DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Friday, August 7, 2020

NPS भारत छोडो अभियान

 प्रति,

सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य

तालुका अध्यक्ष/पदाधिकारी व सदस्य


विषय:दिनांक 8 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित होणाऱ्या पेंशन अभियानाबाबत


चंद्रपुर जिल्ह्यातील जूनी पेंशन हक्क संघटनेतील सर्व शिलेदाराना सूचित करण्यात येत आहे की,सध्या कोरोनाचे सावट असल्याने आंदोलन,मोर्चे करू शकत नाही परंतू आपली न्याय हक्क व रास्त मागणी सरकार पर्यत पोहचविन्यासाठी सोशल मिडियावर सक्रिय राहणे अत्यंत आवश्यक आहे.ऑगस्ट महीना हा क्रांती साठी प्रसिद्ध आहेच हे तुम्ही जाणता आहेतच.भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक क्रांतिकारी युवकांनी प्राणाची आहूती दिली आहे.सततच्या संघर्षातून यशाची फळे निश्चित चाखायला मिळतील यासाठी सर्व अंशदायी पेंशनधारकांनी लढ़यात सक्रिय राहून विरोध करावा यात मागील महिन्यातील 10 जुलै 2020 ची अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम 1977 आणि नियमावली 1981 मधील नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेच्या व्याख्यावरच शासनाने घाला घातलेला आहे त्यामुळे    1 नोव्हेबर 2005 रोजी संस्था 100 टक्के अनुदानधारक नाही या सबबी खाली जूनी पेंशन पासून वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव हाणुन पाडन्यासाठी 8 ऑगस्ट रोजी E-MAIL द्वारे (asc.schedu@maharashtra. gov.in) आक्षेप नोंदवून अधिसूचनेला तीव्र विरोध दर्श्ववावा.


       तसेच त्याच दिवशी देशपातळीवर मा. पंतप्रधान यांना व राज्य पातळीवर मा. मुख्यमंत्री यांना *31 ऑक्टोबर 2005* ची अधिसूचना रद्द करून जूनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी ईमेल द्वारे करायची आहे व ईमेल केल्याची प्रसिद्धि वाट्सएप्प,फेसबुक यासारख्या माध्यमातून करावी.


   9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य सम्पूर्ण भारतात *NPS भारत छोड़ो* अभियान ट्विटर वर राबविले जात आहे तरी चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व DCPS/NPS कर्मचार्यांनी *NPS निजीकरण भारत छोड़ो* हा हैशटैग वापर ट्वीट व रीट्वीट करावे असे आवाहन चंद्रपुर जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटना करीत आहे.


आपलीच जिल्हाकार्यकरिणी

चंद्रपुर जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटन

Tuesday, December 17, 2019

*शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवन्यास आनंद वाटेल*
*शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात*

*जुनी पेन्शन शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची पेन्शन हक्क  संघटन कडून आग्रही  मागणी*
🔛🔛🔛🔛🔛🔛🔛
*बुधवारी नागपुरात होणार संघटन विश्वस्त मंडळाची बैठक*
🔛🔛🔛🔛🔛🔛🔛

*आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून मा.ना.एकनाथजी शिंदे,मा.ना. बाळासाहेबजी थोरात यांची भेट घेवून जुनी पेन्शन व शिक्षण विषयक प्रश्नाबाबत निवेदन देवून चर्चा करण्यात आली.यावेळी मा.आमदार रोहित दादा पवार,मा.आमदार विश्वजीत कदम साहेब,मा.आमदार मानसिंग भाऊ नाईक,मा.आमदार विक्रमदादा सावंत,मा.शिक्षक आमदार विक्रम काळे,मा.आमदार भारत नाना भालके,खा.हेमंत गोडसे यांची ही भेट घेवून चर्चा केली.*

यावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या  प्रलंबित प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी प्रामुख्याने जुनी पेन्शन व शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची आग्रही मागणी केली. शिक्षण मंत्री महोदयांनी सर्व मुद्द्यांची माहिती घेवून सकारात्मक कार्यवाही केली जाईल.शिक्षण सेवक मानधन वाढीसाठी वित्त विभागासोबत चर्चा केली जाईल असे सांगितले.खरेतर सरकार स्थापन होऊन खूप कमी दिवस झाले आहेत.आजची भेट ही प्राथमिक होती.पुन्हा एकदा पेन्शन लढा निर्णायक करण्यासाठी पूर्वतयारी करण्याचा आजचा दिवस.उद्याही पाठपुरावा सुरू राहील...

शिक्षण मंत्री महोदयांना दिलेले निवेदनातील मुद्दे

*1. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.*

*2. शिक्षण सेवक पद्धती बंद करण्यात यावी व सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवकाना मानधन प्रतिमाह एकवीस हजार रुपये करण्यात यावे.*

*3.सातव्या वेतन आयोगातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत त्रुटी दूर करण्यात याव्यात.*

4. नवीन आश्वासित प्रगती योजना 10,20,30 शिक्षकांना लागू करण्यात यावी.

5.मृत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान शासन निर्णयातील दहा वर्षाची अट रद्द करण्यात यावी.

6.बी. एल.ओ.सारख्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी....

7.शालेय पोषण आहार योजनेत सुधारणा करून केंद्रीय स्वयंपाकगृह द्वारा पोषण आहार वितरित करण्यात यावा.

8.शिक्षण विभागांतर्गत रिक्त विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक पदे तात्काळ भरण्यात यावीत.

*यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,सरचिटणीस गोविंद उगले,राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार,नागपूर विभागीय अध्यक्ष अशुतोष चौधरी,विश्वस्त अमोल  शिंदे,नवनाथ धांडोरे,नदीम पटेल,शैलेश राऊत,कुणाल पवार,अनिल वाकडे,गुरुदेव नवघडे,बापू मुनघाटे,पुरषोत्तम हटवार हे उपस्थित होते.*

शब्दांकन....

*🖋अमोल शिंदे 🖋*
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली..
✊✊✊✊✊✊✊✊✊
👇👇👇👇👇👇👇👇

Sunday, December 1, 2019

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*महाविकस आघाडी सरकार शिक्षकांसाठी पहिल्याच दोन महिन्यांत घेणार पुढील महत्वाचे 10 निर्णय - सूत्र*

*1) DCPS बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणार.*
*2) अश्वासित प्रगत योजना 10, 20 व 30 वर्षे नोकरीत कालबद्ध पदोन्नती विना आट लागू करणार.*
*3) 2004 व 2005 ला नोकरीला लागल्याल्या शिक्षकांच्या 7 वा वेतन आयोगातील त्रृटी दुर करणार.*
*4) मुख्यालय राहण्याबाबत ग्राम सभेचा ठराव चा शासन निर्णय रद्द करणार.*
*5) कॅशलेश मेडिक्लेम सेवा सुरू होणार.*
*6) वय वर्षे 55/60 किंवा सेवा 33 वर्षे सेवानिवृत्त शासन निर्णय रद्द करणार.*
*7) केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी पदे प्रमोशनने लवकरच शिक्षकांमधुन भरणार.*
*8) पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करुन विद्यार्थ्यांना मध्यवर्ती किचनगृहातुन मिळणार दर्जेदार आहार व शिक्षकांवरील जबाबदारी काढणार.*
 *9)क्लस्टर (केंद्र) स्तरावर पगार, ऑनलाईन कामे व डेटा एंट्री इत्यादीसाठी एक क्लर्कचे पदे निर्माण करणार.*
*10) खाजगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी CET व TET परिक्षा पास शिक्षकांची नियुक्ती करणार.*
🤝🏻🤝🏻🙏🏻🙏🏻🤝🏻🤝🏻🙏🏻🙏🏻🤝🏻🤝🏻
*सरकार एवढे चांगले निर्णय घेणार आहे तर ही पोस्ट सर्व शिक्षकांपर्यंत पोहचलीच पाहिजे.*

Monday, September 9, 2019

✊✊✊✊✊✊✊✊✊
     *मनापासून हार्दिक आभार*
✊✊✊✊✊✊✊✊✊
   *महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
        *शाखा चंद्रपूर*
🏵🏵🏵✊✊🏵🏵🏵🏵



*काल पुकारलेल्या राज्यस्तरीय संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले ,समन्वय समिती पदाधिकारी, खाजगी अनुदानित , विनाअनुदानित व जि‌.प.शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,कें. प्र., वि.अ., लिपिक वर्ग, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा कर्मचारी संघटना चे सदस्य, सर्व dcps शिलेदार, सर्व  शासकीय शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी , सर्व जेष्ठ बांधव ( जे आपले गुरुजन व मार्गदर्शक ), सर्व DCPS / NPS बांधव.....*
💐💐💐💐💐💐💐💐💐
       *विशेष आभार  म्हणजे आपल्या लहान बांधवांचे हित जोपासण्यासाठी राज्य नेत्यांचा रोश पत्करून सहभागी झालेल्या काही संघटनांचे पदाधिकारी तथा शिलेदार तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व  महिला भगिनी व आमच्या कट्टर dcps महिला शिलेदार  यांची भव्य दिव्य उपस्थिती यांचे ही खूप खूप आभार*
💐💐💐💐💐💐💐💐
     *सर्व पत्रकार मंडळी,मिडिया रिपोर्टर व या संपासाठी अहोरात्र कष्ट घेणारी माझी dcps जिल्हा व "तालुका कार्यकारिणी" यांचे ही आभार*
✊✊✊✊✊✊✊✊👍
       *अशीच एकजूट जर आपली राहिली तर आपल्याला सर्वांचे हित जोपासता येईल...चला तर अशीच एकजूट दाखवून भविष्यातही आपल्यावरील अन्यायाचा सर्वांनी मिळून सामना करुयात....चंद्रपूर जिल्हातील एकजूट पाहून खरोखर मन भरून गेले...*
.... *शेवटी सर्वांचे शतशः आभार....* *आभार...‌.आभार*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


   म.रा.जु.पेन्शन हक्क संघटन कोरपना
 *समस्त DCPS/NPS धारक बांधव चंद्रपूर जिल्हा*.
*👏👏जाहीर आभार👏👏*

     तिसऱ्यांदा जुनी पेन्शनचा नारा घुमला चंद्रपुरात...

*तुम्हा सर्वांची साथ,त्यामुळेच घडत आहे जुनी पेन्शनची बात*

चंद्रपुरात भव्यदिव्य संपात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार...

जुनी पेंशनचा आवाज बुलंद करणाऱ्या मातृतुल्य,पितृतुल्य सर्व संघटनेच्या पदाधिकारी व शिलेदारांनी अभूतपूर्व संप घडवून आणला त्याचे सर्वस्वी श्रेय तुम्हच्यामुळेच....

जवळपास 45 संघटना सहभागी झाल्या होत्या.व सर्वांनी संपात सहभागी होऊन जुनी पेंशन ह्या मूळ मागणीसह एकूण 13 मागण्या होत्या.आपल्या समन्वय समिती ला बुधवार ला बोलविले आहे.त्यात चर्चा सकारात्मक न झाल्यास 13 सप्टेंबर पासून बेमुदत संपाची हाक देण्यास आपण तयार असावे.

*अब की बार,पेंशन देनेवालो की सरकार*

आपल्या चंद्रपुर जिल्ह्यात काही पदाधिकाऱ्यांचे मन दुखले असल्यास माफी मागतो व पुढील लढ्यात सक्रिय होऊन चुका दुरुस्त करू या....

इतर विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती व राहीलच 
ही अपेक्षा

आपलाच
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी,शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपुर

Wednesday, September 4, 2019

👏🏻
मित्रांनो नमस्कार,

   *९ तारखेचा संप यशस्वी होण्यासाठी आपण सारेजण अगदी मनपूर्वक प्रयत्न करीत आहात, त्याबद्दल सर्व शिलेदारांच्या कार्याला सलाम!!*
     मित्रांनो,
चंद्रपुर जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षक संघटना आणि इतर संघटना च्या जिल्हाध्यक्ष यांना माझे बोलणे झाले आहे. सर्व जण संपात सक्रिय सहभाग घेण्यास तयार आहे. मग आपण मागे लपायचे का? वरिष्ठ बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करणार आहेत. 

