DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Tuesday, October 30, 2018

*चलो चंद्रपूर, चलो चंद्रपूर 💪💪 ,जवाब दो आंदोलनात मोठ्या 💪💪 संख्येने सहभागी व्हा 
       ३१आँक्टोंबर २०१८ ला  १नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचारी यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन *चंद्रपूर* द्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर *वित्तमंत्री जवाब दो* आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला नागपूर विभागासह  इतरही जिल्ह्य़ातील डीसीपीएस /एनपीएस धारक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.तरी *आपल्या राजूरा तालुक्यातील  सर्व डीसीपीएस/एनपीएस  धारकांनी तसेच जुनी पेन्शन धारक जेष्ठ बांधवानी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.*

            प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे .तो म्हणजे खरच असे मोर्चे ,आंदोलनं करून मला जुनी पेन्शन  मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच "*हो*" असेल . कदाचित उद्याचा हा आपला मोर्चा ही आपली हरवलेली जुनी पेन्शन नक्की मिळवून देईल , पण त्यासाठी सर्वानी स्वतः व आपल्या इतर सहकार्यांना  घेऊन या मोर्चाला उपस्थित राहणं 💪💪 आवश्यक आहे. आपली  खरीखुरी ताकद  लोकप्रतिनीधीना दाखवून देण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. ✊✊✊✊💪💪💪

           या जवाब दो आंदोलनात मा. वित्तमंत्री यांच्यापर्यंत आपले विचार ,आपल्या भावना  पोहचविण्यासाठी आणि त्यांना जुनी पेन्शन या विषयावर बोलतं करण्यासाठी ही नामी संधी असेल. तिचं सोनं करूया .ही लढाई आपल्याला अखंड चालू ठेवावी लागणार आहे . मोर्चे, आंदोलने,या 💪💪 माध्यमातून ती चालूच राहणार आहे.कोणत्याही एका लढाईच्या शेवटी आपली हरवलेली जुनी पेन्शन आपली वाट पाहत असेल .कदाचित उद्याच्या आंदोलनानंतरही ती मिळू शकते. फक्त  स्वतःवर 💪💪 विश्वास ठेवा . स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्याल तर पेन्शन मिळवणं अवघड आहे . म्हणून कसलीही शंका न बाळगता या जवाब दो आंदोलनात उपस्थित राहून आपली ताकद दाखवा .कदाचित उद्याचं हे *जवाब दो_आंदोलन* आपल्याला आपली हरवलेली जुनी पेंशन नक्की  मिळवून देईल .!!!! ✊✊💪💪

*चला तर मग मा.वित्तमंत्री यांना जाब विचारूया !!!*दिनांक: 31 ऑक्टोबर 2018, बुधवार*
*स्थळ : आझाद गार्डन ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर* 💪💪💪✊✊
*वेळ : दुपारी 1 ते 5*

         *#noPension_noVote*

🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋

Monday, October 29, 2018

*जे देईल जुनी पेंशन - त्यालाच देवू समर्थन..*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻

    *गब्बरसिंग ये कहकर गया,*
*जो डर गया, वो मर गया...*
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
*एकच मिशन जुनी पेंशन....*
#no Pension_no Vote. 


*महाराष्ट्रातील सर्व डीसिपीएस / एनपिएस धारक बंधू - भगीनींना मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हाचा सप्रेम नमस्कार!*
     *माझ्या मराजुपेंहसं च्या मावळ्यांनो!*
 
   👉 *दि. 31 ऑक्टों 2018.*
    👉  *रोज बुधवार*
  👉  *वेळ दुपारी 1:00 ते 5:00 वाजेपर्यंत.*
👉 *स्थळ :- आझाद बगीचा पासून ते कस्तुरबा रोड ( वित्तमंत्र्यांच्या घरासमोरुन)  जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.*

