# *पेन्शनवार्ता*
*दिल्ली म्हणते, 'पेन्शन लो'...*
*अनं महाराष्ट्र म्हणते, 'वित्तमंत्री जवाब दो'..*
😇 *उद्धवा अजब तुझे सरकार...* 😇
✍ रोखठोक:- *सुनिल दुधे*
हल्ली दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची फॅशनच आलीय. ज्या महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी व आंबेडकर सारखे थोर पुरुष जन्माला आले. त्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी शिवाजी जन्मावा पण तो दुसऱ्याच्या घरात. ही बनत चाललेली प्रवृत्ती पुरोगामीत्वाच्या झेंड्याला मातीकडे झुकविते.
जुनी पेन्शन हा विषय सध्या कर्मचाऱ्यामधिल अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतांना ज्यावेळी जुनी पेन्शन हा विषय महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडे जातो तेव्हा ते मोठया कुतूहलाने हा प्रश्न विचारतात की, कोणकोणत्या राज्यांनी जुनी पेन्शन लावली? अश्या वेळी महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर आणण्याच्या बाता करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे पाहून आम्हचा तरुण महाराष्ट्राचा तरुण कर्मचारी आता कोणत्या राज्याचा नंबर डायल करावा या बुचकळ्यात पडतो. अनं सहज या ओळी गुनगुणनतो..
*शोधीशी मानवा राहुळी, मंदिरी..*
*नांदतो देव हा आपल्या अंतरी...*
कल्याणकारी राज्य स्वतःमध्ये शोधण्याची सद्बुद्धी शासनाला येईल तेव्हा येईलच. मात्र सध्या दिल्ली मधिल *आप* लं सरकार महाराष्ट्रातील *आप* ल्या कर्मचाऱ्यांना *आप* लंसं वाटू लागलंय. काल परवा दिल्ली मध्ये जुन्या पेंशनचं भूत मानगुटीवर घेऊन नाचणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यानी दिल्लीचे *प्रत्यक्ष तरुण* नेतृत्व असलेले अरविंद केजरीवाल यांना भेटले. केजरीवाल यांनी मुक्तद्वारात बिनधास्त चर्चा करून जुनी पेन्शनच्या तरुणांना म्हणाले *"सिर्फ15000 कर्मचारी के साथ आंदोलन करके दिखाओ और पुराणी पेंशन पेन्शन लेलो."* तेही जाहीरपणे. नाहीतर आम्हचे महाराष्ट्रातील महामहिम मुख्यमंत्री खडकाच्या आरपार दिसावं इतकं पारदर्शक व्यक्तिमत्व बंदद्वार चर्चा करून मान डोलविण्याच्या वर धाडस करतांना दिसत नाही. त्यांना वाटायचं उगाच आपण म्हणायचं '50 हजार कर्मचारी आणा जुनी पेन्शन घेऊन जा' आणि संघटना एक लाख घेऊन यायची.. त्यामुळे कदाचित त्यांचे धाडस होत नसावे. अरविंद व देवेंद्र दोन्ही देवाची नाव असली तरी त्यात दैवी गुन असावेच असे नाही. मुख्यमंत्री यांना दिल्ली तशीही नवीन बिल्ली वाटत असावी कारण केंद्रातला वाघोबा त्यांचा आहे मात्र ही बिल्ली संपूर्ण देश्यासाठी जुनी पेन्शनची किल्ली झाली तर वाघोबाला सर्कशीत काम करावे लागेल.
बरं दिल्लीत झाल तस महाराष्ट्रात का व्हावं.. इथं आम्हची जुनी उधारी संपत नाही तर नवीन पैका कुठून फेकून मारणार.. विषय असा की, सत्तेत येण्यापूर्वी याच सत्ताधारी पक्षानी खूप मोठ - मोठया बाता केल्या. *सध्या वित्तमंत्री असलेल्या महोदयांनी 2012, 2013, 2014 मध्ये सलग तीन वर्षे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना (पृथ्वीराज चव्हाण) यांना पत्रे लिहून नवीन पेन्शन योजना अन्यायी असून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लावावी अशी कागदी मागणी केली होती.* पण आता सत्तेत आल्यावर वित्तमंत्री महोदय आपल्याच पक्षातील आमदार नागो गाणार यांना पत्र लिहून म्हणतात की, महाराष्ट्र भिकेला लागलाय त्यामुळे जुनी पेन्शन लागू करणे शक्य नाही. म्हणजे सामान्यांनी काय विचार करावा. की वित्तमंत्री सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्रात पैश्याची खणखणाट होती आणि सत्तेत आल्यापासून महाराष्ट्र भिकेला लागले असेल( पुरवणी मागण्या मागून - मागून) त्यामुळे ते जुनी पेंशन देने शक्य नाही म्हणत असतील. नाहीतर सत्तेत येण्यासाठी खोट्या आश्वासन देने हे मताचं राजकारण असेल. काय खरं ते देव जाणो.. यांची ही प्रवृत्ती म्हणजे *आज नगद - कल उधार* वाली दिसते. मात्र जुन्या पेन्शनच्या तरुणांनी उधारी वसूल करण्याचा बिडा उचललेला दिसतोय म्हणून 31 आक्टोबर ला ते वित्तमंत्र्याच्या गावात जवाब दो म्हणत सारी जुनी उधारी वासून करणार आहेत.
महाराष्ट्रातील तरुण कर्मचाऱ्यांचे दुर्देव्य हे की, जवाब दो, जवाब दो... म्हणून ओरडूनही वित्तमंत्री डोळे उघडायला तयार नाही. तसेही मराठा व शेतकऱ्यांच्या आणि इतर सततच्या मोर्चाने सत्ताधाऱ्यांच्या कानांचे पडदे केव्हांचेच फाटलेत त्यामुळे कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकू जाणार कशी ?
मात्र या जवाब दो चं रूपांतर सत्ताधारी को फेक दो मध्ये झालं की, *ये क्या हुवा.. कैसे हुवा .. कब हुवा कोई भी ना जाणे..* म्हणायची वेळ येईल नक्की. सत्ताधाऱ्यांकडे Evm नावाचा अल्लादिनचा चिराग असल्यावर या मराठा, शेतकरी,आदिवासी आंदोलनाला गिळंकृत करणारे, त्याचे कर्मचारी काय वाकडं करणार या सत्ता उन्मादात असणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की EVM आपरेट करणारे निवडणुकीतील कर्मचारीच असतात आणि शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांना गावात चांगलं राजकारण करता येते.... बाकी तरुण रक्त इतकं सळसळत आहे की त्याच्या त्सुनामीत ते कोणाला नेऊन कुठे फेकतील याचा काही भरवसा नाही.
आता दिल्लीच्या या बादशाही घोषणेने किमान देव *इंद्र* चिर निद्रेतून जागा होवो आणि जुन्या पेन्शनच्या तरुणांना (सु) *धिर* देण्याचे ब्रम्हज्ञान त्यांना प्राप्त होवो हीच नरेंद्र चरणी प्रार्थना.
*क्रमशः*
✍ *सुनिल दुधे*
राज्यसल्लागार
महराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन
No comments:
Post a Comment