DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Tuesday, July 3, 2018

*!...महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना...!*

सहकाऱ्यांनो नमस्कार...🙏🏻
      काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत *सरकारी सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या परंतु दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबांना १० लाख रु. सानुग्रह मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला..*
              _*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मुंबई धरणे आंदोलनास शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे साहेब व राज्यमंत्री दिपक केसरकर साहेब उपस्थित राहिले होते तेंव्हा त्यांनी मृत कर्मचारी बांधवांच्या कुटुंबासाठी नक्की मदत करू असे सांगितले होते..*_ 
त्यानुसार एक कमिटी स्थापन झाली.. आपण कमिटीतील प्रत्येक व्यक्तींना भेटलो त्यांना लढा समजून दिला, त्या कमिटीने आपला अहवाल देखील सादर केला आणि त्या अहवालाचा आधार घेऊन शासनाने काल हा निर्णय घेतला आहे.. 
*१० लाख रु. मदत*
_परंतु अहवालानुसार ही मदत नोकरीच्या सुरवातीच्या १० वर्षांसाठीच लागू असेल. नोकरीस १० वर्ष पूर्ण झालेल्याना नाही.._
आपण या निर्णयाला मंत्रालय, विधानभवन मध्ये मंत्री केसरकर यांना भेटून अनेकदा विरोध केला होता व *सरसकट कुटुंबनिवृत्तीवेतन द्यावे असाच आग्रह धरला होता...*

*मित्रांनो,*
कोकण पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने नुकतेच त्यांच्याशी बोलणे झाले असता १० लाख रु. मदतीचा निर्णय लवकर होईल असेच ते बोलले होते...
पण
*नक्की निर्णय काय झाला?*
म्हणजे सर्व मृत कर्मचारी यांना १० लाख मंजूर 
*की*
सेवेच्या १० वर्षापर्यंत मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० लाख मंजूर..
त्याकरिता मी आता मंत्रिमंडळ निर्णय तपासले परंतु त्यात कालच्या निर्णयाबाबत अजून स्पष्टीकरण नाही तसेच मा.मंत्री केसरकर साहेब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तोही होऊ शकला नाही. 
पुन्हा संपर्क करेन..
(आणि संध्याकाळी upates घेऊन आपल्या समोर असेल..)

*थोडक्यात,*
_आता पर्यंत मयत झालेल्या जवळपास सर्वच मृत कर्मचारी यांना ही मदत लागू होणार असून त्यांच्या कुटुंबांना १० लाख रु मदत मिळेल.. हे आपलच यश आहे.._
*परंतु,*
_आपले धोरण हे कुटुंबनिवृत्ती वेतन द्यावे , जुनी पेन्शन द्यावी हेच आहे... त्यात तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही...!_

सहकाऱ्यांनो,
*संघटित रहा..! विश्वास ठेवा...! आपण थांबलो कधीच नव्हतो....!*

*कायम आपलाच*
*प्राजक्त झावरे-पाटील*
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन
8898880222/९८३३७८१८१७

No comments:

Post a Comment