     😱 वित्तमंत्री मरा. मुनगंटीवार साहेब, *"जवाब दो" आंदोलन.*😡😡

       *या आंदोलनाचे व्यवस्थीत नियोजन आज चंद्रपूर टिमने 100% पुर्ण केले आहे.*

 📝    *परवानगी मिळालेली आहे.*

🛣🛣 *पोस्टर्स व बॅनर चौका - चौकात लावल्या गेले आहेत.*

📢📢 *प्रत्येक विभागात प्रचार व प्रसार पुर्ण झालेला आहे.*

☑☑ *पॉम्पलेंट प्रत्येक विभागात पोहचविले आहे.*

🚗🚗 *पार्किंग ची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.* 

📢📢 *पेंडाल व स्पिकरची व्यवस्था पुर्ण झालेली आहे.*

🛂🛂 *स्वंयसेवकांचे नियोजन झालेले आहे.*

 🚿🚿 *पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  करण्यात आलेली आहे.*

📰📰 *पत्रकार परिषद आज यशस्वीरित्या पार पडली आहे.*

📺📸📰 *लाईव्ह कवरेजसाठी इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्त पत्रकार यांची 100% व्यवस्था केलेली आहे.*

*मोर्च्यात कसलीही उणिव शिल्लक राहिलेले नाही.*
☑☑☑☑☑☑☑
      *या "जवाब दो " आंदोलनाच्या यशस्वी नियोजनात राज्याध्यक्ष -सन्मा. वितेश खांडेकर सर*
*राज्यसल्लागार -सन्मा. दुधे सर.*
*आशुतोष चौधरी सर -नागपूर*
*आणि प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य पदाधिकारी , महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी व मराजुपेंहसं च्या सर्व शिलेदारांनी आम्हाला नियोजनाच्या प्रत्येक बाबतीत महत्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे.*

*आपल्या सहकार्यामुळेच मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हा टिमने हे नियोजन पुर्ण केले आहे.*
   *या नियोजनात जिल्हा अध्यक्ष - दुष्यांत निमकर सर*
*जिल्हासचिव- निलेश कुमरे सर.*

*जिल्हाकार्याध्यक्ष-खुसपूरे सर.*
*धांडे सर, दबा सर, भिवगडे सर आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी दिवस-रात्र काम करून नियोजन प्रक्रिया पुर्ण पार पाडलेली आहे.*
✅✅✅✅✅✅✅✅✅
        *आता वाट पाहतोय, ती 31 ऑक्टो. 2018 हा दिवस येण्याची.*
*आणि आपल्या आगमनाची..*
*मराजुपेंहसं चे आपण सर्व शिलेदार नक्कीच या "जवाब दो" आंदोलनास चंद्रपूर नगरात याल. अशी आम्हाला खात्रीच नव्हे, तर 100% विश्वास आहे.*
     *आपल्या संघटनची शक्ती वित्तमंत्र्यांना दाखवायची, हिच योग्य संधी आहे.*

   *आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट बघतोय.*
✅✅✅✅✅✅✅✅✅
      *आपण महाराष्ट्रातुन जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.*

  *हि नम्र विनंती.*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    *आपल्याच आगमनाच्या प्रतिक्षेत*
-------------------------------
*जिल्हा अध्यक्ष  / जिल्हा सचिव तथा*
*समस्त जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी*
*मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हा*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
*शब्दांकन :- महादेव शा.मुनावत (जिल्हा प्रसिद्धि प्रमुख )*