*सक्रिय सहभाग घेणाऱ्या संघटना* : 

१) महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती
२) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
३) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
४) कास्त्राईब शिक्षक संघटना (सर्व)
५) बहुजन शिक्षक संघटना
६) आखिल भारतीय शिक्षक संघटना
७) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना
८) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
९) महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन
१०) आरोग्य कर्मचारी संघटना
११) ग्रामसेवक संघटना
१२) आय टी आय संघटना
१३) लिपिक  वर्गीय संघटना
१४) केंद्रप्रमुख संघटना
१५) मुख्याध्यापक संघटना
१६) विस्तार अधिकारी संघटना
१७) प्रहार शिक्षक संघटना
१८) शिक्षक सहकार संघटना
१९)अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ
२०)डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
२१)उर्दू शिक्षक संघटना
२२)एकल शिक्षक संघटना
२३)महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
२४)राष्ट्रवादी शिक्षक संघटना
२५)मनसे शिक्षक सेना
२६)शिक्षक भारती
२७)इबटा शिक्षक संघटना
२८)परिचारिका संघटना
२९) मुप्टा संघटना
३०) वसंतराव नाईक कर्मचारी संघटना
३१) धनगर कर्मचारी संघटना
३२) रा.स.प. कर्मचारी संघटना
  सर्व तालुका अध्यक्ष यांनी तालुक्यातील सर्व संघटना अध्यक्ष यांच्याशी संपर्क करावा. आणि संपात सहभागी होण्यासाठी विनंती करावी.
पुढील नियोजन :
१) ५ सप्टेंबर शिक्षक दिनी सर्वांनी काळया फिती लावून निषेध व्यक्त करावा.
२) ६,७, आणि ८ ला सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.
३) ९ तारखेला सर्व शिलेदार जिल्ह्याला जमा होतील, आणि तेथून मोर्चा निघणार आहे.
४) *दुपारी ३ वाजता सर्व तालुका आणि जिल्हा पदाधिकारी आणि सर्व शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष, राज्याध्यक्ष, व राज्य पदाधिकारी यांची सभा होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
------------------------------------------
आपले विनीत
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी,शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपुर

*_दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष_*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन चंद्रपुर

Sunday, August 25, 2019

28 तारीख पेंशन लक्षवेधी दीन सर्व जिल्ह्यात तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर

5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर पासून काळी फित लावून काम करणे

9 तारीख एक दिवसीय संप
मागणी मान्य न झाल्यास

11 तारीख पासून बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे

समन्वय समिती चा निर्णय घोषित करण्यात आला आहे.

मिलिंद सोळंके अमरावती विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Monday, August 12, 2019

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

 *🙏जिल्हा कार्यकारिणी तथा संपूर्ण कार्यकारिणी सभा अहवाल🙏*

          दिनांक 11 ऑगस्ट 2019 ला जनता शाळा चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन जिल्हा चंद्रपूर यांची जिल्हा तथा संपूर्ण तालुका कार्यकारिणी ची सभा मा. श्री. दुशांत भाऊ निमकर जिल्हाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री.सुनील भाऊ दुधे राज्यसल्लागार यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली
          सदर सभेत खालील विषयावर चर्चा करून ठराव कायम करण्यात आले

*🙏मागील सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे👉*
         मागील सभेतील सर्व इतिवृत्त वाचून मागील सर्व ठराव सर्वानुमते कायम करण्यात आले.ठराव सर्वानुमते मंजूर..
*🙏20 ऑगस्ट 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या संपविषयी चर्चा व नियोजन बाबत👉*
      
➡ 20 ऑगस्ट संपात राज्यमध्यवर्ती कर्मचारी संगठना समन्वय समिती, सर्व शिक्षक समन्वय संगठना, शासकीय व निमशासकीय सर्व संगठना सहभागी होणार असून अभूतपूर्व संप होणार असून 100% संप यशस्व्ही करण्याचे नियोजन करण्यात आव्हान करण्यात आले
➡ 20 ऑगस्टच्या संपात सर्व तालुक्यानी जिल्हास्तरावर सहभागी होणे आवश्यक आहे. 
➡ तालुका स्तरावर नियोजन करण्यात येऊ नये
➡ आपल्या DDO यांना संपविषयी अर्ज लवकरात लवकर सादर करावा व अर्जात स्पष्ट संपात सहभागी होत असल्याची नोंद करावी
➡20 ऑगस्ट ला किरकोळ रजा घेऊ नये घेतल्यास आपला संपात सहभाग नाही असे निदर्शनास येईल
➡महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन सर्व पेंशन शिलेदार यांनी 20 ऑगस्ट ला जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ठीक सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.
➡ महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन मधील केंद्रसंगठक यांची महत्वाची भूमिका असून प्रत्येक केंद्रातील प्रचार व प्रसार आपण रोज करावा
➡20 ऑगस्ट च्या संपात मोर्चा दरम्यान छत्री सोबत आणावी पाऊस लागल्यास मोर्चा तुन कोणीही बाहेर जाऊ नये
➡महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन सर पेंशन वीर यांनी आपल्या पोशाख मध्ये उपस्थित राहावे .टोपी सोबत आणावी
➡ सर्व तालुकाध्यक्ष यांनी वरील सर्व सूचना लक्षात घेऊन तालुका स्तरावरील संगठन शी संपर्क साधून सर्व तालुका सभा आयोजित करावी तसेच सर्वांच्या मदतीने प्रचार व प्रसार करावा
           वरील मुद्दे लक्षात घेऊन ठराव सर्वानुमते कायम करण्यात आले

🙏6 ऑगस्ट राज्य मध्यवर्ती कर्मचारी संगठना समन्वय समिती  मधील नियोजन ची रूपरेषा मांडण्यात आले
           सदर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यलय चंद्रपूर येथून निघणार असून सर्व समन्वय समिती सभा यांचे सूचनेनुसार आपणास जिल्हा परिषद चंद्रपूर येथून सहभागी व्हायचे आहे. सदर मोर्चा मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे घरासमोरून गांधी चौक ते जिल्हा परिषद असा येणार आहे तशा सूचना तालुक्यात देण्यात याव्या

🙏संगठना मध्ये जमा असणारी काही रक्कम fixed करण्याचे आज सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला🙏

✊20 ऑगस्ट च्या संपविषयी सर्व शिक्षक संगठना समन्वय समिती यांची सभा सुद्धा 11 ऑगस्ट ला पार पडली असून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन यांचे कडे संपूर्ण तालुक्यात प्रचार व प्रसार करण्याचे खूप मोठे नियोजन आपल्याकडे देण्यात आले असून सर्वानी आपली जबाबदारी पार पाडावी🙏

              *✊संघर्ष अटळ आहे✊* 

*✊संप संप संप संप संप संप संप संप✊*

           🙏अध्यक्ष/सचिव🙏
     *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन*
                *जिल्हा चंद्रपूर*

