DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Sunday, June 24, 2018

🥦🥦🥦 *आवाहन* 🥦🥦🥦

*सन्माननीय सर्व वनरक्षक,वनपाल,वनमजुर आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांना सस्नेह नमष्कार*
💐💐💐🙏🏻💐💐💐

दि.24जुन2018 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जिल्हा परिषद,शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीची बैठक नाशिक येथे झाली सदर सभेत 7 वा वेतन व जुनी पेंशन लागु करणे व इतर अनेक मागण्यांबाबत कर्मचार्यांमधील असंतोष व्यक्त करण्याकरिता *दि. 7,8,9ऑगष्ट 2018 रोजी तीन दिवसीय लाक्षणिक संप* करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आणि शासन धार्जिण्या संघटना,राजपत्रित महासंघ यांच्या भुलथापाना बळी न पडता शासनाने ठोस निर्णय दिल्याशिवाय हा संप मागे घेण्यात येणार नाही,असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सदर सभेत माझ्यासह श्री.प्रवीण डोंगरखेडकर, वनपाल औरंगाबाद,व इतर वर्ग- 3आणि 4 मधील वनविभागातील कर्मचारी उपस्थित होते हे विशेष!
सभेत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाबाबत चर्चा झाली आणि आपणही राज्य सरकारी कर्मचारी आहोत आणि संपामधील सर्व मागण्या या आपल्याशीही निगडित आहे D.a वाढ, थकबाकी, पेंशन , 
निवृत्तीवेतन या आपल्याही आवश्यकता आहे मग आपण व आपल्या संवर्ग निहाय संघटनेच्या नेत्यांनी हि आपली संघटना नाही म्हणुन आपल्याच कर्मचार्यांना मातृ संघटनेपासून दुर ठेऊन आपलेच इप्सित साध्य करण्याकरिता आपला उपयोग करून घेतला जात आहेआणि राज्य कर्मचारी चळवळ कमजोर केल्या जात आहे. आता वेळ आली आहे की कर्मचारी चळवळीला मजबुत करण्याची,✊चळवळीला नव्याने बांधण्याची मग आपण का म्हणून मागे राहायचे.
नक्षल भत्ता,D. Aमध्ये झालेल्या वाढी,विमा योजना,ईतर बरेचसा फायदा आपण मागील वर्षात घेतला व आर्थिकदृष्ट्या सुखीही झालो मग ज्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला लाभ मिळाले तर त्या लाभातून सन2017-18 ची केवळ रु200/-तेही वार्षिक सभासद फी भरून संघटनेचे ऋण फेडणे हे कर्मचारी म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे.त्याचप्रमाणे होत असलेल्या संपात आपल्या खातेनिहाय संघटनेच्या माध्यमातुन सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपापल्या राज्य अध्यक्षांना संलग्नता फी भरून मध्यवर्ती संघटनेशी एकरूप होण्यास बाध्य करणे,आणि त्यांना समन्वय समितीच्या बैठकीत उपस्थित राहून आपले सकारात्मक योगदान द्यावे आणि मध्यवर्ती संघटनेत राज्य कार्यकारिणीत सामील होऊन आपापल्या विभागातील Dcps/NPS धारक,कंत्राटी कर्मचारी यांनाही मुळ प्रवाहात आणण्यास आणि तीन दिवसीय संपात सर्व राज्य सरकारी,जिल्हा परिषद,शासकीय,निमशाषकीय,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्यांसोबत भाग घेऊन यशस्वी करण्याचे आवाहन  करण्यात येत आहे.

🙏🏻✊✊✊✊✊🙏🏻

✊ *कर्मचारी ऐकता जिंदाबाद* ✊

🥦 *संप दि.7,8,9आगष्ट2018* 🥦

✊ *हमारी युनियन,हमारी ताकद* ✊

⛳ *इंकलाब जिंदाबाद,जिंदाबाद* ⛳

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    ✊राजेश पिंपळकर✊
               वनरक्षक
                 चंद्रपुर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment