!!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!!
एकटाच आलो नाही राजची साथ आहे; सावध असा तुफानाची हीच सुरूवात आहे.....!
"तुम्ही माझ्याकडे आला आहात, आता ते (सरकार) तुमच्याकडे पेन्शन घेऊन येतील.."
राजसाहेब ठाकरे
पक्षप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सहकाऱ्यांनो नमस्कार🙏🏻
कालचा दिवस आपल्या संघटनकरीता नवीन उभारी, नवीन दिशा , प्रचंड ताकद आणि निर्णायक वळण देणारा असाच ठरला...!
पक्षाच्या जाहीरनाम्यात "जुनी पेन्शन योजना लागू करणे" हा ठळक मुद्दा स्वीकारण्याकरिता काल आम्ही विविध पक्ष कार्यालये यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन देत होतो...
आणि असेच निवेदन घेऊन आम्ही दुपारी "कृष्णकुंज" वर धडकलो...
स्थळ:- कृष्णकुंज - महाराष्टातील सर्वात लोकप्रिय ठिकाण, तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा भरणारे ठिकाण आणि हो महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक TRP असणार ठिकाण...
वेळ :- दुपारची १२ ची..
कृष्णकुंज बाहेर खचा-खच भरलेली गर्दी.. काही पक्ष-प्रवेश आणि प्रश्न घेऊन भेटायला आलेल्यांची रांग.. या शे-पाचशेंच्या गर्दीत आत जाता येईल का नाही आणि आत गेल्यावर बोलायला तरी वेळ भेटेल का नाही? ही शंका... परंतु आपली जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सर्वकाही शक्यच आहे..
लागलीच एक टीम कागदपत्र व फोटोंची प्रिंट घ्यायला तर दुसरी टीम गेटवरील PA ना भेटायला गेली..
"आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून अगदी नागपूर वरून भेटण्यासाठी आलो आहोत.." PA सोबत आम्ही बोललो..
त्याने निवेदनाची प्रत घेतली आणि तुमची २ मिनिटांसाठी भेट करून देतो असंच तो बोलत आत निघून गेला..पक्षप्रवेशाचे घोळके -घोळके आत सरकत होते.. फक्त तिथे नुसते उभे राहण्यापेक्षा आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया( साम TV, zee 24 तास , दै. सकाळ, दै.पुढारी , दै. लोकसत्ता, दै. महाराष्ट्र टाईम्स) यांचे प्रतिनिधी उभे होते त्यांच्या घोळक्यात घुसलो नि आपला मुद्दा आणि आपल्या भेटीचे कारण त्यांना सांगत लढ्याची माहिती देऊ लागलो.. आपल्याकडील निवेदनाच्या प्रती त्यांच्याकडे देऊन आमचा प्रश्न उचलून धरणे का गरजेचे आहे?
हे सांगू लागलो..
"साहेब, जाणार आहेत जे उरलेत त्यांनी आतमध्ये या.." २५-३० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर या शेवटच्या आवाजाने आमची चलबिचल अजून वाढवली..
आम्ही आतमध्ये घुसलो.. आतमध्ये देखील गर्दी होतीच.. एक एक करत टीम आपला प्रश्न घेऊन भेटत होती.. एका मिनिटात प्रश्न ऐकून त्यावरील मनसे उत्तर मिळवून बाहेर पडत होती..
आता आपला नं आला बहुदा शेवटचाच..
"आम्ही जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शिलेदार आहोत....आणि हा प्रश्न पोलीस, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, महसूल, राज्य कर्मचारी, मनपा/नपा कर्मचारी इ. सर्वच कर्मचारी संबंधित आहे, असे म्हणत आपला प्रश्न व संघटन यावर बोलायला आम्ही सुरवात केली..
पुढच्या एकाच मिनिटात सर्वांचा ताबाच आम्ही घेतला.. राजसाहेब, माजी आमदार नितीन सरदेसाई आणि सगळेच ऐकत होते.. एका मागून एक आमच्या तोफा धडाडत होत्या.. आंदोलने, धरणे, संघटनेचे मांडणी, प्रश्नाची तीव्रता, राज्य सरकारची आश्वासने , मृत कुटुंबांची वातहात अगदी सगळच..
आता ५-७ मिनिटे झाली तरी आम्ही बोलतच होतो.. आणि राजसाहेब ऐकत होते..
राजसाहेब:- "हा तर अन्याय आहे.."
टीम:- "आम्ही गेल्या ३ वर्षांपासून पूर्ण ताकदीने भांडतोय (आम्ही मोर्च्यांचे फोटो दाखवत बोलत होतो..) पण म्हणावी तशी दखल सरकार घेत नाही.
राजसाहेब :-"तुम्ही आता माझ्याकडे आला आहात, आता ते तुमच्याकडे पेन्शन घेऊन येतील.."
त्यांच्या ठाकरी शैलीतील या कणखर आवाजाने आमच्या अंगावर काटाच उभा राहिला..
राजसाहेब :- "तुम्ही स्वतः मुंडण केलेत , आता आपण यांचं(सरकारच) मुंडण करू.. हीच माझी शैली.."
साहेबांचं करारी स्मित आमचं बळ वाढवत होत..
टीम:- "साहेब, तुम्ही संबंध महाराष्ट्रातील , देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहात, आम्हा तरुणांचे तर हृदयसम्राटच आहात... तुमची आणि आमची style एकच आहे.."