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

Tuesday, August 6, 2019

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

*👏संप संप संप संप संप संप संप संप👏*

*राज्य मध्यवर्ती कर्मचारी संगटना आयोजित समन्वय समिती ची सभा संपन्न*

👉काल दिनांक 5 ऑगस्ट ला समन्वय समीती ची *20 ऑगस्ट 2019* ला होणाऱ्या राज्यव्यापी संपाची नियोजन सभा *आदरणीय श्री.दीपक जेऊरकर साहेब व आदरणीय श्री.शालीक माऊलीकर साहेब राज्य लिपिक वर्गीय संगटना, आदरणीय श्री.सुधाकर अडबाले सर सरकार्यवाह वि.मा.शी संगटना.,आदरणीय श्री. राजेश पिंपळकर वनविभाग संगटना, श्री निलेश कुमरे जिल्हासचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगटन , इतर विभागातील संगटना पदाधिकारी व सर्व विभागातील कर्मचारी* यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 7 ते 9 वेळेत घेण्यात आली🙏

*👉1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे या मुख्य मागणीसह व इतर ही महत्वाच्या मागनिसह सर्व विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती🙏*

👉 20 ऑगस्ट संपविषयी जाणीव जागृती करण्यासाठी समन्वय समिती सर्व विभाग 7 व 8 आगस्ट ला प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करणार 🙏

👉शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वानी या संपात सहभागी होण्याचे आवाहन समन्वय समिती मार्फत करण्यात आले🙏

*✊20 ऑगस्ट 2019 च्या जिल्हा स्तरावर होणाऱ्या संपाची रूपरेषा✊*

*👉 20 ऑगस्ट ला मोर्चा जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालय पासून सकाळी 10 वाजता निघणार असून रामनगर पोलीस स्टेशन पासून फिरून मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या घरासमोरून गांधीचौक ते जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पोहचणार आहे.🙏*

*👉जिल्हा परिषद येथे मोर्चा पोहचल्या नंतर तिथे मार्गदर्शन होणार असून जिल्हाधिकारी यांना  निवेदन देण्यात येणार आहे 🙏*

*👉संप 100% यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची असून सर्व विभागाणी आपली जबाबदारी पार पाडण्याचे सुचविण्यात आली🙏*

👉महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगटन च्या वतीने 
श्री. प्रशांत खुसपुरे जिल्हा कार्याध्यक्ष
श्री. योगीराज भिवगडे जिल्हा उपाध्यक्ष
श्री. प्रशांत कोशेटवार ITI विभाग प्रमुख 
श्री. चंद्रकांत कोतपल्लीवर राज्यसमन्वयक 
उपस्थित होते🙏

*👉 तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगटन ची जिल्हा सभा येत्या शनिवारी 10 ऑगस्ट होणार असून सर्व सूचना आपल्या पर्यंत पोहचविण्यात येईल🙏*

*👉सर्व पेंशन fighter तथा सर्व तालुकाध्यक्ष/तालुकासचिव सर्व तालुका पदाधिकारी व सर्व पेंशन वीर महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन यांनी 20 ऑगस्ट च्या संपविषयी आतापासूनच प्रचार व प्रसार करून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे.🙏*

            *✊एकच मिशन जुनी पेंशन✊*

*✊संप संप संप संप संप संप संप  संप✊*

                 🙏अध्यक्ष/सचिव🙏
*✊म. राज्य जुनी पेंशन हक्क संगटन✊*
                  *🙏जिल्हा चंद्रपूर🙏*

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

Monday, August 5, 2019

*चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा*

          हा नारा  स्वातंत्रप्राप्तीसाठी भारतीयांना दादाभाई नौरोजी यांनी दिलेला आहे.आणि हा नारा जोपासत अहिंसक मार्गाने मागील 3 वर्षांपासून जुन्या पेंशनसाठी झटत आहोत.आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत चळवळ अखंड करीत राहून यश मिळविणारच ...

  ह्या मागणी करतांना जाणीवपूर्वक शासन डोळेझाक करीत आहे.एक ना एक दिवस सोन्याचा दिन उगवेलच म्हणून अन्याय सहन करून घरात बसायचे की संपात उतरायचे???

तुम्हीच ठरवा...

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना समवेत राज्यातील सर्व खाते व संवर्ग निहाय कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

मुख्य मागणी

*1 नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे ह्या मुख्य मागणीसह इतर मागण्या..*

एकीकडे शासन सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला वयोवृद्ध (80,85,90,95,100) ह्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त पेंशन देण्यासाठी शासन निर्णय काढतो.

मग

नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या व सेवेत आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याला वाऱ्यावर का?????सोडले???

त्याच्या पोरांचे शिक्षण कोण करणार???

नोव्हे 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यानेच कोणतं पाप केलंय हा जॉब विचारण्यासाठी शतप्रतिषद कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन आपला आक्रोश दाखवावा..आपला आक्रोश म्हणजेच सरकारला जाग

चला..उठा..सज्ज व्हा
20 ऑगस्ट चा सर्व कर्मचाऱ्याचा संप
शासनाला फुटायला हवा कंप

*शासन कलम 370 रद्द करू शकते मग dcps/nps ही अन्यायकारक योजना रद्द करू शकत नाही का ???नाही का??*

म्हणूनच जागे व्हा,जागे करा व संपात सहभागी व्हा


*मी जर तरुण असतो तर केव्हाच बंड करून उठलो असतो* 

अशी म्हणायची वेळ येऊ न देता आताच बंड करू या..

*एक ही बात, काम की बात,युवा आपके साथ*

*एकच मिशन,जुनी पेंशन*
*नो राजकारण,ओन्ली ऍक्शन*

आपलाच
श्री दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष
चंद्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन
*चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा*

          हा नारा  स्वातंत्रप्राप्तीसाठी भारतीयांना दादाभाई नौरोजी यांनी दिलेला आहे.आणि हा नारा जोपासत अहिंसक मार्गाने मागील 3 वर्षांपासून जुन्या पेंशनसाठी झटत आहोत.आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत चळवळ अखंड करीत राहून यश मिळविणारच ...

  ह्या मागणी करतांना जाणीवपूर्वक शासन डोळेझाक करीत आहे.एक ना एक दिवस सोन्याचा दिन उगवेलच म्हणून अन्याय सहन करून घरात बसायचे की संपात उतरायचे???

तुम्हीच ठरवा...

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना समवेत राज्यातील सर्व खाते व संवर्ग निहाय कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

मुख्य मागणी

*1 नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे ह्या मुख्य मागणीसह इतर मागण्या..*

एकीकडे शासन सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला वयोवृद्ध (80,85,90,95,100) ह्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त पेंशन देण्यासाठी शासन निर्णय काढतो.

मग

नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या व सेवेत आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याला वाऱ्यावर का?????सोडले???

त्याच्या पोरांचे शिक्षण कोण करणार???

