महाराज घात झाला , घात झाला महाराज.
आपले ४४ मावळे त्या गनिमांनी घात करून मारले महाराज. गाफील असताना अचानक हल्ला केला त्या भडव्यांनी , काय होतंय आणि काय नाही हे कळायच्या आतच फडशा पाडला त्यांनी आपल्या मावळ्यांचा. लपून छापून हल्ला केला बाजारबुणग्यांनी सवयीप्रमाणं मागूनच वार केला, समोर यायची लायकी नाय कुत्र्यांची. महाराज ह्या कुत्र्यांचं कायतरी केलं पाहिजे, कायमचा बंदोबस्त केला पाहिजे ह्यांचा. रयत घाबरलीये महाराज, सैरबैर झालीये महाराज , कस आणि काय होऊन बसलं हे. आपला एक मावळा म्हणजे एक लाखाला भारी , *ह्याच मावळ्यांच्या जीवावरच आपली रयत आणि आपला देश सुरक्षित आहे महाराज.* पण महाराज मावळ्यांनी तरी किती हल्ले झेलायचे ह्या भडव्यांचे ? ह्यांना घरात घुसून शाहिस्तेखान दाखवलाच पाहिजे महाराज आणि आता फक्त बोट नाहीतर पूर्ण शीरच धडापासून वेगळं केलं पाहिजे महाराज. थांबलं पाहिजे महाराज हे सगळं थांबलं पाहिजे. युद्धप्रसंगी ठीक आहे पण इतरवेळी सुद्धा आपल्या मावळ्यांनी जीव मुठीत धरून जगायचं..? आपल्याच मुलुखात आपल्यावरच होणारे हल्ले तरी किती दिवस पाहायचे महाराज ?
अजून एक सांगायचंय महाराज.... म्हणजे सांगायला लाज वाटतीये, हि सांगायची वेळ आमच्यावर येतीये हेच आमचं दुर्दैव. पण महाराज आपल्या काही लोकांना ह्याच काय सोयरा सुतक नाहीये महाराज. *आपले स्वार्थी नेते जे तुमचं नाव लावून मोठे झाले ते ह्या जवानांच्या मृत्यूवर आपल्या राजकारणाची पोळी भाजताते महाराज. एकमेकांवर टीकेची बोट दाखवताते महाराज.* *आणि आणि मृत सैनिकांचे रक्त थंड होयच्या आतच ह्या नेत्यांचे मूर्ख चमचे ज्यांना आपला देश तर सोडा पण आईबापा पेक्षा आपला नेता आणि पक्ष मोठा वाटतो अशी लोक आपल्या नेत्याच्या आणि पक्षाच्या प्रचाराला लागली सुद्धा. आपले मंत्री पक्षाच्या गणितात अडकलेत.* आणि मोठ्या मोठ्यांनी तर फक्त सोशल मीडिया वरूनच आपला राग व्यक्त केला. जर सैनिक देखील फक्त सोशल मीडियावर तैनात राहिले तर ? काय होईल ह्या देशाचं ? करेल का कोण विचार ? *खरंतर महाराज पहिलं ह्या दीडदमडीच्या लोकांचा कडेलोट करायला हवा. आधी घरातील शत्रू मारायला हवा.* पण महाराज हे सगळं करणार कोण ? कारण शिवाजी या नावाचा उपयोग फक्त आम्ही सत्तेसाठी करतो. पण शिवाजी महाराज आम्हाला कधी कळालेच नाहीत महाराज, तुमच्यासारखा कर्तव्यदक्ष, न्यायदक्ष, प्रजादक्ष, व आपल्या सैनिकांवर मुलाबाळांप्रमाणे प्रेम करणारा राजा आम्हाला पुन्हा मिळेल का..?
महाराज क्षमा असावी पण एक विचारतो , " राजे पुन्हाएकदा जन्म घेता का आमच्यासाठी ?'🙏🙏
संतोष वाटगुरे,
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, चंद्रपुर
No comments:
Post a Comment