Sunday, October 28, 2018

काल दिनांक 27ऑक्टोबर  शनिवारला चंद्रपुर तालुक्याची जवाब दो आंदोलन संदर्भात आझाद बग़ीचामध्ये सम्पन्न झाली. 
चर्चेमध्ये सर्व प्रथम 31 च्या आंदोलनाची पूर्वतयारी बाबत चर्चा झाली.
1)सर्व प्रथम मोर्चाला येणारे इतर जिल्ह्यातील व आपल्या जिल्ह्यातील इतर तालुक्यातुं येणारे शिलेदार यांनी आपली वाहने दर्गा ग्राउंड(वरोरा नाकयाजवळ ,क्लब ग्राउंड समोरील) मैदानात पार्किंग करावी व तिथुन आंदोलन स्थळी आझाद बग़ीचात पायी पोहचावे...👍
2)सर्व शीलेदारांनी पांढरा शर्ट व काळा पैंट असा पोशाख परिधान करावा, सर्वांनी सोबत पेंशनची टोपी आणावी. अगदी काही  शिलेदार ज्यांच्याकडे टोपी नसेल त्यांना टोपी पुरविन्यात येईल.🙏
3)31तारखेचा निषेध म्हणून काळी रिबिन शर्टला लावून आणावी.🙏
4)मोर्चा दरम्यान सुव्यवस्था पाहण्यासाठी फिरते स्वयंसेवक पथक असेल.✊🏼
5)मोर्चामधेच सात माइक असलेले रिक्शाची व्यवस्था करण्याचे ठरले.व या रिक्षमधेच पाण्याची व्यवस्था असेल.
6)दोन-दोन च्या रांगेत मोर्चा अगदी शिस्तबद्ध काढ़न्याचे ठरले.
7) प्रत्येक तालुक्याने नारे असणारे फलक किमान 10 आणावे.👍
8)स्वयंसेवक खालिलप्रमाणे-
1)प्रशांत खुसपुरे2)संतोष निकुम्बे 3)भालचंद्र धांडे 4)प्रवीण दब्बा 5)विनोद पेंदोर 6)विनोद चाचेरे 7)श्रीकांत पोड़े8)मनोज काकड़े9)रविन्द्र मत्ते 10)समीर मत्ते11)रवि सोनकुसरे12)नितिन उमरे13)श्रीकांत येवले 14)रवि किन्नाके15)विजू वैद्य16)राकेश माहुरकर 17)धीरज पोटवार 18)प्रशांत गेडाम 19)वाघाडे सर जी.प. 20)मनोज लांबट21)महेश पानघाटे22)विवेक आदेवार23)दीपक वैरागड़े24)प्रवीण बंसोड़25)विकास नांदे26)अनिल डहाके27)अजय उपरे28)राजू वडस्कर29)विनोद पिंपळकर30)नामदेव मांडवकर31)राजेन्द्र ढोके 32)सतीश आवारी 33)राहुल चव्हाण 34) धीरज उपरे .....व आणखी गरजेनुसार स्वयंसेवक वाढविता येईल🙏 🙏
आणखी पुढील नियोजन कळविन्यात येईल🙏 🙏
# *पेन्शनवार्ता*


*दिल्ली म्हणते, 'पेन्शन लो'...*
          *अनं महाराष्ट्र म्हणते, 'वित्तमंत्री जवाब दो'..*

  😇 *उद्धवा अजब तुझे सरकार...* 😇

✍ रोखठोक:- *सुनिल दुधे*

        हल्ली दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची फॅशनच आलीय.  ज्या महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी व आंबेडकर सारखे थोर पुरुष जन्माला आले. त्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी शिवाजी जन्मावा पण तो दुसऱ्याच्या घरात. ही बनत चाललेली प्रवृत्ती पुरोगामीत्वाच्या झेंड्याला मातीकडे झुकविते. 
          जुनी पेन्शन हा विषय सध्या कर्मचाऱ्यामधिल अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतांना ज्यावेळी जुनी पेन्शन हा विषय महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडे जातो तेव्हा ते मोठया कुतूहलाने हा प्रश्न विचारतात की, कोणकोणत्या राज्यांनी जुनी पेन्शन लावली? अश्या वेळी महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर आणण्याच्या बाता करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे पाहून आम्हचा तरुण महाराष्ट्राचा तरुण कर्मचारी आता कोणत्या राज्याचा नंबर डायल करावा या बुचकळ्यात पडतो. अनं सहज या ओळी गुनगुणनतो..
    *शोधीशी मानवा राहुळी, मंदिरी..*
      *नांदतो देव हा आपल्या अंतरी...*