नोव्हे 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यानेच कोणतं पाप केलंय हा जॉब विचारण्यासाठी शतप्रतिषद कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन आपला आक्रोश दाखवावा..आपला आक्रोश म्हणजेच सरकारला जाग

चला..उठा..सज्ज व्हा
20 ऑगस्ट चा सर्व कर्मचाऱ्याचा संप
शासनाला फुटायला हवा कंप

*शासन कलम 370 रद्द करू शकते मग dcps/nps ही अन्यायकारक योजना रद्द करू शकत नाही का ???नाही का??*

म्हणूनच जागे व्हा,जागे करा व संपात सहभागी व्हा


*मी जर तरुण असतो तर केव्हाच बंड करून उठलो असतो* 

अशी म्हणायची वेळ येऊ न देता आताच बंड करू या..

*एक ही बात, काम की बात,युवा आपके साथ*

*एकच मिशन,जुनी पेंशन*
*नो राजकारण,ओन्ली ऍक्शन*

आपलाच
श्री दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष
चंद्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

Saturday, June 29, 2019

📢
  
              *!..महत्त्वाचे..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

प्रति,
      सर्व जिल्हापदाधिकारी
      सर्व तालुकाध्यक्ष
     चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

*संदर्भ- दिनांक 28 जून 2019 चे राज्यकार्यकारिणीचे पत्र.*

            आपणांस सूचित करण्यात येते की, *राज्यकर्मचारी ,सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने* अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी, व इतर मागण्याकडे लक्षवेध करण्यासाठी *दिनांक ३ जुलै २०१९ रोजी सर्व कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शन करून,घोषणा देत 'लक्षवेधी दिन पाळण्याचे ठरविले आहे.*
       
            आपली संघटना अविरतपणे नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी यासाठी आंदोलने करीत आहे. होणाऱ्या *'लक्षवेधी दिन'* आंदोलनात अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी ही मागणी प्रामुख्याने असल्याने उपरोक्त आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन समन्वय समितीचा भाग असल्याने सक्रिय सहभागी होत आहे.
  
तरीपण *सर्व जिल्हाकार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी व सर्व शिलेदार  दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत घोषणा*  देत उपरोक्त  आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे. यानंतर ही शासनाने आपल्या मागण्याबाबत असेच उदासीन धोरण ठेवले तर *समन्वय समितीच्या वतीने मंगळवार दि.२० ऑगस्ट २०१९ रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप* जाहीर करण्यात येणार आहे. 

       *सोबतच लक्षवेधी दिनाचे फोटोज व विडिओज ला पोस्ट करून सोसिअल मिडियाच्या  माध्यमातून प्रसिद्धी द्यावी.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              आपलेच
    जिल्हाध्यक्ष/जिल्हासचिव 
      व समस्त कार्यकारिणी
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
            जिल्हा चंद्रपूर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Monday, April 22, 2019

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*न्यायालयीन वार्ता थेट सर्वोच्च न्यायालयातून....* 
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*🎓👉नवी दिल्ली,- 31 ऑक्टोबर 2005 चा जीआर रद्द करून 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. पिटिशन क्रमांक 1273/2014 जी देवेंद्र अंबेटकर वर्सेस  द स्टेट ऑफ महाराष्ट्र गव्हरमेंट ही याचिका उच्च न्यायालय औरंगाबादने डिसमिस केली होती. त्याला मा.सर्वोच्च न्यायालयात सहा आठवड्याच्या आत आव्हान देण्यास वेळ दिला होता. विहित मुदतीत मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून त्यावर आज दिनांक 22/ 4 /2018 रोजी सुनावणी घेण्यात आली .*

*🎓👉सर्वात महत्त्वाचे आजची सुनावणी मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा.न्या.आर.नरीमन व एस.कौल यांच्यासमोर झाली.मा.सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की या निकालावर आर्ग्युमेंट होणे आवश्यक असून बरेचसे मुद्दे विचारात घेतले गेलेले नाही.या मॅटर मध्ये तथ्य असून हे मॅटर चालवले जावे.... त्यामुळे हे मॅटर चालवण्यासाठी व विषय ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे..... लिव्ह ग्रँट केलेली आहे.... मॅटर ऍडमिट केले आहे....लवकरात लवकर तारीख घेऊन मॅटर पूर्ण ऐकले जाणार आहे ......या मॅटर मध्ये सचिव, महाराष्ट्र सरकार , सचिव,वित्त, महाराष्ट्र सरकार,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रतिवादी करण्यातआलेले आहे. सर्वात महत्त्वाचा टप्पा होता मॅटर ऐकले जाऊन चालवण्यास परवानगी मिळणे. ती मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेलीआहे त्यामुळे जुनी पेन्शन मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत..... पूर्ण ताकतीने पुराव्यानिशी हे मॅटर चालवले जाणार आहे. तरी सर्व Dcps धारकांना विनंती आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता काही शंका असल्यास संबंधित व्यक्तीशी संपर्क करून योग्य ती माहिती घ्यावी. यश आपलेच आहे ...ते मिळणारच आहे.... फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे आणि ती आपण करणार आहोत.... आपणाकडून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.....आपण जिंकणारच आहोत यावर विश्वास ठेवावा....*

*🎓👉आज याचिकाकर्त्यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.प्रशांत कातनेश्वरकर साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट कायदेशीर मुद्द्यांचा आधार घेऊन  बाजू मांडली ...त्यांना सहकार्य अॅड सूर्यवंशी साहेब , जेष्ठ विधिज्ञ अॅड.अरविंद  अंबेटकर साहेब , अॅड. केतन पोटे साहेब यांनी  मा.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे उपस्थित राहून कायदेशीर सहकार्य केले......*

