DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Friday, December 15, 2017

🌻🌻🌻🌹🌹🌻🌻🌻

महाआक्रोश मुंडन मोर्चा गीत..

झोपेतून आता तरी तू उठ रे लेका
भविष्याचा आहे तुझा प्रसंग बाका
चल पेंशन आंदोलनाचा साथीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो

अन्यायाविरुद्ध लढू, आता आपण बंड करू
चुकीच्या शासन निर्णयांना कायमचे बंद करू
सोड ते मौन चल लढ्याचा शिलेदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो

शिक्षणसेवक,dcps, २३/१० आता खूप झाले
अन्यायाचा पहिला बळी ठरून सारं सहन केले
पुरे ही नाटकं चल लढ्याचा तू भागीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो

नक्की मिळेल जे हवं धार लढ्याची तेज करू
सगळ्यांच्या एकीने सरकारला ही पुरून उरू
उठ मित्रा तुझ्या न्यायाचा हकदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो


दिनांक 18/12/2017 च्या नागपूर विधानभवनावरील महाआक्रोश मुंडन मोर्चात सगळ्यांनी सामील व्हा...

समान काम समान वेतन समान पेंशन....

एकच मिशन....
       
                     जुनी पेंशन....
____________________________________

Saturday, December 9, 2017

👏महा आक्रोश मुण्डन मोर्चा नियोजन👏

   🌹जिल्हा कार्यकारिणी सभा🌹

चन्द्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटना

प्रिय,
     मित्र आणि मैत्रीनीनो,
     
     दी 9 डिसम्बर 2017 ला भावनजी भाई हायस्कूल येथे 2 वाजता नियोजन सभा पार पडली.
     त्याठिकानी खालील विषय व ठराव पार करण्यात आले.


   1) महा आक्रोश मुंडन मोर्चा ची प्रसिध्दि करण्यकरिता वर्तमान पत्रात बातमी देणे

   2) मोठे पाम्पलेट प्रत्येकी प्रति तालुका 25 ज्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी लावन्यसाठी मिळेल.

  3)छोटे पाम्पलेट मोठ्या पाम्पलेट वरील नमूना घेऊन आपल्या तालुक्यातील व्यक्ति व पदे लिहून शाळा,विभाग,कार्यालय भेटी देणे.

  4)टोपी *एकच मिशन,जुनी पेंशन* है जिल्हा कार्यकारिणी कडून प्राप्त होईल त्याकारिता जिल्हा कार्यकारिणी मधील सदस्य जे निरीक्षक म्हणून कार्य करणार आहेत त्यांच्याकडे देण्यात यावे.

5) जिल्हा कार्यकारिणी मोर्चा समोर घेण्यासाठी एक व चन्द्रपुर जिल्ह्यात प्रमुख ठिकाणी दोन असे बैनर बनवायचे आहेत.तालुका व विभाग यांनी बैनर स्वतंत्र तयार करावे.

  6)गाडी ला लवायचे बैनर तालुका कार्यकारिणी ने करावे.

7)प्रत्येक तालुक्याने किमान 15 घोषवाक्ये तयार करावी व नागपुर ला आणवी.

8) तालुक्यातील महा आक्रोश मुंडन मोर्चाचे सहभागी होणाऱ्या कर्मचार्यांनी यादी तालुका अध्यक्ष यांनी करावी.ति प्रिंट काढून घ्यावी.

9)प्रत्येक तालुका मधून जास्तीत जास्त संखेने उपश्टित होण्यकरित प्रसिद्धि करावी.

10) चन्द्रपुर जिल्ह्यसाठी जो ब्लॉग तयार झाला आहे त्याठिकानी सर्व dcps /nps धरकांनी फॉर्म भरावे.

       चन्द्रपुर जिल्ह्यातील 15 तालुके या साठी जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांची मुंडन मोर्चा करीता मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून खालील व्यक्तिची नेमनुक करण्यात आली.

1)राजुरा,जीवती, कोरपन ह्या तालुक्यासाठी मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून श्री दुशान्त निमकर यांनी त्या तालुक्यात जाहून तालुका कार्यकारिणी सोबत कार्य करावे.

2)भद्रावती,वरोरा श्री प्रशांत खुसपुरे सर वचंद्रपुर बल्लारपुर श्री योगराज भिवगड़े सर यांनी मार्गदर्शक व निरीक्षक यांची भूमिका राहील.

3)श्री अविनाश चवले यांनी खासगी शाळा यांची मार्गदर्शनात व निरीक्षक म्हणून काम पार पडणे.

4)चिमूर,नागभीड़, यकारिता जितेश मेश्राम सर व सिंदेवाहि ब्रम्हपुरी यकारिता श्री जितेंद्र बल्कि सर यांनी काम बघावे.

5)मूल,सावली साठि कु नूतन मेश्राम व पोम्भूर्ण,गोंड़पिपरि श्री नीलेश कुमरे सर यांनी भूमिका पार पाड़ने.