*राजसाहेब:-* "म्हणजे तुम्ही खळ-खट्याक पण करता काय.."
*टीम:-* "नाही ..नाही साहेब "
*राजसाहेब :-*"मग.. कशी आपली style एक. "
*टीम:-* "साहेब, आम्ही तेही करूच पण आमच्या पाठीवर सोडवणारा खंबीर हात नाही.. तो आपण ठेवलात तर हवे ते करू.."
*या उत्तरावर साहेब खळखळून हसले.. "आजपासून राज ठाकरे तुमच्या सोबत, बघू कोण हात लावते ते.."*
मृत कर्मचारी कुटुंबाची वाताहत (शिक्षक, महसूल इ. उदाहरणे दिली) , त्यांवर आता आलेली वेळ सगळं सांगून आमच्या भविष्याचे आपण मालक व्हा अशीच साद आम्ही घातली..
*टीम :-* _आम्ही जवळपास ४ लाख कर्मचारी आहोत आणि केंद्रीय कर्मचाऱ्यासहित अजून भरपूर असतील , आपण हा प्रश्न घेतलात तर हे सगळे आपल्या सोबत असतील.._
*राजसाहेब :-* " ते मला महत्वाचं नाही, ते नंतर पाहू.. तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.. आता तुमचा प्रश्न राज ठाकरे चा झाला.."
*टीम :-* "साहेब, आम्ही लाखोंच्या संख्येत पावसाळी अधिवेशनावर *शिवजन्मभूमी ते चैत्यभूमी असा लॉंगमार्च व त्याच वेळी आमरण उपोषण करून विधानभवन घेरण्याच्या विचारात आहोत.."*
*राजसाहेब:-* "मुंबईत मी स्वतः याच स्वागत करील नि तुमच्या सोबत असेल , नक्की करा..!"
आम्हाला मिळालेली २ मिनिटे १५ मिनीटापर्यंत वाढत तर गेलीच पण *पाठीवर हात मारून शाबासकी सुद्धा मिळाली..*
*राजसाहेब :-* " तुम्ही राजगड कार्यालयावर(मनसे चे मध्यवर्ती कार्यालय) जाऊन प्रमोद पाटील यांच्याशी चर्चा करून प्रेझेन्टेशन बनवा , तुमचा प्रश्न हा माझा झाला..
_ज्या व्यक्तीच्या पुढे बोलायची हिम्मत ना कोणता मंत्री करेल, ना कोणता नेता अश्या अफाट व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तींन, एका सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या व महाराष्ट्रातील एकमेव शैलीदार नेत्याने त्यांच्या ठाकरी शैलीत केलेली फटकेबाजी आपल्याला अगणित ऊर्जा देऊन गेली..आणि मिळालेलं बळ व ताकद तर वेगळीच..._
*सहकाऱ्यांनो,*
हीच वेळ नक्की निर्णायक असेल .. आता आपला प्रश्न अतिशय कणखर नि *सर्वाधिक मोठ्या राजकीय व्यासपीठावर येऊन पोहचला आहे की ज्याची व्यापकता अथांगच आणि निर्णायक आहे..*
*विशेष टीप:-*
उद्या शिवाजी पार्कात होणाऱ्या नवीन वर्षाच्या सभेत आपला मुद्दा येण्याची दाट शक्यता आहेच त्याबाबत आपल्याला कळवले देखील जाईलच..
नाहीतर पुढील १५ दिवसात येणाऱ्या राज साहेबांच्या मुख्यमंत्री सोबतच्या बैठकीत हा मुद्दा घेतलाच जाईल..
(आम्ही राजगड या मध्यवर्ती कार्यालयात श्री. पाटील यांच्या सोबत तब्बल २ तास चर्चा करून त्यांना मुद्दे देऊन एक प्रेझेन्टेशन देखील बनवून दिले आहे..)
*एकंदरीत कालचा दिवस सर्वोत्तम असाच गेला..*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
काल या राज साहेबांच्या भेटीसाठी
*•गोविंद उगले, राज्यसचिव*
*•मी (प्राजक्त झावरे-पाटील)*
*•आशुतोष चौधरी ,विभागीय अध्यक्ष नागपूर*
*•बाजीराव मोढवे, विश्वस्त*
*•संतोष देशपांडे, प्रसिद्धीप्रमुख* इ. उपस्थित होतो...
तसेच
*अतिशय अडचणीचं काम निघाल्याने राज्याध्यक्ष केलेले Reservation रद्द करून परत फिरले* परंतु त्यांच्या नियोजनात व *गोविंदराव, प्रवीण , आशुतोष, बाजीराव* यांच्या नेतृत्वात, *कोकण विभागप्रमुख अमोल माने* यांच्या सहकार्याने तसेच *मुंबई टीम -ठाणे टीम* यांच्या मदतीने सदरचा दौरा यशस्वी संपन्न झाला...
*मित्र-मैत्रीणीनो,*
_आपल्याकडे ताकद होती, ऊर्जा होती, दिशा होती आता प्रचंड मोठं व्यासपीठ आणि अतिशय खंबीर हात पाठीवर आहेत.._
*तेंव्हा थांबणं नाहीच...आणि तो आपला पिंडही नाहीच...*
*चला... पेन्शन मिळवूनच दाखवू...!*
*कायम आपलाच*
प्राजक्त झावरे-पाटील
8898880222/9833781817
No comments:
Post a Comment