Thursday, February 28, 2019

📢
 *।।महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना।।*
   *साखळी उपोषण*
◆●• *ठळक बाबी*•●◆
◆ 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे राज्यकार्यकारणी, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी व संघटन शिलेदारांचे उपोषण सुरू होते.
◆ *सलग 3 तीन दिवस हे साखळी उपोषण चालू होते.*
◆ *आज दुपारी 28 फेब्रुवारी रोजी मा. वित्तमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली.*
◆ *त्यांनी अंशदायी पेन्शन योजना बाबत समिती नेमली असून सविस्तर चर्चेसाठी समिती अध्यक्ष वित्त राज्यमंत्री दिपकजी केसरकर यांची भेट घेण्यास प्राथमिक अवस्थेत सांगितले.*
◆ *त्यानंतर संघटन शिष्टमंडळाला प्रशासनाद्वारे मा.वित्तराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी पाचारण केले.*
◆ *केसरकर साहेबांशी सविस्तर 20-25 मिनिटे कुटुंब निवृत्ती वेतन आणि जुनी पेंशन योजना लागू करण्या बाबत चर्चा झाली.*
◆ *अनेक मुद्यांवर चर्चा होऊन प्रत्यक्ष वित्त विभागाचे सचिव साहेबांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. या सर्व चर्चेत आपण हे स्पष्ट करण्यात यशस्वी झालो आहोत की, या नवीन अंशदायी पेन्शन योजनेतील अंमलबजावणी, योजनेने होणारी फसवणूक, मयत कर्मचारी कुटुंबांना आजपर्यंत न मिळालेला कोणताही लाभ व इतर सर्वच विषयावर प्रत्यक्ष वस्तुस्थिती व मंत्रालय पातळीवरील समज हे खूपच वेगवेगळे आहेत हे आपण मंत्रीमहोदयांच्या समोर उघड केले आहे.*
◆ *मयत कर्मचारी कुटुंबाला 10 लाखाच्या आदेशाने कोणताही लाभ मिळालेला नाही, नव्हे त्यातील अटी ह्या अन्यायकारक असून त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे योग्य असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उदाहरण देऊन स्पष्ट केले.*
◆ *या सर्व बाबींमुळे व आपले सर्व म्हणणे आकडेवारीसह, कागदपत्रांद्वारे प्रत्यक्ष मांडून समोरा समोर चर्चा करण्यासाठी आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळातील 5 सदस्यांना शासनाने नेमलेल्या समिती चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याचे स्पष्ट आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले असून तात्काळ 5 ही नावे प्रत्यक्ष लिहून घेतले आहेत हे आपले खूप मोठे यश आहे.*
◆ *एकंदरीत या उपोषण आंदोलनाचे फलित म्हणजे, DCPS/NPS योजनेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती, प्रशासन व संघटना यांचे याविषयीचे असलेले मत मंत्रीमहोदयांच्या समोर आपण उघडे केले आहे. तसेच शासनाने नेमलेल्या समितीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. आपण आपल्या मागण्यांबाबत आज "एक मैलाचा दगड" पार केलेला आहे.*
◆ या सर्व घडामोडी मुळे उपस्थित संघटन पदाधिकारी यांचे समाधान झाले असल्याने *आपले साखळी उपोषण आपण आज रात्रीपासून मागे घेतले आहे.*

कायम आपलाच
~शिवाजी खुडे
राज्यप्रवक्ते
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना
■◆●•●◆■◆●•◆■

Tuesday, February 19, 2019

महाराज घात झाला , घात झाला महाराज.  
     आपले ४४ मावळे त्या गनिमांनी घात करून मारले महाराज. गाफील असताना अचानक हल्ला केला त्या भडव्यांनी , काय होतंय आणि काय नाही हे कळायच्या आतच फडशा पाडला त्यांनी आपल्या मावळ्यांचा. लपून छापून हल्ला केला बाजारबुणग्यांनी सवयीप्रमाणं मागूनच वार केला, समोर यायची लायकी नाय कुत्र्यांची. महाराज ह्या कुत्र्यांचं कायतरी केलं पाहिजे, कायमचा बंदोबस्त केला पाहिजे ह्यांचा. रयत घाबरलीये महाराज, सैरबैर झालीये महाराज , कस आणि काय होऊन बसलं हे. आपला एक मावळा म्हणजे एक लाखाला भारी , *ह्याच मावळ्यांच्या जीवावरच आपली रयत आणि आपला देश सुरक्षित आहे महाराज.* पण महाराज मावळ्यांनी तरी किती हल्ले झेलायचे ह्या भडव्यांचे ? ह्यांना घरात घुसून शाहिस्तेखान दाखवलाच पाहिजे महाराज आणि आता फक्त बोट नाहीतर पूर्ण शीरच धडापासून वेगळं केलं पाहिजे महाराज. थांबलं पाहिजे महाराज हे सगळं थांबलं पाहिजे. युद्धप्रसंगी ठीक आहे  पण इतरवेळी सुद्धा आपल्या मावळ्यांनी जीव मुठीत धरून जगायचं..? आपल्याच मुलुखात आपल्यावरच होणारे हल्ले तरी किती दिवस पाहायचे महाराज ? 
            अजून एक सांगायचंय महाराज.... म्हणजे सांगायला लाज वाटतीये, हि सांगायची वेळ आमच्यावर येतीये हेच आमचं दुर्दैव. पण महाराज आपल्या काही लोकांना ह्याच काय सोयरा सुतक नाहीये महाराज.  *आपले स्वार्थी नेते जे तुमचं नाव लावून मोठे झाले ते ह्या जवानांच्या मृत्यूवर आपल्या राजकारणाची पोळी भाजताते महाराज. एकमेकांवर टीकेची बोट दाखवताते महाराज.*     *आणि आणि मृत सैनिकांचे रक्त थंड होयच्या आतच ह्या नेत्यांचे मूर्ख चमचे ज्यांना आपला देश तर सोडा पण आईबापा पेक्षा आपला नेता आणि पक्ष मोठा वाटतो अशी लोक आपल्या नेत्याच्या आणि पक्षाच्या प्रचाराला लागली सुद्धा. आपले मंत्री पक्षाच्या गणितात अडकलेत.* आणि मोठ्या मोठ्यांनी तर फक्त सोशल मीडिया वरूनच आपला राग व्यक्त केला. जर सैनिक देखील फक्त सोशल मीडियावर तैनात राहिले तर ? काय होईल ह्या देशाचं ? करेल का कोण विचार ?  *खरंतर महाराज पहिलं ह्या दीडदमडीच्या लोकांचा कडेलोट करायला हवा. आधी घरातील शत्रू मारायला हवा.* पण महाराज हे सगळं करणार कोण ? कारण शिवाजी या नावाचा उपयोग फक्त आम्ही सत्तेसाठी करतो. पण शिवाजी महाराज आम्हाला कधी कळालेच नाहीत महाराज, तुमच्यासारखा कर्तव्यदक्ष, न्यायदक्ष, प्रजादक्ष, व आपल्या सैनिकांवर मुलाबाळांप्रमाणे प्रेम करणारा राजा आम्हाला पुन्हा मिळेल का..? 
            महाराज क्षमा असावी पण एक विचारतो , " राजे पुन्हाएकदा जन्म घेता का आमच्यासाठी ?'🙏🙏
संतोष वाटगुरे, 
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, चंद्रपुर

Tuesday, February 12, 2019

*मंत्रालयीन पाठपुरावा व एल्गार मार्च बाबत...!*
_______________________________

*!...महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन...!*

सहकाऱ्यांनो नमस्कार...🙏🏻

आपला पेन्शन एल्गार मार्च आता तोंडावर आला आहे.. आपण सर्वच जण अगदी मोठ्या रेकॉर्डब्रेक संख्येने मुंबईत दाखल होणार आहात.. या वेळी पेन्शन मार्च होणार म्हणजे होणारच..!

