DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Saturday, October 27, 2018

*चलो चंद्रपुर*

*ध्येयवेड्या तरुणाईचे संघटन म्हणजेच महाराजुपेहसं हे होय.कारण गेल्या तीन वर्षापासुन आपण सर्व जुनी पेंशन मागणीसाठी न थकता,न थांबता उस्फुर्तपणे एका पाठोपाठ आंदोलने करीत आहोत.आपले होणारे प्रत्येक आंदोलन हे भव्यदिव्य असतात.आपली आंदोलने बघुन सर्वांच्या पोटात पोटशुळ येतात.मित्रांनो नुकतेच आपले मुंबई येथील आंदोलन आपण यशस्वीपणे पार पाडले.आणि त्यातुन थोडी उसंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या पुढ्यात अजुन एक आंदोलन वाट पाहत आहे.येत्या 31 आँक्टोबर रोजी चंद्रपुर येथे जबाब दो हे आंदोलन आपण करीत आहोत.हे आंदोलन चंद्रपुर विभागापुरता मर्यादित असले तरी संपुर्ण महाराष्ट्रभरातुन आपले जुनी पेंशन लढवय्ये मावळे चंद्रपुर येथे येणार म्हणजे येणारच.कारण आपण सर्व प्रचंड ध्येयवेडाने झपाटलेले ध्येयवेडी आहोत.आपल्या ध्येयवेडामुळे आपण ठार वेडी झालेल्या माणसांप्रमाणे झालेलो आहोत.ठार वेडी झालेली माणसेच इतिहास घडवितात. म्हणुन मित्रांनो आपल्याला इतिहास घडविण्यासाठी चंद्रपुर येथे जावेच लागणार आहे.कारण चंद्रपुर म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कुबेर असलेल्या वित्तमंत्री यांचे गाव आहे.हे महाशय म्हणजे अजब रसायन आहे.सत्तेत नसतांना हे महाशय अगदी बेंबीच्या देठापासुन ओरडुन ओरडुन जुनी पेंशन लागु करा म्हणुन सर्व ढिंढोरा पिटत होते.आमना खानदेशमा एक म्हण ह्या भाऊले लागु पडत.तवयं हाऊ भाऊ फुटेल डबडासारखा वाजी राहीनंता.आणि आत्ता सत्तेच्या धुंदीत मतवाल वारुप्रमाणे चौफेर उधळत जाऊ पेंशनला विरोध करीत आहे.आपण सर्वांनी याचा जाब विचारण्याची वेळ आता आली.जवाब दो ह्या आंदोलनामुळी ही सुवर्णसंधी आपल्या मिळणार आहे.मग ती सुवर्णसंधी आपण काय वाया घालवावी*

*चंद्रपुर येथील जवाब दो आंदोलन यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा.सर्व परवानग्या मिळालेल्या आहे.तरी आपण जास्तीतजास्त संख्येने चंद्रपुर येथे येऊन चंद्रपुर टीमचा उत्साह वाढवावा ही नम्रविनंती.आंदोलन यशस्वी होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या श्री.सुनिल दुधे (राज्य सल्लागार ) श्री.दुशांत निमकर(जिल्हाध्यक्ष)श्री.योगराज भिवंगडे (जिल्हा उपाध्यक्ष) श्री.निलेश कुमरे(जिल्हा सचिव) श्री.प्रशांत खुसपुरे(जिल्हा कार्याध्यक्ष)श्री.भालचंद्र धांडे,श्री.प्रविण दब्बा,श्री.अविनाश चवले,श्री.गणेश चिडे,श्री.अनिल डहाके,श्री.श्रीकांत पोडे,श्री.प्रमोद उरकुडे,श्री.विजय वैद्य व सर्व ज्ञात-अज्ञात पेंशन लढवय्ये मावळ्यांचे मनापासुन अभिनंदन*

*आम्ही येतोय,तुमची मेहनत वाया जाऊ देणार नाही*

*चलो चंद्रपुर,चलो चंद्रपुर*

*आपलाच-श्री.संजय सोनार कळवाडीकर*

No comments:

Post a Comment