    कल्याणकारी राज्य स्वतःमध्ये शोधण्याची सद्बुद्धी शासनाला येईल तेव्हा येईलच. मात्र सध्या दिल्ली मधिल *आप* लं सरकार महाराष्ट्रातील *आप* ल्या कर्मचाऱ्यांना *आप* लंसं वाटू लागलंय. काल परवा दिल्ली मध्ये जुन्या पेंशनचं भूत मानगुटीवर घेऊन नाचणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यानी दिल्लीचे *प्रत्यक्ष तरुण* नेतृत्व असलेले अरविंद केजरीवाल यांना भेटले. केजरीवाल यांनी मुक्तद्वारात बिनधास्त चर्चा करून जुनी पेन्शनच्या तरुणांना म्हणाले *"सिर्फ15000 कर्मचारी के साथ आंदोलन करके दिखाओ और पुराणी पेंशन पेन्शन लेलो."* तेही जाहीरपणे.  नाहीतर आम्हचे महाराष्ट्रातील महामहिम मुख्यमंत्री खडकाच्या आरपार दिसावं इतकं पारदर्शक व्यक्तिमत्व बंदद्वार चर्चा करून  मान डोलविण्याच्या वर धाडस करतांना दिसत नाही. त्यांना वाटायचं उगाच आपण म्हणायचं '50 हजार कर्मचारी आणा जुनी पेन्शन घेऊन जा' आणि संघटना एक लाख घेऊन यायची.. त्यामुळे कदाचित  त्यांचे धाडस होत नसावे. अरविंद व देवेंद्र दोन्ही देवाची नाव असली तरी त्यात दैवी गुन असावेच असे नाही. मुख्यमंत्री यांना दिल्ली तशीही नवीन बिल्ली वाटत असावी कारण केंद्रातला  वाघोबा त्यांचा आहे मात्र ही बिल्ली संपूर्ण देश्यासाठी जुनी पेन्शनची किल्ली झाली तर वाघोबाला सर्कशीत काम करावे लागेल.
      बरं दिल्लीत झाल तस महाराष्ट्रात का व्हावं.. इथं आम्हची जुनी उधारी संपत नाही तर नवीन पैका कुठून फेकून मारणार.. विषय असा की, सत्तेत येण्यापूर्वी याच सत्ताधारी पक्षानी खूप मोठ - मोठया बाता केल्या. *सध्या वित्तमंत्री असलेल्या महोदयांनी 2012, 2013, 2014 मध्ये सलग तीन वर्षे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना (पृथ्वीराज चव्हाण) यांना पत्रे लिहून नवीन पेन्शन योजना अन्यायी असून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लावावी अशी कागदी मागणी केली होती.* पण आता सत्तेत आल्यावर वित्तमंत्री महोदय आपल्याच पक्षातील आमदार नागो गाणार यांना पत्र लिहून  म्हणतात की, महाराष्ट्र भिकेला लागलाय त्यामुळे जुनी पेन्शन लागू करणे शक्य नाही. म्हणजे सामान्यांनी काय विचार करावा. की वित्तमंत्री सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्रात पैश्याची खणखणाट होती आणि सत्तेत आल्यापासून महाराष्ट्र भिकेला लागले असेल( पुरवणी मागण्या मागून - मागून) त्यामुळे ते जुनी पेंशन देने शक्य नाही म्हणत असतील. नाहीतर सत्तेत येण्यासाठी खोट्या आश्वासन देने हे मताचं राजकारण असेल. काय खरं ते देव जाणो.. यांची ही प्रवृत्ती म्हणजे *आज नगद - कल उधार* वाली दिसते. मात्र जुन्या पेन्शनच्या तरुणांनी उधारी वसूल करण्याचा बिडा उचललेला दिसतोय म्हणून 31 आक्टोबर ला ते  वित्तमंत्र्याच्या गावात जवाब दो म्हणत सारी जुनी उधारी वासून करणार आहेत.
     महाराष्ट्रातील तरुण कर्मचाऱ्यांचे दुर्देव्य हे की, जवाब दो, जवाब दो... म्हणून ओरडूनही वित्तमंत्री डोळे उघडायला तयार नाही. तसेही मराठा व शेतकऱ्यांच्या आणि इतर सततच्या मोर्चाने   सत्ताधाऱ्यांच्या कानांचे पडदे केव्हांचेच फाटलेत त्यामुळे कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकू जाणार कशी ?
       मात्र या जवाब दो चं रूपांतर सत्ताधारी को फेक दो मध्ये झालं की, *ये क्या हुवा.. कैसे हुवा .. कब हुवा कोई भी ना जाणे..*  म्हणायची वेळ येईल नक्की.   सत्ताधाऱ्यांकडे Evm नावाचा अल्लादिनचा चिराग असल्यावर या मराठा, शेतकरी,आदिवासी आंदोलनाला गिळंकृत करणारे, त्याचे कर्मचारी काय वाकडं करणार या सत्ता उन्मादात असणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की EVM आपरेट करणारे निवडणुकीतील कर्मचारीच असतात आणि शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांना गावात चांगलं राजकारण करता येते.... बाकी तरुण रक्त इतकं सळसळत आहे की त्याच्या त्सुनामीत ते कोणाला नेऊन कुठे फेकतील याचा काही भरवसा नाही.
        आता दिल्लीच्या या बादशाही घोषणेने किमान देव *इंद्र* चिर निद्रेतून जागा होवो आणि जुन्या पेन्शनच्या तरुणांना (सु) *धिर* देण्याचे ब्रम्हज्ञान त्यांना प्राप्त होवो हीच नरेंद्र चरणी प्रार्थना.
                            *क्रमशः*