चला तर लागा मग तयारीला..!
आपणही येऊ नि सोबत ५ जण घेऊन येऊ..!

२० फेब्रुवारी ला मुंबईत फक्त आपलाच आवाज हवा..! फक्त आपलाच आवाज..!
_______________________________

*अ) मंत्रालयीन भेटी :-*

*१. मुख्यमंत्री यांना पत्र :-*
आपण २० फेब्रुवारी पासून करत असलेल्या एल्गार मार्च व आमरण उपोषणाबाबत निवेदन दिले..

*२. Dcps/NPS अभ्यासगटाच्या बैठकांबाबत महत्त्वाचे सदस्य राज्यमंत्री मदन येरावर यांची भेट*

• शासनाने १९ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णयाद्वारे DCPS/NPS त्रुटी काढण्यासंबंधी तीन महिन्यांकरिता एक समिती स्थापन केली होती. त्यातील सदस्य राज्यमंत्री मदन येरावर साहेब यांची भेट घेतली.. व प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांच्याकडे एक draft देखील सुपूर्द केला आहे.
• अजून एकही बैठक या समितीची झाली नसल्याचे त्यांनी सांगितले असून होणाऱ्या बैठकीत आपला एक/दोन प्रतिनिधी यांना बोलावू हे त्यांनी सांगितले.
_अधिवेशन काळात ही बैठक होणार आहे.._

या पूर्ण बैठकीसाठी *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांचे तत्पर प्रयत्न कामी आले.!
धन्यवाद..!

*३. २३/१० बाबत भेट :-*

• 'आपल्या सर्वांच्या जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे २३/१० चा वेतनश्रेणीचा शासन निर्णय' या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पुन्हा भेट घेतली. (जवळपास १७-१८ वी भेट) 
• लवकरच म्हणजे येत्या आठवड्याभरात १००% त्याबाबत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

या भेटीसाठी देखील *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांनी सहकार्य केले. ते देखील सोबत उपस्थित होते. 
______________________________
*विशेष उल्लेख*

*आमदार केळकर साहेब* यांच्या भेटीसंदर्भात जालना *जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर* यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच *राज्याध्यक्ष वितेश खांडेकर* व *राज्य महासचिव गोविंद उगले* यांनी समन्वय साधत प्रयत्न केले. यावेळी *कोकणविभाग प्रमुख अमोल माने* आणि *मी (प्राजक्त)* सोबत होतो. 
______________________________

*ब) पेन्शन एल्गार मार्च बाबत*

*१. आभार/अभिनंदन:-*

आपल्या पेन्शन एल्गार मार्च ला परवानगी मिळावी म्हणून ज्या आमदार महोदयांनी आपली शिफारस पत्रे दिलीत, त्या सर्वांचे आभार.. अशीच साथ संपूर्ण प्रक्रियेत असेल अशी खात्री आहे..

*धन्यवाद...!*
•आमदार विक्रमजी काळे
•आमदार कपिलजी पाटील
•आमदार राणा जगजितसिंह पाटील
•आमदार बाळारामजी पाटील
•आमदार दत्तात्रयजी सावंत
•आमदार किशोरजी दराडे

सहकाऱ्यांनो,
• प्रदीप सोनटक्के सर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड ते सत्याग्रह भूमी 'चिरनेर' असा 'रन फॉर पेन्शन' चा पल्ला पार करणार आहेत..

• *आपला पेन्शन मार्च जिजामाता उद्यान,भायखळा(पूर्व) ते आझाद मैदान असा होणार म्हणजे होणारच आणि नंतर आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत..*
______________________________

चला तर मग अजिबात किंतु-परंतु यांचा विचार न करता उर्जावान व्हा.. आपल्या सहकाऱ्यांना करा..!

*यावेळी तर यावंच लागतंय..!*
______________________________
*कायम आपलाच*
*प्राजक्त झावरे-पाटील*
८८९८८८०२२२ / ९८३३७८१८१७
*!.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ..!*

Monday, February 11, 2019

📢

*२० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैलीत संदर्भात*..

*पहिला टप्पा*
मित्रहो २० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैली ची सुरुवात  १७ फेब्रुवारी पासुचन होईल किल्ले रायगड पासुन पेंशन चे राष्ट्रीय आयकाॅन प्रदिप सोनटक्के हे किल्ले रायगड ते चिरनेर असा प्रवास धावत सुरु करतील व १९ फेब्रुवारी ला त्यांचे  स्वागत आमदार महोदय सर्व राज्य कार्यकारिणी यांच्या उपस्थित केले जाईल.

*दुसरा टप्पा*
२० फेब्रुवारी ला आपण खुप मोठ्या संख्येने एकत्रीत होऊन जिजामाता उद्यान (भायखळा पुर्व) ते आजाद मैदान अशी पेंशन एल्गार रॅली निघेल.

*तिसरा टप्पा*
आजाद मैदान ला पोहचल्यावर आपल्या मागण्यांसाठी सरकार किती सकारात्मक आहे हे लक्षात घेऊन तिथेच आमरण उपोषण (२० तारखे) पासुनच आमरण उपोषण सुरू केले जाईल.

अशा तीन टप्प्यात आंदोलन होणार असुन आपल्या ला वाटत असेल की मागील वेळेस ही राज्य कार्यकारिणी कडुन असेच आव्हान करण्यात आले होते परंतु तस काही झाल नव्हत पण यावेळेस आपण पुर्ण तयारी करुनच रस्त्यावर उतरत आहोत म्हणुन किंतू परंतु मनात न आणता मोठया संख्येने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटने ने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आपल आंदोलन आपण निकराने लढु.

टिप :- १)पिण्याचे पाणी व टाॅईलेट यापेक्षा जास्त व्यवस्था आपल्या कडुन केली जाऊ शकणार नाही.
२)आंदोलन ला येताना ३-४ दिवस रितसर सुट्टी घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे.
३)कृपया आंदोलना ला येताना केवळ आंदोलना तच यावे मुंबई दर्शन साठी येऊ नये.

राज्याध्यक्ष /राज्य सचिव
विश्वस्त तथा राज्य कार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.

