महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची यशस्वी वाटचाल सुरूच ..............!
पेन्शन लढवय्यानो नमस्कार.....🙏🏻
आज गुरुवार दिनांक १५.०२.२०१८ रोजी मा.शिक्षण मंत्री श्री.विनोदजी तावडे सरांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मुंबई टीम ला चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बोलावले होते.
त्यानुसार ठीक १२.३० वाजता मुंबई टीम मंत्रालयात दाखल झाली.
आज तावडे सरांनी फक्त आपल्याच संघटनेला मिटींगसाठी वेळ दिल्याने विविध मुद्द्यांवर अगदी सविस्तर चर्चा झाली. हि सभा जवळपास ४५ मिनिटे चालली. साहेबांनी अगदी आत्मीयतेने आपल्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या अखत्यारीत जे आहे , ते करण्याचे आश्वासन दिले.
जुनी पेन्शन , डीसीपीएस कपात, GRADUATY, मृत कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन, अनुकंपा तत्वावर नोकरी अशा मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
⚡💥मित्रांनो , आज झालेल्या पहिल्याच बैठकीतून आपण 3 गोष्टी मिळविल्या⚡💥 :-
१) मृत कर्मचारी कुटुंबातील वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी:-
मृत डीसीपीएस कर्मचारी कुटुंबातील एका वारसाला शासनाच्या कोणत्याही कार्यालयात त्याच्या गुणवत्तेनुसार नोकरी मिळावी, अशी मागणी मुंबई टीम तर्फे करण्यात आली.
तावडे सरांनी नक्कीच अनुकंपासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
=========================
२) डीसीपीएस दुहेरी कपात :-
डीसीपीएस दुहेरी कपात बंद करून एकच कपात सुरु ठेवावी अशी मागणी मुंबई टीम तर्फे करण्यात आली
दोन कपातीमुळे मुंबईतील शिक्षकांचे आर्थिक गणित बिघडले आहे, हातात तुटपुंजा पगार शिल्लक राहतो, तेव्हा माणुसकीच्या नात्याने १च कपात सुरु ठेवावी अशी विनंती सरांना करण्यात आली.
पण असे करण्यास तावडे सरांनी असमर्थता दर्शविली.
सरसकट १RECOVERY कपात बंद करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
शेवटी चर्चेतून एक मध्यम मार्ग काढण्यात आला. २ कपात न करता दीड कपात करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
दीड कपात म्हणजे १ नियमित कपात आणि अर्धी रिकवरी कपात.
(समजा १० हजार रुपये दुहेरी डीसीपीएस कपात होत असल्यास दीड कपात म्हणजे नियमित कपात ५००० आणि अर्धी कपात २५०० रुपये असे, १०००० रुपये कपात ऐवजी ७५०० रुपये कपात करण्यात येईल.)
आज झालेल्या बैठकीतून ज्या ठिकाणी २ कपाती चालू असतील त्या ऐवजी १.५ दीड कपात करण्याचे आश्वासन मिळाले. 7th pay commission लागू होईपर्यंत दीड कपात सुरू राहील, 7th pay लागू झाला की, 7th pay arrears मधून मागची recovery कपात कट केली जाईल आणि फक्त 1 कपात सुरू राहील🙏🏻
दुहेरी कपातीने ग्रस्त डिसिपीएस धारकाला थोडासा तरी आर्थिक दिलासा नक्कीच मिळेल.🙏🏻
3) Graduaty :-
Dcps धारकांना Graduaty देण्यात येण्याचे आश्वासन साहेबांनी दिले.
==========================
मित्रांनो आजच्या पहिल्याच बैठकीत आपण खूप प्रयत्न केला, आणि या 3 गोष्टी मिळविल्या, लवकरच या दोन मुद्द्यांच्या अमलबजावणी चा सकारात्मक निर्णय निघेल याची अपेक्षा करूया.
भविष्यात आणखी प्रयत्न करू. जुनी पेन्शन मिळेपर्यंत हा लढा काही थांबणार नाही.
मागील ३ दिवसांपासून मुंबई टीम आपली शाळा, कॉलेज , कार्यालय कर्तव्ये पार पडून मंत्रालयाच्या भेटी देत आहोत.
या मागील २ दिवसात आपल्या अनेकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या, शाबासकी मिळाली. पण हे कार्य कोण एका व्यक्तीचे नाही आहे, हे टीम वर्क आहे. संपूर्ण श्रेय हे पूर्ण मुंबई टीम चे आहे.
श्री अलीम सय्यद, श्री मंगेश पाटील सर, श्री हेमंत घोरपडे, श्री प्रकाश बडगुजर, सौ.श्रद्धा गंभीर, सौ. स्वप्नाली तांबे, श्री अजय तायडे, सौ. शिल्पा दाभाडे, श्री विनोद म्हरसे, श्री युवराज कलशेट्टी, श्री राठोड सर, श्री मंगेश दंगे, श्री सुनील बाविस्कर, श्री शिवानंद पाटील, श्री विकास चव्हाण, श्री मितेश शर्मा, श्री अनिल काकडे, श्री शिंपी सर, सौ. धरती संपत, सौ. हेमलता mam, श्री जाधव सर, श्री दत्तात्रय सर, श्री सुहास सर यांच्या सहकार्याशिवाय काहीच शक्य झाले नसते.
ध्यासवेड्या तरुणांचे हे संघटन.......
सलाम या संघटनेला.......
तू न रुकेगा कभी, तू न थमेगा कभी , कर शपथ........
एकच मिशन जुनी पेंशन
आपलाच
तानाजी
८४२२९६३१२३/९८२१७६२८४३
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मुंबई