DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, July 2, 2018

*!! महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन !!*

  🚩 *महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2018 संबंधी नियोजन* 🚩

प्रति,
     सर्व विश्वस्थ पदाधिकारी,
     सर्व राज्यकार्यकारिणी पदाधिकारी 
     सर्व जिल्हाध्यक्ष व
     सर्व पेंन्शन शिलेदार
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*

         आपणास सूचित करण्यात येते की महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे दि. 4 जुलै ते 20 जुलै 2018 दरम्यान आहे. सदर अधिवेशनात जुनी पेंन्शन या आपल्या  मागणी संदर्भात पाठपुरावा करणेसाठी आपण सर्वांनी नागपूर येथे दि. 12 जुलै ते 18 जुलै 2018 दरम्यान उपस्थित राहावे. ही विनंती.
       *सोबतच लाँगमार्च व आमरण उपोषणाच्या सुक्ष्म नियोजनाबाबत दि.17 जुलै 2018 ला ठीक 11.00 वाजता राज्यकार्यकारणीची बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीलाही न चुकता उपस्थित राहावे ही विनंती.*

         *नियोजन*
1) मा. मुख्यमंत्री यांना भेटून त्यांनी मुंडन आंदोलनाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची विनंती करणे व मागणी पूर्ण न केल्यास आगस्ट- सप्टेंबर महिन्यात लॉंगमार्च व आमरण उपोषण करण्यात येईल याची सूचना देणे.
2) मा. वित्त सचिव व वित्तमंत्री यांची भेट घेणे.
3) मा. शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव  यांची भेट घेऊन 23/10 gr रद्द बाबत व घंटानाद आंदोलनाबाबत चर्चा करणे.
4) विरोधी पक्षनेते मा. राधाकृष्ण विखे पाटील व मा. धनंजय मुंडे यांची भेट घेणे व चर्चा करणे.
5) विविध मंत्री व आमदार यांची भेट घेणे चर्चा व निवेदन देणे.

     *मित्रांनो, निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे या पाठपुराव्यात सरकारला निर्णायक व निर्वाणीचा इशारा देणे व मागणी पूर्ण न झाल्यास लॉंगमार्च , आमरण उपोषण व पुढे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देने गरजेचे आहे त्यासाठी आपण सर्व उपस्थित राहून सहकार्य कराल हीच विनंती.*

    (नागपूर येथे अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर विभागीय अध्यक्ष- श्री. आशुतोष चौधरी यांनच्याशी संपर्क करून माहिती द्यावी.)

No comments:

Post a Comment