DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, February 11, 2019

📢

*२० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैलीत संदर्भात*..

*पहिला टप्पा*
मित्रहो २० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैली ची सुरुवात  १७ फेब्रुवारी पासुचन होईल किल्ले रायगड पासुन पेंशन चे राष्ट्रीय आयकाॅन प्रदिप सोनटक्के हे किल्ले रायगड ते चिरनेर असा प्रवास धावत सुरु करतील व १९ फेब्रुवारी ला त्यांचे  स्वागत आमदार महोदय सर्व राज्य कार्यकारिणी यांच्या उपस्थित केले जाईल.

*दुसरा टप्पा*
२० फेब्रुवारी ला आपण खुप मोठ्या संख्येने एकत्रीत होऊन जिजामाता उद्यान (भायखळा पुर्व) ते आजाद मैदान अशी पेंशन एल्गार रॅली निघेल.

*तिसरा टप्पा*
आजाद मैदान ला पोहचल्यावर आपल्या मागण्यांसाठी सरकार किती सकारात्मक आहे हे लक्षात घेऊन तिथेच आमरण उपोषण (२० तारखे) पासुनच आमरण उपोषण सुरू केले जाईल.

अशा तीन टप्प्यात आंदोलन होणार असुन आपल्या ला वाटत असेल की मागील वेळेस ही राज्य कार्यकारिणी कडुन असेच आव्हान करण्यात आले होते परंतु तस काही झाल नव्हत पण यावेळेस आपण पुर्ण तयारी करुनच रस्त्यावर उतरत आहोत म्हणुन किंतू परंतु मनात न आणता मोठया संख्येने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटने ने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आपल आंदोलन आपण निकराने लढु.

टिप :- १)पिण्याचे पाणी व टाॅईलेट यापेक्षा जास्त व्यवस्था आपल्या कडुन केली जाऊ शकणार नाही.
२)आंदोलन ला येताना ३-४ दिवस रितसर सुट्टी घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे.
३)कृपया आंदोलना ला येताना केवळ आंदोलना तच यावे मुंबई दर्शन साठी येऊ नये.

राज्याध्यक्ष /राज्य सचिव
विश्वस्त तथा राज्य कार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.

No comments:

Post a Comment