*✊राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा पवित्रा*
~~~~~~~~ ~~~~~~~~
Maharashtra Times | Updated Jun 27, 2018, 04:00 AM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा पवित्रा
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा पवित्रा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रातील सुमारे १९ लाख राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे प्रत्यक्ष लाभ देण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार दोन वर्षांपासून अक्षम्य चालढकल करीत आहे, असा आरोप करीत, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत संप करण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मंगळवारी दिला.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आश्वासन दिले आहे. पण याबाबत निर्णय होत नसल्याने आधी जाहीर केल्याप्रमाणे तीन दिवसांच्या संपाची तारीख जाहीर करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते र. ग. कर्णिकप्रणित राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर आणि सरचिटणीस ग. शं. शेटे यांनी दिली. मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच नाशिक येथे झालेल्या बैठकीत तीन दिवसांच्या संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे शेटे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र व्यापी संपाची नोटीस देण्यासाठी येत्या ११ जुलै रोजी मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत निदर्शने करून सरकारला आगामी आंदोलनाचा इशारा देण्यात येईल. या संपाची दखल न घेतल्यास आक्टोबर, २०१८मध्ये बेमुदत संप पुकारण्याचा निर्णयही नाशिकच्या सभेत घेण्यात आल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले.
*📝कर्मचाऱ्यांच्या मागण्या👈*
*- सातव्या वेतन आयोगाचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने रोखीने देण्यात यावेत.*
*- अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.*
*- केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी*
*- १ जानेवारी, २०१८पासूनचा वाढीव महागाई भत्ता तसेच महागाई भत्याची मागील १४ महिन्यांची थकबाकी तातडीने देण्यात यावी.*
*- सेवानिवृत्तीचे वयोमान ६० वर्षांचे करावे.*
*- शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा.*
*- सरकारी कामकाजातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे.*
*- विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या तत्त्वावर आणण्यात यावे.*
═══════🦋🦋═══════