*मंत्रालयीन पाठपुरावा व एल्गार मार्च बाबत...!*
_______________________________
*!...महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन...!*
सहकाऱ्यांनो नमस्कार...🙏🏻
आपला पेन्शन एल्गार मार्च आता तोंडावर आला आहे.. आपण सर्वच जण अगदी मोठ्या रेकॉर्डब्रेक संख्येने मुंबईत दाखल होणार आहात.. या वेळी पेन्शन मार्च होणार म्हणजे होणारच..!
चला तर लागा मग तयारीला..!
आपणही येऊ नि सोबत ५ जण घेऊन येऊ..!
२० फेब्रुवारी ला मुंबईत फक्त आपलाच आवाज हवा..! फक्त आपलाच आवाज..!
_______________________________
*अ) मंत्रालयीन भेटी :-*
*१. मुख्यमंत्री यांना पत्र :-*
आपण २० फेब्रुवारी पासून करत असलेल्या एल्गार मार्च व आमरण उपोषणाबाबत निवेदन दिले..
*२. Dcps/NPS अभ्यासगटाच्या बैठकांबाबत महत्त्वाचे सदस्य राज्यमंत्री मदन येरावर यांची भेट*
• शासनाने १९ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णयाद्वारे DCPS/NPS त्रुटी काढण्यासंबंधी तीन महिन्यांकरिता एक समिती स्थापन केली होती. त्यातील सदस्य राज्यमंत्री मदन येरावर साहेब यांची भेट घेतली.. व प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांच्याकडे एक draft देखील सुपूर्द केला आहे.
• अजून एकही बैठक या समितीची झाली नसल्याचे त्यांनी सांगितले असून होणाऱ्या बैठकीत आपला एक/दोन प्रतिनिधी यांना बोलावू हे त्यांनी सांगितले.
_अधिवेशन काळात ही बैठक होणार आहे.._
या पूर्ण बैठकीसाठी *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांचे तत्पर प्रयत्न कामी आले.!
धन्यवाद..!
*३. २३/१० बाबत भेट :-*
• 'आपल्या सर्वांच्या जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे २३/१० चा वेतनश्रेणीचा शासन निर्णय' या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पुन्हा भेट घेतली. (जवळपास १७-१८ वी भेट)
• लवकरच म्हणजे येत्या आठवड्याभरात १००% त्याबाबत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या भेटीसाठी देखील *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांनी सहकार्य केले. ते देखील सोबत उपस्थित होते.
______________________________
*विशेष उल्लेख*
*आमदार केळकर साहेब* यांच्या भेटीसंदर्भात जालना *जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर* यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच *राज्याध्यक्ष वितेश खांडेकर* व *राज्य महासचिव गोविंद उगले* यांनी समन्वय साधत प्रयत्न केले. यावेळी *कोकणविभाग प्रमुख अमोल माने* आणि *मी (प्राजक्त)* सोबत होतो.
______________________________
*ब) पेन्शन एल्गार मार्च बाबत*
*१. आभार/अभिनंदन:-*
आपल्या पेन्शन एल्गार मार्च ला परवानगी मिळावी म्हणून ज्या आमदार महोदयांनी आपली शिफारस पत्रे दिलीत, त्या सर्वांचे आभार.. अशीच साथ संपूर्ण प्रक्रियेत असेल अशी खात्री आहे..
*धन्यवाद...!*
•आमदार विक्रमजी काळे
•आमदार कपिलजी पाटील
•आमदार राणा जगजितसिंह पाटील
•आमदार बाळारामजी पाटील
•आमदार दत्तात्रयजी सावंत
•आमदार किशोरजी दराडे
सहकाऱ्यांनो,
• प्रदीप सोनटक्के सर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड ते सत्याग्रह भूमी 'चिरनेर' असा 'रन फॉर पेन्शन' चा पल्ला पार करणार आहेत..
• *आपला पेन्शन मार्च जिजामाता उद्यान,भायखळा(पूर्व) ते आझाद मैदान असा होणार म्हणजे होणारच आणि नंतर आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत..*
______________________________
चला तर मग अजिबात किंतु-परंतु यांचा विचार न करता उर्जावान व्हा.. आपल्या सहकाऱ्यांना करा..!
*यावेळी तर यावंच लागतंय..!*
______________________________
*कायम आपलाच*
*प्राजक्त झावरे-पाटील*
८८९८८८०२२२ / ९८३३७८१८१७
*!.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ..!*
No comments:
Post a Comment