✍     *सुनिल दुधे*
          राज्यसल्लागार
महराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन

Saturday, October 27, 2018

*चलो चंद्रपुर*

*ध्येयवेड्या तरुणाईचे संघटन म्हणजेच महाराजुपेहसं हे होय.कारण गेल्या तीन वर्षापासुन आपण सर्व जुनी पेंशन मागणीसाठी न थकता,न थांबता उस्फुर्तपणे एका पाठोपाठ आंदोलने करीत आहोत.आपले होणारे प्रत्येक आंदोलन हे भव्यदिव्य असतात.आपली आंदोलने बघुन सर्वांच्या पोटात पोटशुळ येतात.मित्रांनो नुकतेच आपले मुंबई येथील आंदोलन आपण यशस्वीपणे पार पाडले.आणि त्यातुन थोडी उसंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या पुढ्यात अजुन एक आंदोलन वाट पाहत आहे.येत्या 31 आँक्टोबर रोजी चंद्रपुर येथे जबाब दो हे आंदोलन आपण करीत आहोत.हे आंदोलन चंद्रपुर विभागापुरता मर्यादित असले तरी संपुर्ण महाराष्ट्रभरातुन आपले जुनी पेंशन लढवय्ये मावळे चंद्रपुर येथे येणार म्हणजे येणारच.कारण आपण सर्व प्रचंड ध्येयवेडाने झपाटलेले ध्येयवेडी आहोत.आपल्या ध्येयवेडामुळे आपण ठार वेडी झालेल्या माणसांप्रमाणे झालेलो आहोत.ठार वेडी झालेली माणसेच इतिहास घडवितात. म्हणुन मित्रांनो आपल्याला इतिहास घडविण्यासाठी चंद्रपुर येथे जावेच लागणार आहे.कारण चंद्रपुर म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कुबेर असलेल्या वित्तमंत्री यांचे गाव आहे.हे महाशय म्हणजे अजब रसायन आहे.सत्तेत नसतांना हे महाशय अगदी बेंबीच्या देठापासुन ओरडुन ओरडुन जुनी पेंशन लागु करा म्हणुन सर्व ढिंढोरा पिटत होते.आमना खानदेशमा एक म्हण ह्या भाऊले लागु पडत.तवयं हाऊ भाऊ फुटेल डबडासारखा वाजी राहीनंता.आणि आत्ता सत्तेच्या धुंदीत मतवाल वारुप्रमाणे चौफेर उधळत जाऊ पेंशनला विरोध करीत आहे.आपण सर्वांनी याचा जाब विचारण्याची वेळ आता आली.जवाब दो ह्या आंदोलनामुळी ही सुवर्णसंधी आपल्या मिळणार आहे.मग ती सुवर्णसंधी आपण काय वाया घालवावी*

