगीनिनो!

    जरा विचार करा. महाराष्ट्र सरकारने फक्त केंद्र सरकार* च्या एका पत्रावरून, 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी साठी, जुनी पेंशन बंद केली. 
    आणि डिसीपीएस , एनपीएस ही अन्यायकारक योजना सुरू केली.
        पार संविधान बदलवून मनमानी आदेश आमच्यावर थोपविला. 
     बारा वर्ष होवूनही या आदेशाचे कायद्यात रूपांतर न करता, दबरदस्ती करून आमच्या भविष्या सोबत खेळ करत आहेत.
             फक्त केंद्र सरकार ने  सांगीतल. म्हणुन राज्यसरकारने आमच्या भविष्या सोबत खेळ सुरू केला.
        म्हणुनच आपणही एकसंघ, एकत्र होवून, या शासन निर्णय विरोधात, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या* माध्यमातुन लढा तीव्रतेने सुरू केला आहे. 
        "आता जिंकू किंवा मरू"
अशीच आरपारची लढाई सुरू झालेली आहे. 

हि लढाई जुनी पेंशन हक्क संघटनच्या सर्व एकनिष्ठ शिलेदारांनी सुरू केलेली आहे.

सर्वांनी तन-मन-धनांने सहकार्य असु द्यावा.
        
       मा. मुख्यमंत्री साहेब परवा दिवशी एका कार्यक्रमात मोठ्या तो-यात बोलत होते की, नविन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खूप फायद्याची आहे. यात खूप फायदा आहे. 

      मा. मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की,
     नविन परिभाषित निवृत्ती योजना जर एवढी फायद्याची आहे.
तर मंत्री, आमदार, खासदारांना ही योजना लागू करावी.

मग बघू , किती दम आहे तुमच्यात.
👏👏👏👏👏👏👏

 ☝ एकच मिशन जुनी पेंशन ☝

✊  चला सर्व एकत्रित या. ✊

 😡 मागे राहू नका. 😡

🏃🏃‍♀     प्रत्येक सभेला ,मोर्च्याला उपस्थित रहा.🏃🏃‍♀
    
   👉   कामे तर सर्वांनाच असतात, पण आपल्या भविष्यापेक्षा , कोणतेही काम मोठे असूच शकत नाही.👈

हे मनात उतरवून घ्या.
☝☝☝☝☝☝☝

 संघटन म्हणजे एकी आहे.
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
          - आपलाच
महादेव शामराव मुनावत (सशि.)
संपर्क प्रमुख
म.रा.जु.पें.ह.संघटन,जिल्हाशाखा,चंद्रपूर.

Saturday, November 25, 2017

प्रति,
जिल्हा कार्यकारिणी सदस्य(सर्व),
तालुकाध्यक्ष(सर्व),
व विभाग प्रमुख (सर्व)
जिल्हा चन्द्रपुर

सस्नेह,जय महाराष्ट्र

    जय पेंशन
आपणास कळविण्यात येत आहे की, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनची वाटचाल दमदारपणे जुनी पेंशन मिळविण्याकडे सुरू झालेली असून हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी  जिल्हा कार्यकारिणी सदस्य तालुका अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष,कार्याध्यक्ष महिला उपाध्यक्ष यांनी नागपुर ला येणे अनिवार्य आहे,राज्यकार्यकारिणीने राज्याध्यक्ष यांच्या नेत्रुत्वात राज्यदौरा आखला असुन याअनुषंगाने ते आपल्यापर्यंत येत आहे.

यापुढील संघटनेची रणनिती, संघटनवाढ, हिवाळी अधिवेशन नियोजन आणि इतर महत्वांच्या मुद्यांवर यामध्ये चर्चा होणार असून आपल्या अधिनस्थ असलेले सर्व शिलेदार यांनी या सभेला उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

सभादिनांक :- 28 नोव्हेंबर 2017
सभावेळ :- दुपारी 1.00 च्या पुढे
सभास्थळ :- अध्यापक भवन, गणेशपेठ बसस्टॉप च्या समोर,नागपुर.

