DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Thursday, February 15, 2018

अखेर मा.तावडे साहेबांचा फोन  आलाच !!!!!!📞📞📞📞

पेंशन लढवय्यांनो नमस्कार 🙏🏻

आज बुधवार दिनांक 14.02.2018 रोजी मा.श्री तावडे साहेबांच्या भेटीसाठी ठीक 2वाजता मंत्रालय परिसरात पोचली.

तावडे साहेब त्यांच्या दालनात 3*30 वाजता आले.

 आम्हाला (मुंबई टीम) आणि  तेथे असणारे दुसरे संघटन शिक्षक परिषद राज्य प्रतिनिधी यांना मीटिंग कॉन्फरन्स रूम मध्ये बसण्यास सांगितली.

1:30 
तासाच्या प्रतीक्षेनंतर साहेब कॉन्फरन्स रूम मध्ये आले.
5 वाजता चर्चेला सुरुवात झाली

अगोदर प्रस्थापित संघटनेच्या मागण्या साहेबांनी ऐकल्या, आणि त्यावर आपले उत्तर दिले. 

आपणाला ही त्यांच्या चर्चेत सहभागी होता आले असते, पण महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मुंबई चे वेगळे अस्तित्व दाखविण्यासाठी आपण त्या चर्चेत सहभाग घेतला नाही.

आपल्या निवेदनातील एक मागनी प्रस्थापित संघटनेनी मांडली. सकारात्मक चर्चा झाली. 23.10 चा जी आर बाबत लवकरच धोरणात्मक सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तावडे साहेबांना अचानक कॅबिनेट च्या मिटिंगसाठी जायचे असल्याने साहेब जाण्यास निघाले,

तेवढ्यात हॉल मध्ये एक आवाज गुंजला, तावडे साहेब थांबा. साहेबां जवळ जाऊन त्या व्यक्तीने सांगितले, "साहेब आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मुंबई टीम. सकाळची शाळा करून दुपारी 2 वाजल्यापासून 4तास आपल्या भेटीची आम्ही वाट बघत आहोत,

" साहेब आमच्या मागण्यांची दखल घेऊन कृपया आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आज डिसिपीएस धारक शिक्षकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे, कृपया त्याला, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा."

साहेबांनी त्या व्यक्तीची तळमळ ओळखली, आणि सांगितले आता मला खरच वेळ देता येत नाही, मला जावें लागेल, पण तुमचे निवेदन मी गाडीत वाचतो, आणि 1 तासात तुम्हाला फोन करतो. असे आश्वासन देऊन साहेब निघून गेले.

मित्रांनो ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आपले मुंबई जिल्हाध्यक्ष श्री तानाजी कांबळे होय.

मित्रांनो आज सकाळी 7 पासून घराबाहेर निघालेली मुंबई टीम रात्री 8-9 वाजता घरी पोचली.

प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, तावडे सर फोन करतील का?

शेवटी मा.श्री तावडे साहेबांचा फोन तानाजी सरांना आलाच,📞📞📞 

साहेब म्हणाले - तुमचे निवेदन मी वाचले, पुढील सविस्तर चर्चेसाठी उद्या तुम्ही मंत्रालयात या.

प्रत्यक्ष मा.शिक्षण मंत्र्यांनी फोन करून आपणास उद्या मिटिंगसाठी पुन्हा बोलावले आहे.

एक होता तानाजी मालुसरे आणि एक आहे आमचा तानाजी कांबळे
 एकाने शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण बलिदान दिले.तर आपला तानाजी तनमनधनाने जुनी पेंशन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

सलाम या वीराला आणि त्याच्या दृढ ध्येयशक्तीला👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

मित्रांनो आज आपली मुंबई पेंशन शिलेदार2 वाजल्यापासून मंत्रालयात ठिय्या मांडून होते, सलाम अशा पेंशन वीरांना👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

मित्रांनो वाढवून सांगणे, फुगवून सांगणे हा मुंबई टीम ची अजिबात सवय नाही.

जे आहे ते सरळ आणि अगदी थेट🙏🏻

उद्या पुन्हा एकदा नव्या जोमाने मुंबई टीम मंत्रालयात दाखल होणार आणि मंत्रालयात गुंजनार फक्त एकच नारा, एकच मिशन जुनी पेंशन"


तूर्तास एवढेच......


उद्याचा वृत्तांत उद्या पाठवू🙏🏻

आपलाच
अलीम सय्यद
सचिव
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मुंबई

No comments:

Post a Comment