DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Thursday, March 29, 2018

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन चंद्रपूर

2005 नंतर लागलेले कर्मचारी आणि शिक्षणाच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात

        घंटानाद आंदोलन

दिनांक :- शनिवार,7 एप्रिल 2018
वेळ :- दुपारी 2.00 ते 5.00
स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ,  चंद्रपूर


आपल्याला सर्वांना माहितच आहे की सध्या महाराष्ट्राचे सर्व विभागातील कर्मचारी आणि शिक्षणक्षेत्र हे चुकीच्या धोरणांच्या तावडीत सापडले आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन व शिक्षकांना  शिक्षणाच्या समस्येवर  फक्त आणि फक्त आश्वासनांचे गाजर दाखविण्याच्या पलीकडे काहीही होताना मात्र दिसत नाही आहे.

आज राज्यात असे काही निर्णय घेतले जात आहे की ज्याचा जर विरोध झाला नाही झाला तर येणारा काळ हा अधिक समस्यांनी ग्रस्त झालेला असेल. 31/10 नवीन पेंशन आणि आताचे ताजे उदाहरण म्हणजे 23 अॉक्टोबर 2017 चा शासननिर्णय ज्याने 12 वर्षे व 24 वर्षाच्या हक्काच्या वेतनश्रेणीवर अन्यायकारक अट लादण्यात आलेली आहे. याअगोदर आधीचं 1 नोव्हें 2005 पासुनच्या कर्मचाऱ्यांची पेंशन तर बंद केलीचं आहे. अशाप्रकारे युवा शिक्षक व कर्मचाऱ्यांवर घोंघावणाऱ्या संकटांना आपल्यालाचं सामोरे जावे लागेल.आज जरी हा विषय शिक्षकापूरता मर्यादित असला तरी उद्या सर्व कर्मचारी यांना लावण्यास शासन मागे पुढे बघणार नाहीआश्वासनाची पायरी आपण चढून आलेलो आहोत.

या सर्व अन्यायाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून याद्वारे जुनी पेंशन व 23/10 ची अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी तीव्र करण्यात येणार आहे.

तसेच आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांना तात्काळ  कार्यमुक्त करून त्यांचे डिसिपीएस रक्कमेचा हिशेब तात्काळ वर्ग करावा.

मयत dcps/nps धारकांच्या देय असलेल्या रक्कम त्वरित अदा करणे.

सहाव्या वेतनाची थकबाकी त्वरित जमा करणे.

dcps/nps धारक जे निवृत्त झाले त्यांच्या देय असलेल्या रकमा त्वरित मिळण्याबाबत.

मृत dcps/nps धारक वारसांना अनुकंपा खाली त्वरित सेवेत घेण्याबाबत व त्यांची वेगळी यादी प्रसिद्ध करण्याबाबत.




 आपण या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी या लढ्याला बळकटी द्या.



या असंविधानिक अन्याय कारक धोरणाच्या विरोधात सर्व विभाग जुने नवीन सर्व कर्मचारी_येताय ना मग...7 एप्रिल 2018..

आपल्या सर्वांच्या कायम सहकार्याच्या अपेक्षेत

         अध्यक्ष/सचिव
दुशांत निमकर/निलेश कुमरे
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, चंद्रपूर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Wednesday, March 28, 2018

प्रति, 
      सर्व तालूका अध्यक्ष
       म.रा. जू. पे. हक्क संघटन चंद्रपूर

विषय:- दिनांक 7 एप्रिल 2018 ला होणाऱ्या घंटानाद आंदोलनाविषयी आजच ग्रुप वर सविस्तर चर्चा करणेबाबत

महोदय, 
          आपणास विनंती करण्यात येते की, दिनांक 7 एप्रिल 2018 ला म.रा. जू. पे. हक्क संघटन चंद्रपूर तफै आक्रोश घंटानाद आंदोलन जूनी पेंशन या मागणी साठी करावयाची  असल्याने सभेपूर्वी पॉम्पलेट व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावयाची असल्याने आजच ग्रुप वर चर्चा व्हावी
          तसेच 23/10 चा मुद्दा घेण्यासंबधाने चर्चा व्हावी इतर विभाग या विषयावर नाराज असुन हा विषय घेण्यात येऊ नये अशी चर्चा करित आहे
सर्व तालूकाध्यक्ष यांनी 23/10 च्या विषयावर चर्चा करावी विषय द्यावा की नाही याबाबत चर्चा अंती आपले मत मांडावे