*चंद्रपुर येथील जवाब दो आंदोलन यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा.सर्व परवानग्या मिळालेल्या आहे.तरी आपण जास्तीतजास्त संख्येने चंद्रपुर येथे येऊन चंद्रपुर टीमचा उत्साह वाढवावा ही नम्रविनंती.आंदोलन यशस्वी होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या श्री.सुनिल दुधे (राज्य सल्लागार ) श्री.दुशांत निमकर(जिल्हाध्यक्ष)श्री.योगराज भिवंगडे (जिल्हा उपाध्यक्ष) श्री.निलेश कुमरे(जिल्हा सचिव) श्री.प्रशांत खुसपुरे(जिल्हा कार्याध्यक्ष)श्री.भालचंद्र धांडे,श्री.प्रविण दब्बा,श्री.अविनाश चवले,श्री.गणेश चिडे,श्री.अनिल डहाके,श्री.श्रीकांत पोडे,श्री.प्रमोद उरकुडे,श्री.विजय वैद्य व सर्व ज्ञात-अज्ञात पेंशन लढवय्ये मावळ्यांचे मनापासुन अभिनंदन*

*आम्ही येतोय,तुमची मेहनत वाया जाऊ देणार नाही*

*चलो चंद्रपुर,चलो चंद्रपुर*

*आपलाच-श्री.संजय सोनार कळवाडीकर*

Thursday, October 25, 2018

*प्रति,*
*जिल्हाध्यक्ष ( सर्व ),*
*समस्त जिल्हा-तालुका पदाधिकारी,*
समस्त पेंशन शिलेदार,* 

*चंद्रपूर जिल्ह्या जवळ असलेल्या जिल्ह्यातील समदुखी बंधू/भगिनी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे.*

*_विशेष निमंत्रण_*: - *राज्याध्यक्ष, राज्यसचिव व राज्यपदाधिकारी, समस्त विश्वस्त,सर्व जिल्हाध्यक्ष आणि राज्यातील पेंशन शिलेदार*

*आग्रहाचे निमंत्रण*: -  *सर्व कर्मचारी आणि शिक्षक संघटना पदाधिकारी*.


*३१ ऑक्टोबर...*
                      *हाच तो दिवस ज्या दिवशी युवा कर्मचार्यांचे कंबरडे मोडून भविष्य अंधकार मय करणारा*

     *हाच तो दिवस*

*नवीन कर्मचारी व जुने कर्मचारी यांचे उभा भेद निर्माण करणारा*

    *हाच तो दिवस*

*म्हातारपणाची काठी म्हणून सहारा देणारी जुनी पेंशन पासून आम्ही परावृत्त झालोय.*

 *हाच तो दिवस*

*नव्या कर्मचाऱ्याला शेअर मार्केट वर आधारित असलेल्या अंशदायी पेंशन योजनेचा बारसं होऊन गोंडस नाव दिलं गेलं*

*हाच तो दिवस*
     
*डीसीपीएस-एनपीएस नावाचे भुत मानगुटीवर बसले ते अनेक कर्मच्यार्यांचे आयुष्य उध्वस्त करूनही स्वस्थ बसत नाही आहे......*

*समस्या अनेक असतात पण मार्ग तेथे कळतो.आम्हा dcps धारकांच्या नादी लागायचं नाय.आम्ही मरे पर्यंत लढतो...मरेपर्यंत लढतो..*

*म्हणूनच*

*चंद्रपूर नगरीत पुन्हा एकदा जुनी पेंशन चा नारा गुंजणार*

*_याचा विरोध...._*

*जवाब दो आंदोलन..*

*शासनाच्या तिजोरीच्या चाव्या जिथे आहे त्या चंद्रपुर शहरातचं*

*जवाब_दो आंदोलन.... *
*३१ ऑक्टोबर 2018-चंद्रपुर*

*स्थळ:-आझाद गार्डन ते गांधी चौक...जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर*

*वेळ:-1:00 वाजता*

आपण सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने *३१ ऑक्टोबर २०१८ ला चंद्रपूर* येथे विभागीय भव्य बेधडक मोर्च्यास उपस्थित राहून *जवाब दो आंदोलनाची* धार वाढवावी. 

*अब की बार,पेंशन दो सरकार*

*जो देईल पेंशन,त्यांनाच आम्हचे समर्थन*

*एकच मिशन,2019 च इलेक्शन*

*#no pension-no vote*


*आयोजक*
*श्री दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष*
*श्री निलेश कुमरे जिल्हा सचिव*
*प्रशांत खुसपुरे जिल्हा कार्याध्यक्ष*
*श्री जितेंद्र बलकी जिल्हा कोषाध्यक्ष*
*कु नूतन मेश्राम जिल्हा महिला उपाध्यक्ष*
*सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी*
*चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन*


*आपले विनीत*
*श्री आशुतोष चौधरी नागपूर विभाग अध्यक्ष व सर्व जिल्हाध्यक्ष*
*एकच मिशन जुनी पेंशन*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻

      *क्या हुआ तुम्हारा वादा ???*
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
   *विरोधी पक्षात असतांना सतत जुनी पेंशन पुर्ववत लागू करण्यासाठी पाठपुरावा केला.*
   *अाणि*
*मा. वित्तमंत्री साहेब, आपण सत्तेत आल्याबरोबर घूमजाव!*
😱😱😱😱😱😱😱😱😱
       *सत्तेत तुमच्या कडून आम्हाला न्याय मिळेल. अशी अपेक्षा होती.*
     *पण आपण अन्यायावर अन्याय करत आहात .*

*मा.मुनंगटीवार साहेब, वित्तमंत्री, महाराष्ट्र शासन.*
*आताही वेळ गेलेली नाही. 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेंशन पुर्ववत लागू करावी.*

      *हिच नम्र विनंती.*
-------------------------------------
    *आणि म्हणुनच ,आपण केलेल्याो आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी,*

    *मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हा, तुमच्याच स्वजिल्ह्यात " जबाब मागण्यासाठी "*

   *दि. 31 ऑक्टों. 2018 ला "दे धडक... बेधडक मोर्चा काढत आहे.*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻

 *मराजुपेंहसं के परिवार घडी की सुईयों जैसी है।*
    *भले ही एक फास्ट हो...*
       *भले ही एक स्लो हो...*
*भले ही एक बड़ी हो...*
  *भले ही एक छोटी हो...*

*लेकीन ....*
*सरकार की 12 बजानी है,*

*ये बात ठानकर एक साथ हो गए है।*
😡😡😡😡😡😡😡😡😡

*चलो चंद्रपूर... चलो चंद्रपूर.. चलो चंद्रपूर ...*
🚶‍♂🚶‍♀🏃‍♀🚶‍♂🏃‍♂🚶‍♂🏃‍♀🚶‍♀🏃‍♂

   *मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हा तर्फे आपणास विनंती आहे की,*
*आपण सर्वांनी दि. 31 ऑक्टो. 2018 ला ठिक 1:00 वा. "आझाद बगीचा ते जिल्हाधिकारी कार्यालय" या विभागीय बेधडक मोर्च्यात सहभागी व्हावे.*
-----------------------------------
*खोकर पाने का मजा ही कुछ और है...*
*रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है...*
*हार तो जिंदगी की एक हिस्सा है, मेरे दोस्त!*
*हार के बाद जितने का मजा ही कुछ और है.....*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
            👏🏻 *आपले विनित* 👏🏻
----------------
*अध्यक्ष / सचिव तथा*
*समस्त जिल्हा व तालुका कार्यकारिणी*
*मराजुपेंहसं चंद्रपूर*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
*- महादेव शा.मुनावत, (जिल्हा संपर्क प्रमुख )*

Monday, October 22, 2018

प्रति,
*मा. तालुका अध्यक्ष/सचिव*
 व सर्व पदाधिकारी
 महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर व नागपूर विभागातील सर्व तालुके
                यांस

*विषय :- ३१ अॉक्टोबर, २०१८ हा दिवस दे धडक..बेधडक मोर्चा चंद्रपुरात काढत असल्याबाबत*

*महोदय,*
आपल्या सर्वांनाच माहित आहे की *३१ अॉक्टोबर, २००५ रोजी* केवळ *मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचा-यांना नवीन अंशदायी पेंशन योजना सुरु* केली.
ही योजना सुरू करुन महाराष्ट्र शासनाने *संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान* केला आहे. तसेच, नवीन योजना लादून आणि *जुनी पेंशन योजना बंद करुन १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचा-यांवर व त्यांच्या कुटुंबावर घाला* घातला आहे.

