📢
*।।महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना।।*
*साखळी उपोषण*
◆●• *ठळक बाबी*•●◆
◆ 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे राज्यकार्यकारणी, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी व संघटन शिलेदारांचे उपोषण सुरू होते.
◆ *सलग 3 तीन दिवस हे साखळी उपोषण चालू होते.*
◆ *आज दुपारी 28 फेब्रुवारी रोजी मा. वित्तमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली.*
◆ *त्यांनी अंशदायी पेन्शन योजना बाबत समिती नेमली असून सविस्तर चर्चेसाठी समिती अध्यक्ष वित्त राज्यमंत्री दिपकजी केसरकर यांची भेट घेण्यास प्राथमिक अवस्थेत सांगितले.*
◆ *त्यानंतर संघटन शिष्टमंडळाला प्रशासनाद्वारे मा.वित्तराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी पाचारण केले.*
◆ *केसरकर साहेबांशी सविस्तर 20-25 मिनिटे कुटुंब निवृत्ती वेतन आणि जुनी पेंशन योजना लागू करण्या बाबत चर्चा झाली.*
◆ *अनेक मुद्यांवर चर्चा होऊन प्रत्यक्ष वित्त विभागाचे सचिव साहेबांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. या सर्व चर्चेत आपण हे स्पष्ट करण्यात यशस्वी झालो आहोत की, या नवीन अंशदायी पेन्शन योजनेतील अंमलबजावणी, योजनेने होणारी फसवणूक, मयत कर्मचारी कुटुंबांना आजपर्यंत न मिळालेला कोणताही लाभ व इतर सर्वच विषयावर प्रत्यक्ष वस्तुस्थिती व मंत्रालय पातळीवरील समज हे खूपच वेगवेगळे आहेत हे आपण मंत्रीमहोदयांच्या समोर उघड केले आहे.*
◆ *मयत कर्मचारी कुटुंबाला 10 लाखाच्या आदेशाने कोणताही लाभ मिळालेला नाही, नव्हे त्यातील अटी ह्या अन्यायकारक असून त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे योग्य असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उदाहरण देऊन स्पष्ट केले.*
◆ *या सर्व बाबींमुळे व आपले सर्व म्हणणे आकडेवारीसह, कागदपत्रांद्वारे प्रत्यक्ष मांडून समोरा समोर चर्चा करण्यासाठी आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळातील 5 सदस्यांना शासनाने नेमलेल्या समिती चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याचे स्पष्ट आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले असून तात्काळ 5 ही नावे प्रत्यक्ष लिहून घेतले आहेत हे आपले खूप मोठे यश आहे.*
◆ *एकंदरीत या उपोषण आंदोलनाचे फलित म्हणजे, DCPS/NPS योजनेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती, प्रशासन व संघटना यांचे याविषयीचे असलेले मत मंत्रीमहोदयांच्या समोर आपण उघडे केले आहे. तसेच शासनाने नेमलेल्या समितीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. आपण आपल्या मागण्यांबाबत आज "एक मैलाचा दगड" पार केलेला आहे.*
◆ या सर्व घडामोडी मुळे उपस्थित संघटन पदाधिकारी यांचे समाधान झाले असल्याने *आपले साखळी उपोषण आपण आज रात्रीपासून मागे घेतले आहे.*
कायम आपलाच
~शिवाजी खुडे
राज्यप्रवक्ते
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना
■◆●•●◆■◆●•◆■