                     अध्यक्ष/ सचिव
       म.रा. जू. पे. हक्क संघटन चंद्रपूर

Monday, March 26, 2018

सर्व कर्मचारी व शिक्षक बंधू भगिनींना  कळविण्यात येते की, *दि 27 मार्च 2018रोज मंगळवार ला  दुपारी 2 वाजता*
 मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  केंद्रीय आणि राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्म. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी. 
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे  धरणे आणि  निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत. सरकारच्या कर्मचारी हितविरोधी धोरणाविरुद्ध आपल्या अस्तित्वाची लढाई हि आपली सामाजिक आणि नैतिक आद्य जबाबदारी आहे.
 *१)अंशदायी पेन्शन योजना रद्द करा. आणि जुनीच पेन्शन योजना सुरू करा.*
२) OUTSOURCING खाजगीकरण, कंत्राटीकरण,बंद करा व कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करा. प्रत्येक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26000/- रुपये करा आणि रिक्त पदे भरून बेरोजगारी कमी करा. वाढती महागाई कमी करा. 7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून त्वरित लागू करा. वेतन त्रुटी निवारण झालीच पाहिजे, थकीत  महागाई भत्त्याची रक्कम त्वरित द्या. महिलांसाठी  दोन वर्षाची बाल संगोपन रजा,  शेतकऱ्यांसाठी  स्वामिनाथन आयोग लागू करा.  दि 27 मार्च  2018 रोजी देशभरातील संघटित,  असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आणि निदर्शने आंदोलन करून मा. प्रधानमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन सादर करतील.
 वरील आंदोलनाला *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचा जाहीर पाठींबा आहे*आणि त्या आंदोलन मध्ये सहभागी सुद्धा व्हायचे आहे तेंव्हा सर्व कर्मचारी,  कंत्राटी कर्मचारी बंधू भगिनीसह  मोठ्या संख्येनी  उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे।
विनीत 
*जिल्हाध्यक्ष/जिल्हा सचिव*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर*
सर्व कर्मचारी बंधू भगिनींना  कळविण्यात येते की, दि 27 मार्च 2018 रोज मंगळवार ला  दुपारी 2 वाजता
 मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  केंद्रीय आणि राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्म. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी. 
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे  धरणे आणि  निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत. सरकारच्या कर्मचारी हितविरोधी धोरणाविरुद्ध आपल्या अस्तित्वाची लढाई हि आपली सामाजिक आणि नैतिक आद्य जबाबदारी आहे.
 १)अंशदायी पेन्शन योजना रद्द करा. आणि जुनीच पेन्शन योजना सुरू करा. 
२) OUTSOURCING खाजगीकरण, कंत्राटीकरण,बंद करा व कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करा. प्रत्येक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26000/- रुपये करा आणि रिक्त पदे भरून बेरोजगारी कमी करा. वाढती महागाई कमी करा. 7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून त्वरित लागू करा. वेतन त्रुटी निवारण झालीच पाहिजे, थकीत  महागाई भत्त्याची रक्कम त्वरित द्या. महिलांसाठी  दोन वर्षाची बाल संगोपन रजा,  शेतकऱ्यांसाठी  स्वामिनाथन आयोग लागू करा.  दि 27 मार्च  2018 रोजी देशभरातील संघटित,  असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आणि निदर्शने आंदोलन करून मा. प्रधानमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन सादर करतील.
 तेंव्हा सर्व कर्मचारी,  कंत्राटी कर्मचारी बंधू भगिनीसह मंगळवार दि. 27 मार्च 2018 रोजी दु. 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर येथे मोठ्या संख्येनी  उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे।
आपलाच
रमेश पिंपळशेंडे
सरचिटणीस,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,चंद्रपूर

Thursday, March 22, 2018

📢📢

पुरानी पेंशन बहाली के लिए  चलो दिल्ली - वितेश खांडेकर...

हम सब चलते गये और कारवां बढता गया...

पुरानी पेंशन बहाली के लिए जो संघर्ष हो रहा है यह अकल्पनीय, अद्भुत है। अभी कुच्छ सालो पहले पुरानी पेंशन बहाली का संघर्ष एक सपना लगता था पर देखते ही देखते सपना हकिकत में बदल गया। आज महाराष्ट्र समेत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, तेलंगाणा हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, तमिलनाडु, आंध्र प्रदेश, कर्नाटका, दिल्ली समेत कई राज्यों में पेंशन का कारवाँ बढता गया, और पुरानी पेंशन बहाली अभियान के राष्ट्रीय अध्यक्ष मा. विजय कुमार बंधु जी के नैतृत्व में और सभी राज्य प्रदेश अध्यक्ष की अगुवाई में दिल्ली के रामलीला मैदान में 30 अप्रैल 2018 को भव्य पेंशन रॅली का आयोजन किया गया है।
आपको यह भी लग रहा होगा की पुरानी पेंशन यह राज्य का मुद्दा है। राज्य कर्मचारी यो को पुरानी पेंशन देनेका निर्णय राज्य सरकार ले सकती है। फिर हम दिल्ली में क्यों रॅली निकाल रहे हैं। तो मैं बतादुँ की केन्द्र सरकार ने पेंशन बंद करने के बाद ही राज्य सरकार ने पुरानी पेंशन बंद की है, और यदि केंद्र सरकार पर दबाव बनता है और केंद्र सरकार यदि पुरानी पेंशन के लिए सकारात्मक है, तो राज्य सरकारों पर भी हम दबाव बना सकते हैं।
30 अप्रैल यह तारीख हमारे लिए एक अच्छा अवसर है। हमे भारत की सभी राजनैतिक दलों को यह बतानेका की भारता का युवा कर्मचारी पुरानी पेंशन के लिए जाग गया है। दल कोई भी हो उस दल के सांसद, विधायक आपना वेतन, पेंशन बढायेंगे और हमारी पुरानी पेंशन छिनकर हमें उल्लू बनायेगें यह अब हम होनें नहीं देगे।
दोस्तो 30 अप्रैल की दिल्ली में होने वाली पेंशन रॅली एक क्रान्ति की सुरूवात है। और इस क्रान्ति का में और मेरे साथ महाराष्ट्र के तमाम साथी हिस्सा बनने जा रहे है। देश कें सभी पुरानी पेंशन विहिन साथियों को आव्हान करता हूँ, की आप भी इस क्रान्ति का हिस्सा बने। क्योकि पुरानी पेंशन की लढाई यह मेरी लढाई है, और इसे कोई दुसरा लढेंगा यह ना उचित है, ना तर्कसंगत मेरी लढाई मुझे ही लढानी होगी।तो चलो राष्ट्रीय पेंशन बहाली अभियान का हिस्सा बन 30 अप्रैल की दिल्ली की पेंशन महारॅली में सहभागी होकर पुरानी पेंशन बहाली के अभियान में अपना योगदान दे।


एक ही मिशन...
             पुरानी पेंशन.....

वितेश खांडेकर(9405343284)
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.

Saturday, March 17, 2018

मराजूपेंहसं चा विजय असो। विजय असो।

ही एक अशी संघटना आहे ज्या संघटनेचा दुसरा कोणी विरोधक नाही।(पण कदाचित मदतही नाही) संघटनेचा काम माञ समाजसेवी।    


      इतर संघटना  →
 आजघडीला शिक्षणक्षेञात अनेक संघटना आहेत । पण त्यांचे काम फक्त वर्तमान शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याही एकमेकांचा विरोध करून , दुसर्या संघटनेचा चांगला काम असेल तरी चांगलं न म्हणता।राजकीय पाठबळ असलेल्या संघटना।
अनुभव भरपूर पण स्वार्थी , अहंभावाची भावना।

तर दुसरीकडे मराजूपेंहसं। जी वर्तमानच नाही , तर सर्व कर्मचार्यांसाठी लढणारी व ज्या संघटना यांच्यासाठी लढण्याची तसदीही घेत नाही त्यांच्याही येणार्या पिढीसाठी लढणारी (कारण अगोदर त्यांचे पाल्य यासाठी पाञ)।

एवढ्या ढगभर असून सुद्धा शिक्षण सेवक योजना लागू, जास्त प्रमाणात  शिक्षित, ऊत्साही व उपक्रमशील लोक असूनही संधी हिरावली।बदल्यांच्या बाबतीतही तसेच ।

पण मराजूपेंहसं चे कार्य व लढवय्ये काही औरच ।पण भविष्यातही या लढवय्यांनी त्यांना दाद देऊ नये। नाही तर यांचे सुद्धा गट पाडतील हे लोक ।( आमच्याकडे या म्हणून )  
मराजूपेंहसं च्या लढ्याला सलाम।

Friday, March 16, 2018

!!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!!


एकटाच आलो नाही राजची साथ आहे; सावध असा तुफानाची हीच सुरूवात आहे.....!

"तुम्ही माझ्याकडे आला आहात, आता ते (सरकार) तुमच्याकडे पेन्शन घेऊन येतील.."
                   राजसाहेब ठाकरे
         पक्षप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सहकाऱ्यांनो नमस्कार🙏🏻
                      कालचा दिवस आपल्या संघटनकरीता नवीन उभारी, नवीन दिशा , प्रचंड ताकद आणि निर्णायक वळण देणारा असाच ठरला...!

      पक्षाच्या जाहीरनाम्यात "जुनी पेन्शन योजना लागू करणे" हा ठळक मुद्दा स्वीकारण्याकरिता काल आम्ही विविध पक्ष कार्यालये यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन देत होतो...
आणि असेच निवेदन घेऊन आम्ही दुपारी "कृष्णकुंज" वर धडकलो...

स्थळ:- कृष्णकुंज - महाराष्टातील सर्वात लोकप्रिय ठिकाण, तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा भरणारे ठिकाण आणि हो महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक TRP असणार ठिकाण...
वेळ :- दुपारची १२ ची..

                 कृष्णकुंज बाहेर खचा-खच भरलेली गर्दी.. काही पक्ष-प्रवेश आणि प्रश्न घेऊन भेटायला आलेल्यांची रांग.. या शे-पाचशेंच्या गर्दीत आत जाता येईल का नाही आणि आत गेल्यावर बोलायला तरी वेळ भेटेल का नाही? ही शंका... परंतु आपली जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सर्वकाही शक्यच आहे.. 
                 लागलीच एक टीम कागदपत्र व फोटोंची प्रिंट घ्यायला तर दुसरी टीम गेटवरील PA ना भेटायला गेली..
"आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून अगदी नागपूर वरून भेटण्यासाठी आलो आहोत.." PA सोबत आम्ही बोललो..
त्याने निवेदनाची प्रत घेतली आणि तुमची २ मिनिटांसाठी भेट करून देतो असंच तो बोलत आत निघून गेला..पक्षप्रवेशाचे घोळके -घोळके आत सरकत होते.. फक्त तिथे नुसते उभे राहण्यापेक्षा आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया( साम TV, zee 24 तास , दै. सकाळ, दै.पुढारी , दै. लोकसत्ता, दै. महाराष्ट्र टाईम्स) यांचे प्रतिनिधी उभे होते त्यांच्या घोळक्यात घुसलो नि आपला मुद्दा आणि आपल्या भेटीचे कारण त्यांना सांगत लढ्याची माहिती देऊ लागलो.. आपल्याकडील निवेदनाच्या प्रती त्यांच्याकडे देऊन आमचा प्रश्न उचलून धरणे का गरजेचे आहे? 
हे सांगू लागलो..

"साहेब, जाणार आहेत जे उरलेत त्यांनी आतमध्ये या.." २५-३० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर या शेवटच्या आवाजाने आमची चलबिचल अजून वाढवली..
आम्ही आतमध्ये घुसलो.. आतमध्ये देखील गर्दी होतीच.. एक एक करत टीम आपला प्रश्न घेऊन भेटत होती.. एका मिनिटात प्रश्न ऐकून त्यावरील मनसे उत्तर मिळवून बाहेर पडत होती..
आता आपला नं आला बहुदा शेवटचाच..

                "आम्ही जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शिलेदार आहोत....आणि हा प्रश्न पोलीस, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, महसूल, राज्य कर्मचारी, मनपा/नपा कर्मचारी इ. सर्वच कर्मचारी संबंधित आहे, असे म्हणत आपला प्रश्न व संघटन यावर बोलायला आम्ही सुरवात केली..
पुढच्या एकाच मिनिटात सर्वांचा ताबाच आम्ही घेतला.. राजसाहेब, माजी आमदार नितीन सरदेसाई आणि सगळेच ऐकत होते.. एका मागून एक आमच्या तोफा धडाडत होत्या.. आंदोलने, धरणे, संघटनेचे मांडणी, प्रश्नाची तीव्रता, राज्य सरकारची आश्वासने , मृत कुटुंबांची वातहात अगदी सगळच..
आता ५-७ मिनिटे झाली तरी आम्ही बोलतच होतो.. आणि राजसाहेब ऐकत होते..
राजसाहेब:- "हा तर अन्याय आहे.."
टीम:- "आम्ही गेल्या ३ वर्षांपासून पूर्ण ताकदीने भांडतोय (आम्ही मोर्च्यांचे फोटो दाखवत बोलत होतो..) पण म्हणावी तशी दखल सरकार घेत नाही. 
राजसाहेब :-"तुम्ही आता माझ्याकडे आला आहात, आता ते तुमच्याकडे पेन्शन घेऊन येतील.."

त्यांच्या ठाकरी शैलीतील या कणखर आवाजाने आमच्या अंगावर काटाच उभा राहिला..

राजसाहेब :- "तुम्ही स्वतः मुंडण  केलेत , आता आपण यांचं(सरकारच) मुंडण करू.. हीच माझी शैली.."

साहेबांचं करारी स्मित आमचं बळ वाढवत होत.. 

टीम:- "साहेब, तुम्ही संबंध महाराष्ट्रातील , देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहात, आम्हा तरुणांचे तर हृदयसम्राटच आहात... तुमची आणि आमची style एकच आहे.."
*राजसाहेब:-* "म्हणजे तुम्ही खळ-खट्याक पण करता काय.." 
*टीम:-* "नाही ..नाही साहेब "
*राजसाहेब :-*"मग.. कशी आपली style एक. " 
*टीम:-* "साहेब, आम्ही तेही करूच पण आमच्या पाठीवर सोडवणारा खंबीर हात नाही.. तो आपण ठेवलात तर हवे ते करू.."

*या उत्तरावर साहेब खळखळून हसले.. "आजपासून राज ठाकरे तुमच्या सोबत, बघू कोण हात लावते ते.."*

              मृत कर्मचारी कुटुंबाची वाताहत (शिक्षक, महसूल इ. उदाहरणे दिली) , त्यांवर आता आलेली वेळ सगळं सांगून आमच्या भविष्याचे आपण मालक व्हा अशीच साद आम्ही घातली.. 
*टीम :-* _आम्ही जवळपास ४ लाख कर्मचारी आहोत आणि केंद्रीय कर्मचाऱ्यासहित अजून भरपूर असतील , आपण हा प्रश्न घेतलात तर हे सगळे आपल्या सोबत असतील.._
*राजसाहेब :-* " ते मला महत्वाचं नाही, ते नंतर पाहू.. तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.. आता तुमचा प्रश्न राज ठाकरे चा झाला.." 
*टीम :-* "साहेब, आम्ही लाखोंच्या संख्येत पावसाळी अधिवेशनावर *शिवजन्मभूमी ते चैत्यभूमी असा लॉंगमार्च व त्याच वेळी आमरण उपोषण करून विधानभवन घेरण्याच्या विचारात आहोत.."*
*राजसाहेब:-* "मुंबईत मी स्वतः याच स्वागत करील नि तुमच्या सोबत असेल , नक्की करा..!" 

         आम्हाला मिळालेली २ मिनिटे १५ मिनीटापर्यंत वाढत तर गेलीच पण *पाठीवर हात मारून शाबासकी सुद्धा मिळाली..*

*राजसाहेब :-* " तुम्ही राजगड कार्यालयावर(मनसे चे मध्यवर्ती कार्यालय)  जाऊन प्रमोद पाटील यांच्याशी चर्चा करून  प्रेझेन्टेशन बनवा , तुमचा प्रश्न हा माझा झाला..

              _ज्या व्यक्तीच्या पुढे बोलायची हिम्मत ना कोणता मंत्री करेल, ना कोणता नेता अश्या अफाट व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तींन, एका सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या व महाराष्ट्रातील एकमेव शैलीदार नेत्याने त्यांच्या ठाकरी शैलीत केलेली फटकेबाजी आपल्याला अगणित ऊर्जा देऊन गेली..आणि मिळालेलं बळ व ताकद तर वेगळीच..._

*सहकाऱ्यांनो,* 
हीच वेळ नक्की निर्णायक असेल .. आता आपला प्रश्न अतिशय कणखर नि  *सर्वाधिक मोठ्या राजकीय व्यासपीठावर येऊन पोहचला आहे की ज्याची व्यापकता अथांगच आणि निर्णायक आहे..*

*विशेष टीप:-* 
उद्या शिवाजी पार्कात होणाऱ्या नवीन वर्षाच्या सभेत आपला मुद्दा येण्याची दाट शक्यता आहेच त्याबाबत आपल्याला कळवले देखील जाईलच.. 
नाहीतर पुढील १५ दिवसात येणाऱ्या राज साहेबांच्या मुख्यमंत्री सोबतच्या बैठकीत हा मुद्दा घेतलाच जाईल..
(आम्ही राजगड या मध्यवर्ती कार्यालयात श्री. पाटील यांच्या सोबत तब्बल २ तास चर्चा करून त्यांना मुद्दे देऊन एक प्रेझेन्टेशन देखील बनवून दिले आहे..)

*एकंदरीत कालचा दिवस सर्वोत्तम असाच गेला..*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
       काल या राज साहेबांच्या भेटीसाठी 
*•गोविंद उगले, राज्यसचिव*
*•मी (प्राजक्त झावरे-पाटील)*
*•आशुतोष चौधरी ,विभागीय अध्यक्ष नागपूर*
*•बाजीराव मोढवे, विश्वस्त* 
*•संतोष देशपांडे, प्रसिद्धीप्रमुख* इ. उपस्थित होतो...
तसेच
*अतिशय अडचणीचं काम निघाल्याने राज्याध्यक्ष केलेले Reservation रद्द करून परत फिरले* परंतु त्यांच्या नियोजनात व  *गोविंदराव, प्रवीण , आशुतोष, बाजीराव* यांच्या नेतृत्वात, *कोकण विभागप्रमुख अमोल माने* यांच्या सहकार्याने तसेच *मुंबई टीम -ठाणे टीम* यांच्या मदतीने सदरचा  दौरा यशस्वी संपन्न झाला...

*मित्र-मैत्रीणीनो,*
_आपल्याकडे ताकद होती, ऊर्जा होती, दिशा होती आता प्रचंड मोठं व्यासपीठ आणि अतिशय खंबीर हात पाठीवर आहेत.._
*तेंव्हा थांबणं नाहीच...आणि तो आपला पिंडही नाहीच...*

*चला... पेन्शन मिळवूनच दाखवू...!*

*कायम आपलाच*
प्राजक्त झावरे-पाटील
8898880222/9833781817

Thursday, March 15, 2018

!!....महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन... !!

सहकाऱ्यांनो नमस्कार...🙏🏻

कालच्या विधिमंडळातील ठळक घडामोडी :-

१. मृत कर्मचारी यांच्या कुटुंबांना  निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय विचाराधीन..


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२. २३/१० च्या GR वर उद्याच विधिमंडळात चर्चा घेऊन सुधारणा आणू...


शिक्षणमंत्री विनोद तावडे

३. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्यात आपला जुन्या पेन्शनचा मुद्दा घेऊ..


विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे

४. शिक्षक आमदारांची आपल्या प्रश्नावर एकी...मुख्यमंत्र्यांसोबत पुढच्या आठवड्यात मुद्देसूद चर्चेसाठी वेळ...


( आमदार सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, आमदार दत्तात्रय सावंत , आमदार पाटील साहेब व इतर)

५. मृत कर्मचारी बाबत विधिमंडळात लवकरच लक्षवेधी..


आमदार कपिल पाटील

६. समाजवादी पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या जाहीरनाम्यात जुन्या पेन्शन चा मुद्दा घेऊ...


प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी

७. कायम युवा टीम सोबत काम करेल


आमदार प्रणितीताई शिंदे

               आपल्या नियोजित राज्य-कार्यकारणी व विधिमंडळ धडक मोहीमेनुसार काल आम्ही विधिमंडळावर कार्यदमदार राज्य सरचिटणीस गोविंदराव उगले यांच्या नेतृत्वात धडकलो... 
सोबत कुशल संघटक राज्य कोषाध्यक्ष प्रविणजी बडे, आपला बुलंद व तडाखेबाज आवाज नागपूर विभाग अध्यक्ष आशुतोष चौधरी, संघटनेची हजरजबाबी तोफ विश्वस्त बाजीराव मोढवे, अभ्यासू प्रसिद्धीप्रमुख संतोष देशपांडे , रायगडचे दणकेबाज शिलेदार प्रवीण काळे, मुंबईचे धडाडीचे शिलेदार शिवानंद पाटील व प्राजक्त झावरे-पाटील उपस्थित होतो..

          कालचा दिवस खूप सकारात्मक व बळ देणारा असाच गेला.. 

● मा. मुख्यमंत्री भेट:-
             नागपूर अधिवेशनावरील महामुंडण मोर्चावेळी मा. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंदर्भात काल त्यांची विधानभवनातील त्यांच्या अँटी चेंबर मध्ये भेट घेतली..
                मा. मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी आमदार सुधीरभाऊ तांबे व आमदार विक्रम काळे साहेबांनी विशेष मेहनत घेतली.. तसेच आमदार दत्तात्रय सावंत व आमदार बाळाराम पाटील हेही या भेटीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात सोबत उपस्थित होते...
_" मृत कर्मचारी कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याबाबत शासन नक्कीच विचाराधीन असून त्या बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ," असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले..._ 

            आपल्या सोबत असणाऱ्या  आमदारांच्या टीमला या विषयाबाबत पुढील आठवड्यात सखोल चर्चेसाठी वेळ दिला आहे.. 
मुख्यमंत्री साहेबांची अतिशय महत्त्वाची भेट हेच कालच्या विधिमंडळ मोहिमेतील महत्वाचं यश...!

● मा. शिक्षणमंत्री भेट
                   २३/१० च्या अतिशय महत्त्वाच्या GR मधील अट क्र. ४ बाबत आज पुन्हा शिक्षणमंत्री मा. विनोदजी तावडे यांची भेट घेऊन त्यांना मागील आश्वासनाचे स्मरण दिले..
"उद्याच विधिमंडळात हा GR चर्चिला जाणार असून त्याच्यात लागलीच सुधारणा होणार आहेत.."
"गुणवत्ता सोडता बाकी सर्व बाबी यातून वगळल्या जातील.." असे साहेब बोलले..
       _याच विषयावर साहेबांची शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील झाली.._
नक्कीच आपल्याला दिलासा देणाऱ्या सुधारणा यात होतील , अशी ठोस खात्री वाटते...

● मा. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब तसेच मा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांची भेट:-
                  विधिमंडळाच्या पटलावर या मुद्द्यावरून पुन्हा सरकारला धारेवर तर धरुच ; पण पक्षाच्या जाहीरनाम्यात देखील हा  मुद्दा घेऊच अशी हमी भाऊंनी दिली.. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब सोबत होते.. 

● आमदार कपिल पाटिल व पेन्शनची टीम:-
                   मुंबईचे आमदार कपिल पाटील यांनी आपल्या प्रश्नावरून आजच लक्षवेधी बनवली असून ती लवकरच विधीमंडळाच्या पटलावर असेल .

● समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांची भेट:-
              -- समाजवादी पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या जाहीरनाम्यात* आपल्या पेन्शन प्रश्नाचा समावेश करावा , या साठी त्यांना निवेदन दिले.. पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा घेण्याविषयी अध्यक्ष अखिलेश यादव यांना पत्र लिहून प्रवृत्त करूच, असे आझमी यांनी आश्वासन दिले..
(आपण महत्वाच्या पक्षांच्या जसे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे ,समाजवादी इ. च्या प्रदेशाध्यक्षांना 'जाहीरनाम्यात' आपला ठळक मुद्दा घेण्याविषयीचे निवेदन देत आहोत..) 

● आमदार प्रणितीताई शिंदे यांची भेट:-
              कालची सुरवातच प्रणितीताईंच्या प्रसन्न भेटीने झाली.. आम्ही त्यांचे आभार मानले व आपण प्रश्न संपेपर्यंत सतत पाठपुरावा घेत राहावा, अशी आशा व्यक्त केली..
"मी नेहमीच युवा टीम सोबत आहे.." याची खात्री प्रणिती ताईंनी दिली...

तसेच 
आमदार निरंजन डावखरे साहेब, कोकण पदवीधर-ठाणे
आमदार विक्रम काळे साहेब-औरंगाबाद
आमदार राहुलदादा जगताप साहेब-श्रीगोंदा, अहमदनगर
यांनी विधानभवन प्रवेशाचे महत्वपूर्ण पास उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार...!

● विशेष उल्लेख:-
• मुख्यमंत्री भेटी साठी विशेष प्रयत्न करणारे आमदार डॉ. तांबे साहेबांचे विशेष आभार आणि तांबे साहेबांचे नियोजन करणारे आपले नगरचे जिल्हा उपाध्यक्ष श्री शिवाजी आव्हाड सर यांचं विशेष कौतुक...
• मुंबई जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे व टीम यांच्या विशेष सहकार्या बद्दल त्यांचेही कौतूक....

सहकाऱ्यांनो ,
आपल्या सर्वांची पेन्शन बाबतची छोट्यातील छोटी मेहनत नक्कीच पेन्शन मिळवून देईल...
कामे सुरूच आहेत आणि सुरुच राहतील...

बस!  "आपला विश्वास व प्रेम असच सोबत ठेवा..."

कायम आपलाच
प्राजक्त झावरे-पाटील
8898880222/9833781817
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन..
😔😔😔😔😔😔😔😔😔
नविन अंशदायी पेंशन योजनेमधुन सेवानिवृत्त कर्मचारी(तलाठी) श्री तुकाराम शंकर साबळे यांना मिळते फक्त दरमहा 1018/-रु पेंशन
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
DCPS धारकांचे भविष्य अंधारात,शासनाकडुन क्रुर चेष्टा
👇👇👇👇👇👇👇👇👇
सातारा जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन चे जिल्हाध्यक्ष श्री अमोलराव निकम,सरचिटणीस श्री प्रविण तरटे,व राज्यसमन्वयक श्री  निलेश घोरपडे यांनी दि.23 फेब्रुवारी रोजी घेतली श्री साबळे यांची भेट व जाणुन घेतली व्यथा
👇👇👇👇👇👇👇👇👇
बिदाल ता.माण,जि.सातारा येथील सेवानिवृत्त तलाठी श्री तुकाराम साबळे हे 1986 साली सेवेत आले परंतु 2006 साली सेवेत कायम झाल्याने त्यांना नविन अंशदायी पेंशन योजना लागु झाली. ते 2016 मे मधे सेवा निवृत्त झाले. या काळातील त्यांची 10% कपात व शासनवाटा व व्याज मिळुन त्यांची रक्कम 482500/-रु जमा होती पैकी त्यांना 60% रक्कम म्हनजे 289500/- रु अनेक फेर्या ऑफिसला मारल्यानंतर मिळाली,
ऊर्वरीत 40% रक्कम 193000/- रु शासनाने 15 वर्षांकरीता LIC मधे गुंतवले असे सांगितले, त्यावर त्यांना दरमहा रु. 1018/-एवढी तुटपुंजी रक्कम पेंशन स्वरुपात सध्या मिळत आहे.
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
चर्चा करत असताना साबळे यांच्या कडुन समजले की, जर जुनीच पेंशन योजना लागु असती तर मला किमान 16000/-रु दरमहे पेंशन मिळाली असती व या वयात मी माझा व कुटूंबाचा ऊदरनिर्वाह कसाबसा भागवु शकलो असतो. पण आता या 1018/- रुपयात महिन्याच्या चहाचाही खर्च भागत नाही.
😔😔😔😔😔😔😔😔😔
मित्रहो आम्ही हे ऐकताना आमचे व सांगताना साबळे यांचेही डोळे पाणावले होते
 शासकीय सेवा करुन बिगारी कामगारापेक्षाही बत्तर जिवन जगण्याची वेळ सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्यावर आली आहे.
कालपर्यंत सेवेत असताना सर,साहेब असनारा आमचा बांधवास या वयात कुटूंब व विविधगरजा  भागवण्यासाठी आजही काम करावे लागत आहे.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
यावेळी आम्ही त्यांच्याकडुन सर्व कागदपत्रे व बॅक पासबुक प्रती घेवुन याचा ऊपयोग न्यायालयात होईल या हेतुने हे सर्व कागदपत्रे मुंबई हायकोर्टात सादर करण्यासाठी व कोर्टात DCPS ची काळी बाजु मांडण्यासाठी वकिलांना पोच केली आहेत.
👊👊👊👊👊👊👊👊👊
DCPS योजना चांगली आहे ती शासनाने विचार करुन तज्ञाचा सल्ला घेवुन तयार केली आहे अस म्हननार्यांना ही फार मोठी चपराक आहे, या योजनेने आपल्या भविष्याचा खेळखंडोबा केला आहे. म्हनुन आता याविरुद्ध एकजुटीने आवाज ऊठवुन लढा तिव्र केल्या शिवाय गत्यंतर नाही,मित्रांनो.

एकच मिशन, जुनी पेन्शन.

Friday, March 9, 2018

👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊

                   जिल्हा सभा

             दिनांक:-11 मार्च 2018

स्थळ:- जनता शाळा, चंद्रपूर( वासलवार दवाखाण्याच्या बाजुला पाण्याच्या टाकीजवळ)

👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊

                    सभेचे विषय

1) मागील सभेचे इतिवृत्व वाचून कायम करणे
2) 30 एप्रिल 2018 ला दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चा संदर्भाने चर्चा
3) म.रा. जू. पेशंन हक्क संघटन तफै होणाऱ्या आमरण उपोषणाबाबत चर्चा
4) प्रत्येक तालूक्यातील डी.सी.पी.एस कपातीबाबत असणाऱ्या समस्या जाणून घेणे व चर्चा करणे
5) जिल्हास्तरावर धरणे आंदोलनाचे आयोजन व नियोजनासंबधाने चर्चा करणे
6) उर्वरीत तालूक्यांनी सभासद यादी जमा करणे
7) मुंडन आंदोलनात झालेल्या खर्चाचा आढावा घेणे व चर्चा करणे
8) सभासद नोंदनीचा हिशोब जमा करणे
9) अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय

👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊

             सदर सभेला सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालूकाध्यक्ष व सर्व तालूका पदाधिकारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे

👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊


       जिल्हाध्यक्ष/ जिल्हासचिव
  म.रा. जू. पेन्शन हक्क संघटन चंद्रपूर

👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊
राज्य सरकारी मृत कर्मचाऱ्यांना फॅमिली पेंशन देणार - ना. सुधीर मुनगंटीवार
आमदार प्रणिती शिंदे यांची यशस्वी मध्यस्थी : पेंशन हक्क संघटनेच्या मागणीला यश
मुंबई(प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा अकाली मृत्यू झाल्यास परिवारास सरकार कडून कोणतीच  मदत अथवा पेंशन दिली जात नव्हती, ही गोष्ट खूप गंभीर व संवेदनशील आहे, म्हणून मृत कर्मचाऱ्यांच्या परिवारास कुटुंब वेतन द्यावे ही महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्या मुळे सरकारला मान्य करावी लागली, आज विधानभवनात या विषयावर आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ते जगदिश ओहोळ, राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे, राज्य संघटक शहाजी गोरवे, सोलापूर जिल्हाध्यक्ष नवनाथ धांडोरे, सोलापूर शहराध्यक्ष सुदर्शन वऱ्हाडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे झालेल्या सावित्रीची छाया पुरस्कार वितरण सोहळ्यात  'मृत कर्मचारी फॅमिली पेंशन' योजना लागू करण्यासाठी मी पाठपुरावा करणार व प्रसंगी तुमच्या सोबत रस्त्यावरील लढाईत उतरणार असे आश्वासन दिले होते , त्याची त्यांनी पूर्तता केली. त्याबद्दल जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.