DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, October 22, 2018

प्रति,
*मा. तालुका अध्यक्ष/सचिव*
 व सर्व पदाधिकारी
 महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर व नागपूर विभागातील सर्व तालुके
                यांस

*विषय :- ३१ अॉक्टोबर, २०१८ हा दिवस दे धडक..बेधडक मोर्चा चंद्रपुरात काढत असल्याबाबत*

*महोदय,*
आपल्या सर्वांनाच माहित आहे की *३१ अॉक्टोबर, २००५ रोजी* केवळ *मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचा-यांना नवीन अंशदायी पेंशन योजना सुरु* केली.
ही योजना सुरू करुन महाराष्ट्र शासनाने *संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान* केला आहे. तसेच, नवीन योजना लादून आणि *जुनी पेंशन योजना बंद करुन १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचा-यांवर व त्यांच्या कुटुंबावर घाला* घातला आहे.

सध्याचे सरकारही *शेअर बाजारावर आधारित अन्यायी नवीन पेंशन योजना* पुढे रेटत आहे.

तरी, *नवीन पेंशन योजनेचा आणि ती लादणा-या महाराष्ट्र सरकारचा निषेध* करत *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने ३१ अॉक्टोबर, २०१८ ह्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दे धडक...बेधडक मोर्चा काढण्यात येत आहे तरी नागपूर विभाग मधील वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जनजागृती करून चंद्रपुरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  ही नम्र विनंती.*


आपल्यातले आम्ही
अध्यक्ष/सचिव
दुशांत निमकर/निलेश कुमरे
चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

No comments:

Post a Comment