6)पटबंधरे व जलसंपदा विभाग श्री विनोद पेन्डोर सर है मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

7)कृषि विभाग श्री चंद्रकांत कोटपल्लीवार सर मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

8)वनविभाग कु अर्चना नौकरकर मैडम मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

9) महसूल विभाग श्री अमोल आखाड़े मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून कार्य पार पडतील.


10)आश्रमशाला विभाग श्री देव कुईटे सर मार्गदर्शक व निरीक्षक राहतील.

11)आरोग्य विभाग श्री रामकृष्ण गीते सर कार्य पार पडतील.


   काही समस्या असल्यास (9765548949)ह्या मो न वर कॉल करावे.


आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत

अध्यक्ष/सचिव

चन्द्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटना

Thursday, December 7, 2017

विसरु नका....👉🏻१८/१२/२०१७

!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!
       
🚩 चलो नागपूर   🚩 🚩 चलो नागपूर  🚩
                       
जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी  सर्व कर्मचार्यांचे नागपूर येथे
           👇 सोमवार ,दि. १८ डिसेंबर २०१७ ला विधिमंडळावर👇

    💥 महाआक्रोश मुंडण मोर्चा 💥


     प्रमुख मागण्या :-

👉 1) दि.1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचार्यांना जुनीच १९८२ व १९८४ ची निवृत्तीवेतन योजना लागू करावी.
👉 2) दि.1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त मृत्त कर्मचार्यांच्या परिवाराला केंद्रसरकारच्या धर्तीवर जुन्याच कुटुंब निवृत्तीवेतन योजना (१९८२ व १९८४) चा लाभ तात्काळ देण्यात यावा.
👉 3) दि.1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व  कर्मचार्यांना केंद्रसरकारच्या धर्तीवर मृत्यु आणि सेवानिवृत्ती सेवाउपदानाचा (ग्रज्युटीचा) लाभ तात्काळ देण्यात यावा.
👉 4) 1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक होनाऱ्या  कर्मचाऱ्यावर  ( वेतन, वेतनवाढ व सेवाविषयक) अन्याय होईल असे कोणतेही निर्णय शासनाने लादू नये.

           महाराष्ट्र सरकारने 1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचार्यांना जुनी १९८२ व १९८४ ची पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक DCPS/NPS योजना सुरु केली आहे. यात भरीस भर कि काय आता  वेळोवेळी विविध अन्यायकारक शासन निर्णय काढून त्यांच्यावर अन्याय करीत आहे. केंद्र सरकारने आपल्या  DCPS/NPS  धारक मृत कर्मचार्यांना सदर योजना लाभाची नसल्याने जुनीच कुटुंब निवृत्ती वेतन योजना २००९ ला लागू केली त्याला अनुसरून उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड यासारख्या अनेक राज्यांनीही आपल्या NPS धारक राज्य कर्मचारी यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. मात्र महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या  DCPS/NPS  धारक मृत कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे अश्रू त्यांच्यावर  आलेली उपासमारीची पाळी याची साधी दखल घेन्यासही प्रयत्न करीत नाही उलट आर्थिक दुरवस्थेचे नकली चेहरे समोर करते मात्र आपल्या आमदार व मंत्र्यांचा  पगारवाढ  आणि पेन्शनवाढ 2 मिनिटात पास करून शासनाची आर्थिक स्थिती देशात पहिल्या क्रमांकावर सांगते.
             केंद्र सरकारने २०१६ ला व त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश व उत्तराखंड राज्याने आपल्या NPS धारक कर्मचार्यांना सेवानिवृत्त्ती व मृत्यू नंतर सेवा उपदान (ग्रज्युटी ) देण्याचा निर्णय घेताला मात्र महाराष्ट्र शासनाणे सेवा उपदान देण्याचे सोडून 10 वर्ष पूर्वी मृत्यू झाल्यास पेन्शन म्हणून 10 लाख देण्याचा गाजर दाखविते व नियमित निवृत्तीवेतन देण्यास ताळाटाळ करते.
        शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचारी यांना बळीचा बकरा केला आहे. त्यांच्या वेतन, वेतनवाढ व  सेवेवर परिणाम व आर्थिक कुचंबना होईल असे भाराभर शासन निर्णय काढून  कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा घाट शासनाने घातला आहे.
        या सर्व अन्यायकारक बाबीचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी मिळून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर  दि. १८ डिसेंबर २०१७ ला मुंडण व महाआक्रोश मोर्चा करणार आहेत.

         
👏👏👏
                   दि. 18 डिसेंबर 2017 ला नागपूर मध्ये  सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे ही विनंती.

