DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Saturday, October 6, 2018

*नमस्कार मित्रांनो*
👏👏👏👏👏👏👏👏👏👏

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,*
 *जिल्हा शाखा चंद्रपूर*

✍✍✍✍
*आभार व अभिनंदन*

               मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून आपल्या संघटनेचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन पार पडले. सुरुवातीपासूनच अडचणी चा सामना करत करत या आंदोलनास काल पूर्णविराम मिळाला.

          या आंदोलनासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक,  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक,  खाजगी प्राथमिक शिक्षक,  आश्रम शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी,  ग्रामसेवक, महसूल विभाग ,पाटबंधारे व जलसंपदा विभाग कृषी विभाग व इतर सर्वच विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने बांधव  *चंद्रपूर जिल्ह्यातून* सहभागी झाले. या बद्दल सर्वांचे संघटनेच्या वतीने *विशेष आभार आणि कौतुक......👌✊*

✍✍✍✍
         आंदोलनात सक्रिय पाठिंबा देण्यासाठी इतर *शिक्षक व अन्य विभागाच्या संघटना पदाधिकारी व बांधव* ही उपस्थित होते,त्यांचेही लाख लाख आभार. 🙏

✍✍✍✍✍
*विशेष कौतुक:-*
           महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमधून महिला भगिनींचा मोठा सहभाग दिसून आला. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढ्याच्या शिरोभागी राहणाऱ्या *महिला भगिनींना मानाचा मुजरा.....👏🚩*
✍✍✍✍
आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर *पेन्शन दिंडी क्रांती सप्ताह,  पेन्शन दिंडी केंद्रस्तरीय संपर्क अभियान- प्रचार निधी संकलन आणि प्रत्यक्ष आंदोलनातील सहभागी बांधवांचे नियोजन* करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे *तालुकाध्यक्ष सरचिटणीस त्या तालुक्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सर्वच टीम* तुमच्या योगदानातूनच हे आंदोलन पार पडू शकले. कौतुकास शब्द अपुरे ...🙏

✍✍✍✍
*फलित....?*

*शासनाच्या मुस्कटदाबी धोरणानंतर ही आंदोलन करून दाखवले, हा आत्मविश्वास..... हे कर्तुत्व पुढच्या कैक लढाईसाठी प्रेरणा स्त्रोत ठरेल.* 16 ऒक्टोंबर रोजी निश्चित केलेली मीटिंग की जुन्या पेन्शन योजनेकडे घेऊन जाणारी महत्वपूर्ण गुरुकिल्ली आहे. या संधीचे सोने महाराष्ट्रातील तमाम डीसीपीएस धारकांच्या त्यागातून आणि कष्टातून निश्चित होईल. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मयत कर्मचाऱ्यांसाठी दहा लाखाचा सानुग्रह निधी देण्याचा घेतलेला निर्णय मधील *जाचक अटी 100% काढण्यात येतील.*

✊✊🚩🚩✊✊

*सांस हे जब तक,*
*न रुकेंगे कदम ,*
*चल पडे है तो ,*
*मंजिल को पा ही लेंगे हम ||*

🙏🙏🙏🙏🙏
अध्यक्ष , सचिव , कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष
जिल्हा कार्यकारिणी सदस्य 
*चंद्रपूर जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटन*

✊✊🚩🚩✊✊

No comments:

Post a Comment