Sunday, January 27, 2019

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

        *👉आज दिनांक २७ जानेवारी २०१९ ला मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार वित्त, वन व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना🙏* 

        *👉१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचारी यांना जूनी पेंशन योजना लागू व्हावी या विषयाला अनुसरून निवेदन देण्यात आले. सदर मागणी १५ दिवसाचे आत मंजूर न झाल्यास मुंबई येथे मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला🙏*

      *👉मा. सुधीरभाऊ उपस्थित नसल्याने त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले🙏* 

     *👉दिनांक १ फेब्रुवारी नंतर संगठन ची चर्चा करण्यासाठी आपणास वेळ देण्यात येणार आहे करिता श्री. चंद्रकांत कोतपल्लीवार सर राज्य समन्वयक यांनी श्री. अतकरे सर यांचे शी संपर्क करून वेळ व दिनांक ठरवावी🙏*

      *👉सदर निवेदन देण्यासाठी दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष, निलेश कुमरे जिल्हा सचिव, प्रशांत खुसपुरे जिल्हा कार्याध्यक्ष, महादेव मुनावात जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, भालचंद्र धांडे तालुका अध्यक्ष, लखन साखरे माजी तालुकाध्यक्ष व इतर पेंशन शिलेदार उपस्थित होते.🙏*

       *👉पेंशन ची लढाई कुणा एकाची नाही.आपल्या अस्तित्वाची ही लढाई असून🙏* 

   *👉३ फेब्रुवारी २०१९ ला चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिलेदार यांनी स्वतःची जबाबदारी समजून अमरावती येथे राज्यस्तरीय पेंशन हक्क परिषदेत  उपस्थित राहावे व अमरावती येथे आपल्या जिल्हा तील पेंशन शिलेदार उपस्थित राहण्यासाठी सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व सर्व तालुका पदाधिकारी यांनी प्रचार व प्रसार करावा🙏*

         *👉महिलांचे योगदान पेंशन लढाईत खूप महत्त्वाचे आहे. सर्व महिला कर्मचारी यांनी सुधा राज्यस्तरीय पेंशन हक्क परिषदेत उपस्थित राहून पेंशन लढाईचे पाईक व्हावे..🙏*

       *👉माझ्या सर्व पेंशन शिलेदारांना विनंती आहे की पोस्टर वार, ट्विटर वार या लढाईत दिवसातून फक्त १० मिनिट वेळ काढून लढाईत सहभागी व्हावे. आताचे १० मिनिट म्हातारपणाची हातभार लावणार असणारा वेळ असणार.🙏*

          *👉आपल संगठन व्हॉट्स अप च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर वाढल.मग सर्वांनी हा लढा अविरत सुरू ठेवावा यश नक्कीच आपल्या पदरात पडेल🙏*
  
          *👉सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे दिवसातून थोडा वेळ काढून आपल्या पेंशन शिलेदार यांना ग्रुप च्या माध्यमातून पेंशन लढाईची दिशा, मार्गदर्शन, सक्रिय सहभाग दर्शवावा.🙏*

            *एकच मिशन जूनी पेंशन* 

     *#NoPension_NoVote*

                 *चलो अमरावती* 

                     *हल्ला बोल*

*अध्यक्ष/सचिव/तालुकाध्यक्ष/तालुकासचिव*
   *सर्व जिल्हा पदाधिकारी/सर्व तालुका*                 
                         *पदाधिकारी*
        *म.रा.जूनी पेंशन हक्क संगठन*
                     *जिल्हा चंद्रपूर*

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

Saturday, January 12, 2019

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

*_महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संगठन_* 
                   *_जिल्हा चंद्रपूर_*

      👉 काँग्रेस जनसंघर्ष सभेत *विरोधी पक्ष नेते मा. राधाकृष्ण विखे पाटील* यांना महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संगठन च्या वतीने *जूनी पेंशन योजना* लागू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले🙏

👉मा. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते यांनी जूनी पेंशन योजना हा विषय *_२०१९ च्या निवडणूक मधील जाहीरनाम्यात_* घेण्याचे व *_सदर विषय मार्गी लावण्याचे_* आश्वासन दिले🙏

  *_👉सदर निवेदन देण्यासाठी   निलेश कूमरे जिल्हा सचिव,अविनाश चवले जिल्हा उपाध्यक्ष, योगिराज भिवगडे जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत खुसपूरे जिल्हा कार्याध्यक्ष, पंकज उद्धरवार शिक्षण विभाग प्रमुख, भालचंद्र धांडे चंद्रपूर तालुका अध्यक्ष, अतुल पोहाने चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष, मनोज काकडे जिल्हा संपर्क प्रमुख, प्रशांत कोषेटवार ITI विभाग प्रमुख, श्रीकांत पोडे, देवानंद चटप, सुधाकर बोबडे, प्रकाश होळंबे, रोशन काळे, प्रमोद उरकुडे, श्रीकांत पांनघाटे, अजय उपरे, प्रदीप जेनेकर, राजू वडस्कर, सचिन घोडसेलवार, धीरज ताजने, अनिल कुरसंगे, संतोष पोडे, छगन पराते, सुभाष जुनघरे, विनोद कौरासे व इतर ही पदाधिकारी व पेंशन शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते🙏_*

  _🙏उशिरा रात्री पर्यंत निवेदन देण्यासाठी सर्व झन उपस्थित असल्यामुळे सर्व उपस्थित पेंशन शिलेदार यांचे मनपूर्वक आभार🙏_

                 *✊आपलीच टीम✊*
*🙏म. रा. जूनी पेंशन हक्क संगठन चंद्रपूर🙏*

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

Monday, November 26, 2018

📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓

🎯
*----------------------------------------------------*
*■भारतीय★संविधान★दिन विशेष*■
*---------------------------------------------------*

_आज 26 नोव्हेंबर 2018 ला भारतीय संविधान दिनी संविधानिक निर्णय घेऊन दिल्ली सरकारने इतिहास रचला._

*1 नोव्हेंबर 2005 ला व नंतर नियुक्त सरकारी तथा निमसरकारी  कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुर्ववत लागू करण्याची घोषणा केली.*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_प्रथमतः दिल्ली सरकार तसेच मा.अरविंदजी केजरीवाल यांचे मनपूर्वक आभार_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

_आता तरी #महाराष्ट्र_सरकार #आपलेसरकार जागा होईल आणि भारतीय संविधानाची लाज राखेल._

*#भारतीय_संविधान जिंदाबाद*

*#एकचमिशन_जुनीचपेन्शन*

*#noPension_noVote*

*#Nps_goBack*

*_#आवाज_दो_हम_एक_है!_*

*-----------------------------------------------------*
🎯 *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*
*------------------------------------------------------*