DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Thursday, June 14, 2018

💐 *ग्रेट भेट.  !!!*
*"न्यायाधीशाना न्यायालयीन बाजूने जुनी पेंशन मिळवून देणारे प्रख्यात वकील adv. संदीप जालन साहेब यांच्या सोबत..!!*

   आज मुंबई हायकोर्टात मागील महिन्यात न्यायाधीश महोदयांना जुनी पेंशन मिळवून देणारे advocate श्री. जालन संदीप साहेबांसोबत...  *"इतर सर्व विभागातील राज्य सरकारी कर्मचारी वर्गासही जुनी पेंशन कशी मिळवून देता येईल?"*  ....याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली... चर्चा करताना साहेबांनी सुरूवातीसच *"मी service मैटर जास्त घेत नाही"",  अस सांगितल्याने आमची  थोड़ीफार निराशा झाली , मात्र आपली 3692/2017 ही केस कोर्टात चालू आहे,  व या केसविषयी मी सविस्तर माहिती सांगितल्या नंतर, आपोआपच साहेब कोर्ट matar विषयी बोलू लागले... सुरूवातीस त्यानी त्यांच्या केसविषयी सविस्तर माहिती सांगितली, यानंतर न्यायालयीन कर्मचारी केस व आपल्या केस मधील फरक,आपल्या केसमधील अडचणी सांगितल्या ,काही महत्वपूर्ण ठराविक मुद्देही आपल्या केससाठी सांगितले.... खुप चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आपली 3692/2018ची केस पिटीशन copy, व केसमधील ऑर्डर स्वतःच्या अभ्यासासाठी स्वतःकड़े घेतल्या.... व  ""आपल्या केसचा सर्व अभ्यास करुन चार-पाच दिवसात पुढे काय करायचे ते सांगतो"" असे सांगितले!!...एवढेच नाही तर """मी माझ्या परिने आपल्याला जमेल ती मदत करतो""* असे साहेबांनी आपल्याला आश्वासनही दिले आहे!


  यानंतर *"23/10 विरोधी"* याचिका दाखल करण्यासाठी adv नरेंद्र बांदिवडेकर साहेब ,adv कातनेश्वरकर साहेब, adv अम्बेतकर साहेब,यांच्याशी चर्चा करुन केस दाखल करण्याविषयी व आपल्या बाजूने येणाऱ्या मुद्द्यानवर चर्चा करण्यात आली...मित्रहो पुढील काही दिवसातच 23/10 विरोधी केस दाखल होईल🙏🏻🙏🏻

 आज या मुंबई हायकोर्टातील महत्वपूर्ण चर्चेला आमचे पालघरमधील मित्र बाळासाहेब जगताप,प्राध्यापक नितिन भोईर सर व (मी) राजेंद्र फुलावरे उपस्थित होतो.

    आपल्या माहीतीस्तव सादर!!
  🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

       आपलाच
 *राजेंद्र फुलावरे*
*रायगड जिल्हाध्यक्ष*
*म रा जु पे हक्क संघटन*

No comments:

Post a Comment