         
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏             
         राज्याध्यक्ष /राज्यसचिव /सर्व संस्थापक सदस्य/सर्व राज्यकार्यकारिणी पदाधिकारी/सर्व जिल्हाध्यक्ष/सर्व तालुकाध्यक्ष व सर्व पेंन्शन शिलेदार
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Wednesday, December 6, 2017

✊✊✊✊✊✊✊

एकच मिशन -जुनी पेंशन

🚶🏻‍♂🚶🏻‍♀🚶🏻‍♂🚶🏻‍♀🚶🏻‍♂🚶🏻‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🚶🏻‍♂🚶🏻‍♂🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻👬👬👬👬👬👬

👏👏 चलो नागपुर....👏👏
चलो नागपुर....
    चलो नागपुर...
          चलो नागपुर.....
👏👏👏👏👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या हक्काच्या मागणीसाठी
☝☝☝☝☝☝☝

    😡😡😡😡 "महाआक्रोश मुंडण मोर्चा"😡😡😡😡

👉 महा. रा. जु. पें. हक्क संघटन, महाराष्ट्र
 यांचा 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी साठी, जुनी पेंशन सुरू करण्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे, भव्य आक्रोश मोर्चा दि. 18 डिसेंबर 2017 ला नियोजित केलेला आहे.

     तरी सर्व कर्मचारी बंधू- भगीनिनी या "महाआक्रोश मुंडण " मोर्चात बहुसंख्येने उपस्थित रहावे.
      आपल्या भविष्यापेक्षा काहीही मोठं नसते. आपल्या हक्काच्या मागणी साठी, आपल्याला वृद्धापकाळ सन्मानाने जगण्यासाठी, आपल्याला हिवाळी अधिवेशना वर mrjphs ने नियोजित केलेल्या "महाआक्रोश मुंडण मोर्चात सहभागी व्हावेच लागेल.
      या बहिऱ्या, आंधळ्या सरकारला  आपल्या हक्काच्या जुनी पेंशन योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी आपल्याला एक दिवसाचा वेळ काढावेच लागेल. आणि आपला आवाज सरकार पर्यंत पोहचवावा लागेल.

     ताई-दादा आम्ही या "महाआक्रोश मुंडण मोर्चात " सहभागी होवून, आपला आक्रोश शासनाला दाखवणार आहोत.
   आपणही आपल्या कुटूंबासाठी सहभागी व्हा. मागे राहू नका. एकजुट होवून आपली व्यथा व आक्रोश सरकार पर्यंत पोहचला पाहिजे.

     त्यासाठी तुम्ही पण आमच्या सोबत खांद्याला खांदा लावुन आपली हक्काची जुनी पेंशन मिळवण्यासाठी आम्हाला साथ द्या.
  👉 नाही तर बाकीचे जातात ना,मी एकटाच /एकटीच नाही गेलो/गेली तर काय फरक पडणार?

 👉 चुकूनही असा विचार मनात आणु नका.

  👉 तुम्ही - आम्ही, सर्व संघटनेची ताकद आहोत.

👉 आपल्या सर्वांच्या सहकार्य कायम हवयं.

🙏🏻🙏🏻👏👏🙏🏻🙏🏻👏🙏🏻
👉 आपल्यासाठी फक्त एक दिवसाचा वेळ द्या.

👉 चला तयारी करा.  हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आपल्या संघटनेची ताकत दाखवून, सरकारला जुनी पेंशन लागू करण्यास भाग पाडण्यासाठी, दि. १८ डिसें. २०१७ ला "महाआक्रोश मुंडण " मोर्चात सहभागी  व्हा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👏👏👏👏👏👏👏👏👏👏

              👏    --- आपले विनित 👏
श्री दुष्यंत निमकर (अध्यक्ष)
श्री माधव मुनावत (संपर्क प्रमुख)
श्री मंगेश साखरकर (आय.टी.प्रमुख)
आणि सर्व सन्मा. कार्यकारिणी गण
म. रा. जु. पें. ह. संघटन, जिल्हा शाखा -चंद्रपूर
✊✊✊✊✊✊✊✊✊
✊ एकच मिशन  -जुनी पेंशन ✊
🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻

Saturday, December 2, 2017


महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन




MISSED CALL मोहीमेचा शुभारंभ नवी मुंबई चे महापौर मा. श्री. सुधाकरजी सोनवणे साहेब ह्यांच्या हस्ते आज राज्यकार्यकारिणी च्या राज्यदौर्यात झाला.



पेंशन ही सरकारची दानशुरता नव्हे तर कर्मचार्यांची कष्टार्जीत मालमत्ता आहे त्या न्यायासाठी


सिंधुदुर्ग पेंशन फायटर सचिन खारतोडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले
👇
👇

8448493544 या क्रमांकावर MISSED CALL देवून जुनी पेंशनच्या लढ्याला साथ द्या....

वरील नंबरवर कॉल केल्यावर एक रिंग जाईल व आपला कॉल आपोआप कट होईल व आपल्याला म्यासेज येईल.

8⃣4⃣4⃣8⃣4⃣9⃣3⃣5⃣4⃣4⃣


आपला एक MISSED CALL..
जुनी पेंशनच्या ध्येयाकडे वाटचाल...


आशुतोष चौधरी
संस्थापक सदस्य तथा विभाग अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन