DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Thursday, March 15, 2018

!!....महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन... !!

सहकाऱ्यांनो नमस्कार...🙏🏻

कालच्या विधिमंडळातील ठळक घडामोडी :-

१. मृत कर्मचारी यांच्या कुटुंबांना  निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय विचाराधीन..


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२. २३/१० च्या GR वर उद्याच विधिमंडळात चर्चा घेऊन सुधारणा आणू...


शिक्षणमंत्री विनोद तावडे

३. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्यात आपला जुन्या पेन्शनचा मुद्दा घेऊ..


विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे

४. शिक्षक आमदारांची आपल्या प्रश्नावर एकी...मुख्यमंत्र्यांसोबत पुढच्या आठवड्यात मुद्देसूद चर्चेसाठी वेळ...


( आमदार सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, आमदार दत्तात्रय सावंत , आमदार पाटील साहेब व इतर)

५. मृत कर्मचारी बाबत विधिमंडळात लवकरच लक्षवेधी..


आमदार कपिल पाटील

६. समाजवादी पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या जाहीरनाम्यात जुन्या पेन्शन चा मुद्दा घेऊ...


प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी

७. कायम युवा टीम सोबत काम करेल


आमदार प्रणितीताई शिंदे

               आपल्या नियोजित राज्य-कार्यकारणी व विधिमंडळ धडक मोहीमेनुसार काल आम्ही विधिमंडळावर कार्यदमदार राज्य सरचिटणीस गोविंदराव उगले यांच्या नेतृत्वात धडकलो... 
सोबत कुशल संघटक राज्य कोषाध्यक्ष प्रविणजी बडे, आपला बुलंद व तडाखेबाज आवाज नागपूर विभाग अध्यक्ष आशुतोष चौधरी, संघटनेची हजरजबाबी तोफ विश्वस्त बाजीराव मोढवे, अभ्यासू प्रसिद्धीप्रमुख संतोष देशपांडे , रायगडचे दणकेबाज शिलेदार प्रवीण काळे, मुंबईचे धडाडीचे शिलेदार शिवानंद पाटील व प्राजक्त झावरे-पाटील उपस्थित होतो..

          कालचा दिवस खूप सकारात्मक व बळ देणारा असाच गेला.. 

● मा. मुख्यमंत्री भेट:-
             नागपूर अधिवेशनावरील महामुंडण मोर्चावेळी मा. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंदर्भात काल त्यांची विधानभवनातील त्यांच्या अँटी चेंबर मध्ये भेट घेतली..
                मा. मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी आमदार सुधीरभाऊ तांबे व आमदार विक्रम काळे साहेबांनी विशेष मेहनत घेतली.. तसेच आमदार दत्तात्रय सावंत व आमदार बाळाराम पाटील हेही या भेटीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात सोबत उपस्थित होते...
_" मृत कर्मचारी कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याबाबत शासन नक्कीच विचाराधीन असून त्या बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ," असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले..._ 

            आपल्या सोबत असणाऱ्या  आमदारांच्या टीमला या विषयाबाबत पुढील आठवड्यात सखोल चर्चेसाठी वेळ दिला आहे.. 
मुख्यमंत्री साहेबांची अतिशय महत्त्वाची भेट हेच कालच्या विधिमंडळ मोहिमेतील महत्वाचं यश...!

● मा. शिक्षणमंत्री भेट
                   २३/१० च्या अतिशय महत्त्वाच्या GR मधील अट क्र. ४ बाबत आज पुन्हा शिक्षणमंत्री मा. विनोदजी तावडे यांची भेट घेऊन त्यांना मागील आश्वासनाचे स्मरण दिले..
"उद्याच विधिमंडळात हा GR चर्चिला जाणार असून त्याच्यात लागलीच सुधारणा होणार आहेत.."
"गुणवत्ता सोडता बाकी सर्व बाबी यातून वगळल्या जातील.." असे साहेब बोलले..
       _याच विषयावर साहेबांची शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील झाली.._
नक्कीच आपल्याला दिलासा देणाऱ्या सुधारणा यात होतील , अशी ठोस खात्री वाटते...

● मा. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब तसेच मा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांची भेट:-
                  विधिमंडळाच्या पटलावर या मुद्द्यावरून पुन्हा सरकारला धारेवर तर धरुच ; पण पक्षाच्या जाहीरनाम्यात देखील हा  मुद्दा घेऊच अशी हमी भाऊंनी दिली.. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब सोबत होते.. 

● आमदार कपिल पाटिल व पेन्शनची टीम:-
                   मुंबईचे आमदार कपिल पाटील यांनी आपल्या प्रश्नावरून आजच लक्षवेधी बनवली असून ती लवकरच विधीमंडळाच्या पटलावर असेल .

● समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांची भेट:-
              -- समाजवादी पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या जाहीरनाम्यात* आपल्या पेन्शन प्रश्नाचा समावेश करावा , या साठी त्यांना निवेदन दिले.. पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा घेण्याविषयी अध्यक्ष अखिलेश यादव यांना पत्र लिहून प्रवृत्त करूच, असे आझमी यांनी आश्वासन दिले..
(आपण महत्वाच्या पक्षांच्या जसे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे ,समाजवादी इ. च्या प्रदेशाध्यक्षांना 'जाहीरनाम्यात' आपला ठळक मुद्दा घेण्याविषयीचे निवेदन देत आहोत..) 

● आमदार प्रणितीताई शिंदे यांची भेट:-
              कालची सुरवातच प्रणितीताईंच्या प्रसन्न भेटीने झाली.. आम्ही त्यांचे आभार मानले व आपण प्रश्न संपेपर्यंत सतत पाठपुरावा घेत राहावा, अशी आशा व्यक्त केली..
"मी नेहमीच युवा टीम सोबत आहे.." याची खात्री प्रणिती ताईंनी दिली...

तसेच 
आमदार निरंजन डावखरे साहेब, कोकण पदवीधर-ठाणे
आमदार विक्रम काळे साहेब-औरंगाबाद
आमदार राहुलदादा जगताप साहेब-श्रीगोंदा, अहमदनगर
यांनी विधानभवन प्रवेशाचे महत्वपूर्ण पास उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार...!

● विशेष उल्लेख:-
• मुख्यमंत्री भेटी साठी विशेष प्रयत्न करणारे आमदार डॉ. तांबे साहेबांचे विशेष आभार आणि तांबे साहेबांचे नियोजन करणारे आपले नगरचे जिल्हा उपाध्यक्ष श्री शिवाजी आव्हाड सर यांचं विशेष कौतुक...
• मुंबई जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे व टीम यांच्या विशेष सहकार्या बद्दल त्यांचेही कौतूक....

सहकाऱ्यांनो ,
आपल्या सर्वांची पेन्शन बाबतची छोट्यातील छोटी मेहनत नक्कीच पेन्शन मिळवून देईल...
कामे सुरूच आहेत आणि सुरुच राहतील...

बस!  "आपला विश्वास व प्रेम असच सोबत ठेवा..."

कायम आपलाच
प्राजक्त झावरे-पाटील
8898880222/9833781817
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन..

No comments:

Post a Comment