सध्याचे सरकारही *शेअर बाजारावर आधारित अन्यायी नवीन पेंशन योजना* पुढे रेटत आहे.

तरी, *नवीन पेंशन योजनेचा आणि ती लादणा-या महाराष्ट्र सरकारचा निषेध* करत *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने ३१ अॉक्टोबर, २०१८ ह्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दे धडक...बेधडक मोर्चा काढण्यात येत आहे तरी नागपूर विभाग मधील वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जनजागृती करून चंद्रपुरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  ही नम्र विनंती.*


आपल्यातले आम्ही
अध्यक्ष/सचिव
दुशांत निमकर/निलेश कुमरे
चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

Saturday, October 6, 2018

*नमस्कार मित्रांनो*
👏👏👏👏👏👏👏👏👏👏

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,*
 *जिल्हा शाखा चंद्रपूर*

✍✍✍✍
*आभार व अभिनंदन*

               मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून आपल्या संघटनेचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन पार पडले. सुरुवातीपासूनच अडचणी चा सामना करत करत या आंदोलनास काल पूर्णविराम मिळाला.

          या आंदोलनासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक,  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक,  खाजगी प्राथमिक शिक्षक,  आश्रम शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी,  ग्रामसेवक, महसूल विभाग ,पाटबंधारे व जलसंपदा विभाग कृषी विभाग व इतर सर्वच विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने बांधव  *चंद्रपूर जिल्ह्यातून* सहभागी झाले. या बद्दल सर्वांचे संघटनेच्या वतीने *विशेष आभार आणि कौतुक......👌✊*

✍✍✍✍
         आंदोलनात सक्रिय पाठिंबा देण्यासाठी इतर *शिक्षक व अन्य विभागाच्या संघटना पदाधिकारी व बांधव* ही उपस्थित होते,त्यांचेही लाख लाख आभार. 🙏

✍✍✍✍✍
*विशेष कौतुक:-*
           महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमधून महिला भगिनींचा मोठा सहभाग दिसून आला. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढ्याच्या शिरोभागी राहणाऱ्या *महिला भगिनींना मानाचा मुजरा.....👏🚩*
✍✍✍✍
आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर *पेन्शन दिंडी क्रांती सप्ताह,  पेन्शन दिंडी केंद्रस्तरीय संपर्क अभियान- प्रचार निधी संकलन आणि प्रत्यक्ष आंदोलनातील सहभागी बांधवांचे नियोजन* करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे *तालुकाध्यक्ष सरचिटणीस त्या तालुक्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सर्वच टीम* तुमच्या योगदानातूनच हे आंदोलन पार पडू शकले. कौतुकास शब्द अपुरे ...🙏

✍✍✍✍
*फलित....?*

*शासनाच्या मुस्कटदाबी धोरणानंतर ही आंदोलन करून दाखवले, हा आत्मविश्वास..... हे कर्तुत्व पुढच्या कैक लढाईसाठी प्रेरणा स्त्रोत ठरेल.* 16 ऒक्टोंबर रोजी निश्चित केलेली मीटिंग की जुन्या पेन्शन योजनेकडे घेऊन जाणारी महत्वपूर्ण गुरुकिल्ली आहे. या संधीचे सोने महाराष्ट्रातील तमाम डीसीपीएस धारकांच्या त्यागातून आणि कष्टातून निश्चित होईल. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मयत कर्मचाऱ्यांसाठी दहा लाखाचा सानुग्रह निधी देण्याचा घेतलेला निर्णय मधील *जाचक अटी 100% काढण्यात येतील.*

✊✊🚩🚩✊✊

*सांस हे जब तक,*
*न रुकेंगे कदम ,*
*चल पडे है तो ,*
*मंजिल को पा ही लेंगे हम ||*

🙏🙏🙏🙏🙏
अध्यक्ष , सचिव , कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष
जिल्हा कार्यकारिणी सदस्य 
*चंद्रपूर जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटन*

✊✊🚩🚩✊✊