सभेला येत असताना खालील गोष्टी घेवून येणे बंधनकारक आहे.
1) जिल्हानिहाय-तालुकानिहाय डीसीपीएस सभासदांची संख्यानिहाय यादी.
2) म्रुत कर्मचार्यांची यादी व सविस्तर माहिती.
3) आतापर्यंत आपणास मिळालेले मा. आमदारांचे समर्थन पत्रे.

एकच मिशन जुनी पेंशन..

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
     अध्यक्ष/सचिव
चन्द्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन.

Friday, November 24, 2017

🚎🚎🚎🚎🚎🚎🚎🚎🚎
महाराष्ट्र दौरा              महाराष्ट्र दौरा                         

!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!


    🙏    राज्याध्यक्ष, विश्वस्थ व  राज्यकार्यकारिणी आपल्या दारी - आपल्या विभागात   🙏
 
       🚎 महाराष्ट्र दौरा... 🚎

       👏
            मित्रांनो ,        
            विधानमंडलाच्या हिवाळी अधिवेशन 2017 च्या पूर्वसंध्येवर महाराष्ट्रातील सामान्य शीलेदार , पदाधिकारी यांच्याशी हितगुज करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच संघटनेच्या पुढील कृती कार्यक्रमाची जाणीव - जागृती करणे यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष, सचिव, कार्यध्यक्ष,कोषाध्यक्ष , राज्यसल्लागार , उपाध्यक्ष तसेच सर्व विश्वस्थ व राज्यकार्यकारिणी पदाधिकारी यांनी महाराष्ट्रातील सर्व विभागात दौरा करण्याचे ठरविले आहे. तरी प्रत्येक विभागातील सामान्य शिलेदार, तालुका कार्यकारिणी , जिल्हाकार्यकरिणी, इतर पदाधिकारी यांनी सदर दौऱ्यातील बैठकांमध्ये सहभागी होऊन पेंशन लढ्याला मजबूत करावे.


   प्रति,
        सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हाकार्यकरिणी
        तथा
       सर्व तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारिणी
        आपणास विनंती करण्यात येते की👇खालील दौर्यानुसार आपल्या  विभागातील बैठकीच्या दिवशी तालुका व जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष  यांनी उपस्थित असणे अनिवार्य आहे. सोबत इतर पदाधिकारी यांनाही उपस्थित राहण्यासाठी विनंती करावी


      🔰  दौरा नियोजन🔰

▪ दि. 28 नोव्हेंबर 2017 मंगळवार
👉 स्थळ- नागपूर शहर

        नागपूर विभाग
(समाविष्ट जिल्हे- नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली,  गोंदिया)

▪ दि. 29 नोव्हेंबर 2017, बुधवार
👉 स्थळ- देऊळगावराजा, बुलढाणा

        अमरावती विभाग
    समाविष्ठ जिल्हे- अमरावती, यवतमाळ,वाशिम,अकोला, बुलढाणा 
          
▪दि. 30 नोव्हेंबर 2017, गुरुवार
👉 स्थळ- मालेगाव, नाशिक

        नाशिक विभाग
(समाविष्ठ जिल्हे-नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, धुळे)

▪दि. 1 डिसेम्बर 2017, शुक्रवार
👉 स्थळ- सातारा

         पुणे विभाग
(समाविष्ट जिल्हे-पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा)

▪दि. 2 डिसेम्बर 2017 शनिवार
👉 स्थळ- एरोला, नवी मुंबई

        कोकण विभाग
(समाविष्ट जिल्हे-  मुबई, नवी मुबई, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,पालघर)
  
▪दि. 3 डिसेम्बर2017, रवीवार
 👉 स्थळ- परभणी शहर

      औरंगाबाद विभाग
(समाविष्ट जिल्हे-औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी)
   
       🙏🙏🙏🙏🙏
      राज्याध्यक्ष/सरचिटणीस/ सर्व विश्वस्थ/सर्व राज्यकार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन